Home आपलं शहर पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय..

पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय..

0
पुढील तीन महिने दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ! कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उन्हाळा सुरू झाला असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आठवड्यातून एक दिवस म्हणजेच २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण पॅसिफिक महासागरातील अ‍ॅलनिनो या समुद्र प्रवाहाच्या प्रक्रियेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी साठा ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पुरवण्यासाठी ३२ टक्के तूट येत आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जलस्त्रोतांमध्ये असलेला पाणी पुरवठा लक्षात घेता आणि त्यासोबतच मान्सूनची स्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता, ९ मे २०२३ पासून आठवड्यातील दर मंगळवारी २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

या पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे कल्याण डोंबिवलीतील बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामिण (शहाड, वडवली, आंबिवली आणि टिटवाळा), डोंबिवली पूर्व आणि पश्चिम परिसरात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा बंदमुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवावा आणि पाणी जपून वापरण्याचं आवाहन कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून करण्यात आलं आहे.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here