*अहमदपूर:-*
*मासूम शेख*
येथील महात्मा फुले महाविद्यालयात उच्च शिक्षण आणि संशोधनात सर्जनशील कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने अर्थात ‘जनरेटिव्ह ए आय इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च : अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ म्हणजेच ‘उच्च शिक्षण आणि संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता संधी आणि आव्हाने ‘या विषयावर दि. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय आंतर विद्याशाखीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक व शिक्षण तज्ज्ञ तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ऑक्टोबर २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात ‘उच्च शिक्षण आणि संशोधनात सृजनशील कृत्रिम बुद्धिमत्ता: संधी आणि आव्हाने’ अर्थात ‘जनरेटिव्ह ए.आय. इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च : अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस’ या विषयावर आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे राहणार असून, उद्घाटक म्हणून नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे उपस्थित राहणार आहेत तर बीज भाषक म्हणून हैदराबाद, तेलंगणा येथील एम. व्ही. एस. आर. महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. राजेश कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी.टी. शिंदे व चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे उपाध्यक्ष माधवराव पाटील हे अध्यक्षस्थान भूषवणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. दिगंबर नेटके उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मानव्यविद्या शाखा अधिष्ठाता डॉ. पराग खडके, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य डी. आर. झोडगे, चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्रास देशभरातून अभ्यासक, संशोधक उपस्थित राहणार असून, परिसरातील विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, अभ्यासकांनी या चर्चासत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा आय. क्यु. ए.सी. समन्वयक डॉ. दुर्गादास चौधरी, नॅक समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार, चर्चासत्राचे समन्वयक डॉ. बब्रुवान मोरे, सहसमन्वयक डॉ. सतीश ससाणे व सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी केले आहे.
Easy login process over at TG77login, gotta love that! No one wants a headache getting in to play. The site itself is pretty decent too. Quick and painless. Give it a try if you haven’t already: tg77login
Masaya365app, giving this a go. Looks promising! Like the interface and the selection of activities. If you want to try, check it out: masaya365app.
718spgame is on my daily rotation. Always something new to try and the graphics are decent. Give it a try 718spgame.
Okay, so I downloaded the Raja Luck app, and it’s surprisingly decent! Games seem fair, and I actually managed to win a few bucks. Find the download link here: rajaluckappdownload