Home आपलं शहर *अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना २०% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर* हुंकार आंदोलनाला अखेर यश

*अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना २०% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर* हुंकार आंदोलनाला अखेर यश

0
*अंशतः अनुदानित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना २०% अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर*  हुंकार आंदोलनाला अखेर यश

अहमदपूर/लातूर.
मासूम शेख

महाराष्ट्र राज्यातील अंशतः अनुदानावर सुरू असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २०% वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे ७० हजार कुटुंबाचं लक्ष लागल होत.
मंत्रीमंडळ निर्णयाची प्रेस नोट नुकतीच महाराष्ट्र शासनाचे उपसचिव यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली.संबंधित निर्णयाचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार आहे.मुंबई च्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलना ५६ व्या दिवशी यश आले.१ जून २०२४ पासून अनुदानाचा वाढीव टप्पा अनुज्ञेय राहणार आहे.
प्रेस नोट मध्ये म्हटल्याप्रमाणे शासन निर्णय ६/२/२३ अन्वये विहित निकषांची पूर्तता केलेल्या ८२० प्राथमिक शाळा,३५१३ वर्ग/तुकड्या,व त्यावरील ८६०२ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,१९८४ माध्यमिक शाळा,२३८० वर्ग/तुकड्या,व त्यावरील २४०२८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,३०४० उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये,३०४३ वर्ग/तुकड्या,अतिरिक्त शाखा व त्यावरील काम करणारे १६९३२ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वेतन अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करण्यात आला आहे.काही प्राथमिक,माध्यमिक शाळा २०%,४०,६०% वेतन अनुदानावर सुरू आहेत तर काही उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये २०% ,व ४०% वर सुरू आहेत.अनुदानाच्या विविध टप्प्यावर असलेल्या शाळांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला आहे.यासाठी होणाऱ्या वार्षिक रु ९३५.४३ कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे.१२/०२/२०२१,१५/०२/२०२१ नुसार अपात्र झालेल्या पण ३० दिवसाच्या आत त्रुटी पूर्तता केलेल्या ४०% व ६०% अनुदासाठी पात्र ठरलेल्या ६५१ प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालये व १२८१ तुकड्यावरील ५९९० शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला आहे.त्या करीत होणाऱ्या रु १०७.१० कोटी आवर्ती खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.तसेच नंतरच्या काळात मूल्यांकनात पात्र ठरलेल्या ,अघोषित शाळांना २०% अनुदानासह घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सर्व प्रक्रियेत अनुदानास अपात्र ठरणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना स्वयं अर्थसहाय्यीत शाळा(विवक्षित)शाळा म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निर्णया अंती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल तमाम महाराष्ट्रातील शिक्षकांकडून आभार व्यक्त होत आहेत.शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेही आभार व्यक्त होत आहेत
अनुदानाचा पुढचा टप्पा वाढवून मिळण्याच्या पाठपुराव्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,आ. किशोर दराडे,आ‌‌.किरणराव सरनाईक,आ. ज.मो.अभ्यंकर,आ. विक्रम काळे,माजी आ. श्रीकांत देशपांडे, माजी आमदार दत्तात्रय सावंत,अ‍ॅड तुकाराम शिंदे,शिक्षक समन्वय संघाकडून प्रा राहुल कांबळे,के पी पाटील,प्रा.संतोष वाघ,प्रा. अनिल परदेशी,प्रा रत्नाकर माळी,नेहाताई गवळी, बाबासाहेब वाघमारे,समियोद्दिन काजी,संघपाल सोनोने, दिपक वडमारे, भाऊसाहेब खिचडे, कैलास खानसोळे, आशिष इंगळे,आदींसह अनेकांनी आपले योगदान दिले.

चौकट:-

महायुती सरकार ने शिक्षकांची रास्त मागणी ५६ व्या दिवशी पूर्ण केली.त्याबद्दल संवेदनशील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षकांचे पालक शिक्षणमंत्री यांनी याविषयाला न्याय दिला
अनेक वर्षे अर्धपोटी काम करणाऱ्या शिक्षकांना पुढचा घास मिळाला. हा विजय आझाद मैदानावर ऊन वारा पावसात बसलेल्या हजारो शिक्षकांच्या एकजुटीचा व शिक्षक समन्वय संघाचा आहे.

बाबासाहेब वाघमारे. (समन्वयक)

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here