Home आपलं शहर *बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

*बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

0
*बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांनी दहा,दहा वर्षे आमदारकी भोगली आहे परंतु या भागाचा जसा विकास व्हावा तसा विकास झाला नसल्याकारणाने यावेळेस या मतदारसंघातील मतदारांनी बदल हवा चेहरा नवा अशी हाक ऐकायास भेटत असल्याकारणाने मी यावेळेस त्यांच्या सेवेखातरच अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे असे प्रतिपादन अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले .
ते पुढे असे म्हणाले की माझी निशाणी ही प्रेशर कुकर आहे कमी वेळेत जेवण तयार होतो तसेच कमी वेळेत विकास करावा यासाठी मला हे प्रेशर कुकर चिन्ह भेटले आहे त्यामुळे 62 वर्षाचा अनुशेष भरून काढण्याची हमी दिली ,या पत्रकार परिषदेस पुढे बोलताना असे म्हणाले की माझ्याबद्दल अपप्रचार करण्यात येत आहे की मी कोणालातरी पाठिंबा देईल परंतु त्या अफवांवर बळी पडू नये ही मतदारसंघातील मतदारांना विनंती केली या पत्रकार परिषदेस अक्षय काडवादे सह बालाजी पाटील चाकूरकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here