Home आपलं शहर माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..

माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..

0
माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण ग्रामीण भागात माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती दीपेश मात्रे यांनी आज पालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत कल्याण ग्रामीण मधील गोळवली, दावडी , सोनारपाडा व मानपाडा या गावांमध्ये अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. या अमृत योजनेअंतर्गत प्रत्येक विभागाकरिता स्वतंत्र जलकुंभ बांधून देण्यात येणार आहे जेणेकरून भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही. सध्या या चारही विभागात पाणी कमी प्रमाणात देण्यात येत आहे, यावरही तोडगा काढण्याकरिता उद्या महापालिका आयुक्तांसोबत बैठक आयोजित केल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली.

सदर भागातील पाण्याचा प्रश्न येत्या चार महिन्यात सोडविण्यात येईल अशी ग्वाही संबंधित ठेकेदाराने दिली. यावेळी माजी नगरसेवक जालींदर पाटील, नकुल गायकर, मुकेश पाटील पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी, योगेश म्हात्रे, आशु सिंह, मुकेश भोईर, स्वप्निल विटकर, पवन म्हात्रे, अक्षय गायकर, सचीन कासार व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here