
अहमदपूर:-
मासूम शेख
- महाराष्ट्र विधानसभे च्या नवीन निवडणुकीचा बिगुल वाजला असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील तीन लक्ष 47 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणारा असून त्यासाठी 376 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राज्य शासनाच्या वतीने सर्वच स्तरावरची तयारी पूर्ण झाली आहे विधानसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार 746 पुरुष मतदार असून एक लाख 65 हजार 610 स्त्री मतदान आहे 376 मतदान केंद्रावर मतदान होणार असून मागील निवडणुकीच्या वेळेस 367 मतदान केंद्र होते त्यात नऊ मतदान केंद्राची भर पडले असून त्यात अहमदपूर मांडणी शिरूर ताजबंद दोन जानवळ हाडोळती दोन याचा समावेश करण्यात आले आहे 85 वर्ष वयावरील मतदाराची यादी तयार करण्यात आल्या असून घरपोच मतदानाची तयारीही करण्यात येणार असल्याचे सांगितले अहमदपूर तालुक्यात चार ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले असून त्यासाठी पोलीस प्रशासन ही सज्ज झाले आहे विभाग प्रमुखांच्या बैठकीत आचारसंहितेच्या पालन संबंधी सूचना करण्यात आले असून नगरपालिकेनेही शहरातील सर्व बॅनर काढून टाकले आहे त्यामुळे शहर बॅनर मुक्त झाले आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सौ मंजुषा लटपटे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला पांगरकर व नर्सिग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.