
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
फिर्यादी श्री. राजन पारस चौधरी (वय: २२ वर्षे) व्यवसाय: ओला कार चालक राहणार: गोवंडी, मुंबई हे दिनांक २४/०३/२०२३ रोजी त्यांची स्विफ्ट डिझायर कार घेऊन नेवाळी नाका, बदलापूर पाईप लाईन रोड, कल्याण पूर्व या ठिकाणी आले असता, त्यांना मध्यरात्री ०३:०० वाजण्याच्या सुमारास नेवाळी येथून डोंबिवली येथील भाडे आल्याचा कॉल ओला कंपनीकडून आला, त्याप्रमाणे त्यांनी नेवाळी, कल्याण पूर्व येथून तीन पॅसेंजर याना घेवून घरडा सर्कल या ठिकाणी आले असता, त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारला व रिक्षा त्यांच्या कारच्या पुढे उभी केली. रिक्षातुन दोन इसम खाली उतरून ते फिर्यादी यांच्या गाडीजवळ येऊन त्यांच्याशी वाद करू लागले. त्यावेळी फिर्यादी हे कारमधून खाली उतरले असता सदर इसमांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून त्यांच्या खिशाची तपासणी करु लागले, त्यावेळी फिर्यादी हे त्यांच्या कार मध्ये बसण्याचा प्रयत्न करीत असताना कारमध्ये बसलेले तिन्ही इसम खाली उतरले व ते देखील फिर्यादी यांच्याशी वाद करू लागले. त्यावेळी सदर पाचही इसमांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्या पँटच्या खिशातील पाकीट जबरीने काढून घेऊन ते पाचही जण रिक्षातून पळून गेले. त्यानंतर फिर्यादी हे कारमध्ये बसले असता त्यानी कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन कारमध्ये नव्हते. सदरचे मोबाईल फोन कारमध्ये बसलेल्या तिन्ही पॅसेंजरांनी चोरी करून नेल्याचे फिर्यादी यांना आढळून आले. सदर प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिनांक ०१/०४/२०२३ रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मानपाडा पो.स्टे. गुरनं २३४/२०२३ भादंविक ३९५, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर दरोड्याचा गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी लागलीच गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या वेगवेगळया टीम तयार करून, त्यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले. सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासात आरोपी नामे चंद्रकांत उर्फ मोठा चंदया, रमेश जमादार, शिवा रुषीपाल तुसंबल, सत्यपाल मुकेशकुमार कनोजिया यांना अटक करण्यात आलेली असून एका विधी संघर्शीत बालकास ताब्यात घेण्यात आले असून, एका पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध चालू आहे. नमुद आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्हयात चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्हयात चोरलेले एकंदर ९ मोबाईल फोन, १ लॅपटॉप, रोख रक्कम, फिर्यादीचे ओळखपत्र, गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण रुपये २,००,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल व लॅपटॉपच्या संबधाने तपास चालू असून सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोडयाची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर ३२ गुन्हे दाखल आहेत. सदरचे आरोपी हे गुन्हयात रिक्षाचा वापर करून रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना कट मारून वाहन चालकांशी वाद घालून त्यांना लुटण्याचे तसेच रिक्षात एक प्रवासी बसवुन त्यास एकांत ठिकाणी नेवुन त्यास लुटण्याचे गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयाचा अधिक पुढील तपास चालू आहे. सदरचा गुन्हा २ तासाच्या आत उपडकीस आणण्यात मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना यश मिळालेले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि कल्याण दत्तात्रय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ कल्याण सचिन गुजाळ, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि. शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. (गुन्हे) बाळासाहेब पवार, सपोनि. सुरेश डांबरे, सपोनि. अविनाश वनवे, सपोनि. सुनिल तारमळे, सपोउपनि. भानुदास काटकर, पोहेकॉ. विकास माळी, सुनिल पवार, संजय मासाळ, गिरीश पाटील, पोकॉ अशोक आहेर, विजय आव्हाड यांनी केली आहे.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.info/vi/register-person?ref=MFN0EVO1
okebet4 https://www.okebet4u.com
okebet168 https://www.okebet168u.org
phwin25 https://www.phwin25g.net