
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृह येथे डोंबिवलीतील नामवंत पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘दै. प्रहार’ चे जेष्ठ पत्रकार बापु वैद्य, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक तसेच साप्ताहिक ‘न्याय रणभूमी’, ‘अंतिम न्याय’ व ‘लोकहीत न्यूज’ चे धडाडीचे राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, साप्ताहिक ‘आपला भगवा’,’राजमुद्रा’ च्या संपादिका सारिका शिंदे, ‘डोंबिवली फास्ट न्यूज’ चे किशोर पगारे, ‘दै. लोकमत’ चे प्रशांत माने, ‘पुढारी ऑनलाईन’ च्या भाग्यश्री प्रधान आचार्य, ‘आज तक’ चे मिथीलेश गुप्ता, ‘तरुण भारत ऑनलाईन’ च्या जान्हवी मौर्य, ‘क्राईम बॉर्डर’ चे संपादक राजेंद्र वखरे, ‘दै.मुंबई चौफेर’ व ‘वृत्तमनास’ चे श्रीराम कांदू व दै. लोकसत्ता’ चे भगवान मंडलिक या सर्व पत्रकारांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी किशोर पगारे, सारिका शिंदे, भाग्यश्री प्रधान आचार्य, राजेंद्र वखरे या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले .

त्याचबरोबर सतत पडणाऱ्या पावसातही आपल्याला सकाळी वेळेवर वर्तमानपत्र पोहचविणार्या मुलांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ तर्फे रेनकोट देण्यात आले. तसेच पावसाळ्यात भर पावसातही प्लास्टिक कागदाच्या आडोशाने भाज्यांचा बचाव करत आपल्याला ताज्या भाज्या उपलब्ध करून देणाऱ्या काही गरजू भाजी विक्रेत्यांना क्लब तर्फे मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांसमोर दिली. क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले यांनी जागरूक समाज घडविण्याच्या पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांच्या निरपेक्ष कार्याची स्तुती करत कौतुक केले व असेच कार्य निरंतर करत राहण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ च्या वतीने शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले, मानद सचिव रोटेरियन जगदिश तांबट , क्लबचे संस्थापक रोटेरियन राजेश कदम, रोटेरियन संजय टेंभे, प्रकल्प प्रमुख रोटेरियन मनोज क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख रोटेरियन सुदिप साळवी, रोटेरियन साधना साळवी, रोटेरियन उमेश स्थुल उपस्थित होते.
tayawin https://www.tayawinch.net
91phcom https://www.91phcom.net
okebet168 https://www.okebet168u.org
okebet3 https://www.okebet3u.org