
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मोबाईलच्या नको असलेले फोन कॉल्स आणि स्पॅम मेसेजेसमुळे आपण त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. Jio, Airtel आणि Vodafone-Idea या देशातील मुख्य मोबाईल नेटवर्क कंपन्यांनी १ मे पासून त्यांच्या सिस्टीममध्ये स्पॅम मेसेज आणि कॉल्स ब्लॉक करण्यासाठी फिल्टर बसवल्याचे म्हटले आहे. AI (आर्टीफीशिअल इंटीलिजन्स) च्या मदतीने नेटवर्कवरच हे स्पॅम मेसेज आणि फोन कॉल्स ब्लॉक होणार आहेत.
आतापर्यंत आपल्यासा कॉल आल्यावर कळत असे की, हा स्पॅम कॉल आहे. मग आपण तो ब्लॉक करायचो. आता आधीच नेटवर्कवर त्यावर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे स्पॅम कॉल आता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कंपन्यांना ३० एप्रिलपर्यंत या संदर्भात मुदत दिली होती.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!