Home आपलं शहर *भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपुरात पत्रकार परिषद* *आमदार बाबासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन*

*भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपुरात पत्रकार परिषद* *आमदार बाबासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन*

0
*भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपुरात पत्रकार परिषद*   *आमदार बाबासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

236 अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे बाबासाहेब पाटील हे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे व अहमदपूर चाकूर तालुक्यातील भाजप प्रेमी मतदारांनी ही बाबासाहेब पाटील हेच आपले उमेदवार आहेत असे मानून त्यांनाच मतदान करावे असे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेमध्ये भाजपाचे वरिष्ठ नेत्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाप्रमाणे संकल्प पत्राचे विमोचन ही करण्यात आले त्यात सन्मान योजना 12 हजार होती ते 15 हजार एवढे करण्याचे ठरवले आहे तर शेतीवरील कर्जमाफी करण्याचेही ठरवले आहे असे एकूण 25 मुद्दे या संकल्प पत्रात आहेत त्या पत्राचे विमोचन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेला भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख ,भारत चामे, त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे, राजकुमार मजगे, वसंत डिगोळे, गोविंद गिरी व तसेच अहमदपूर तालुकाध्यक्ष प्रताप पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे असेही सांगण्यात आले की ज्या लोकांनी आदेश पाळला नाही त्या नेते व कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजन समितीने बरखास्त केले आहे त्यात गणेश हाके, बब्रुवान खंदाडे, बालाजी पाटील चाकूरकर, रेखाताई तरडे, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, बालासाहेब होळकर, हेमंत गुट्टे ,हनुमंत देवकते ,बालाजी गुट्टे ,माणिक नरवटे ,संतोष कोटलवार, आदींना निलंबित करण्यात आले आहे असेही ते शेवटी म्हणाले

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here