
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत मास्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून सध्या राहावे लागत आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तर या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भिंती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

खंबाळपाडा येथील तलावात गणपती आणि इतर देवतांचे विसर्जन नित्यनेमाने होत असते. आता उन्हाळ्यामुळे तलावातील पाणी आटले आहे. सदर तलावातील पाणी हिरवे झाले असून ते दूषित झाले असावे असा स्थानिक नागरिकांचा कयास आहे. असे असताना, अचानक आठ दिवसापासून येथे मासे मेल्यानंतर जी भयंकर दुर्गंधी येते तशी तलावाच्या आसपासची दुर्गंधी परिसरात पसरली असून त्याचा स्थानिक नागरिकांनी याबाबत शोध घेतला असता, या तलावातील मासे मृत अवस्थेत आढळल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिकांनी प्रसिद्धी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या तलावातील मासे मरावे यासाठी रसायन टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हे मृत मासे खाण्यासाठी परिसरातील भटके कुत्रे तलावाच्या आसपास फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या तलावातील पाणी उपसून साफसफाई करावी याकरिता कॉम्रेड काळू कोमास्कर आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार महापालिका सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र यावर कारवाई करण्याबाबत महापालिकेकडून चालढकल करण्यात येत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत “फ” प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भरत पाटील यांना विचारले असता, सदर खंबाळपाडा तलावातील मासे मृत झाल्याची तक्रार आल्याचे त्यांनी सांगितले. तेथे दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी औषध फवारणी केली असल्याचेही सांगितले.
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.info/pt-PT/register-person?ref=KDN7HDOR
pin77 online https://www.pin77-online.com
playpal77 https://www.playpal77sy.org
pagcor https://www.ngpagcor.net
phl789 https://www.nphl789.net
phtaya01 https://www.phtaya01.org