Home आपलं शहर *राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी* *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*

*राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी* *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*

0
*राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी*   *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*

अहमदपूर:-
मासूम शेख

राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महा कपिलधार यात्रा दिनांक सात नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला पुरुष विविध जाती, धर्माचे सदभक्त सहभागी झालेले असतात आणि विधानसभेच्या मतदानाची अंदाजे संभाव्य तारीख दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदरची तारीख कपिलधार ची महापद यात्रा झाल्यानंतर करावी अशी आग्रही मागणी भक्ती स्थळाचे प्रमुख परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्य निवडणूक आयुक्त मुंबई यांना लातूर जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे यांच्यामार्फत मागणी केली आहे.
अंदाजे विधानसभेच्या निवडणुकीची तारीख आणि कपिलधार महा पदयात्रा यांचा कालावधी एकच दिसतोय सदरची दिंडी राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली गेली पन्नास वर्षापासून काढण्यात येत आहे.
या दिंडीमध्ये लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी हिंगोली औरंगाबाद जालना सह मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून आठ लाख ते दहा लाख भाविक भक्त अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात.
महाराष्ट्र शासन चा आग्रह आहे की 100% मतदान व्हावे पण या महापद यात्रेच्या दरम्यान विधानसभेची तारीख काढली तर या मतदानापासून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातील आठ ते दहा लाख लोक या मतदानापासून वंचित राहणार आहेत.
त्यामुळे माननीय साहेबांनी सदरच्या दिंडीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून येणाऱ्या विधानसभेची मतदानाची तारीख बदलावी अशी आग्रही मागणी करण्यात आलेली आहे.
सदरचे निवेदन अहमदपूरच्या उपजिल्हाधिकारी मंजुषाताई लटपटे यांना शिस्ट मंडळांनी दिले.
या निवेदनावर भक्ती स्थळाचे विश्वस्त, मनमत शिवलिंग मिशन, वीरमट संस्थांचे मठाधिपती, परमपूज्य आचार्य गुरुराज स्वामी, ओम भाऊपूणे, बालाजी पाटील चाकूरकर, प्रतापराव पाटील, अभय मिरकले, लक्ष्मीकांत कासनाळे, दादा उटगे, संदीप चौधरी, राहुल शिवपुजे, राजकुमार कल्याणे, राम तत्तापुरे, एडवोकेट निखिल कासनाळे, प्राध्यापक विश्वंभर स्वामी, ओंकार पाटील, राजू कल्याणी, श्रीकांत उपाध्ये, शाम काबलिया, अमर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here