
अहमदपूर
मासूम शेख
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांना पुरस्कृत केले आहे परंतु हे करताना अहमदपूर चाकूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम व निरीक्षक यांनी बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नावाने पुरस्कृत केल्याचे पत्र जाहीर केल्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांना सामूहिकरीत्या पाठिंबा जाहीर केला आहे.
हा पाठिंबा जाहीर करत असताना चाकूर वंचित चे तालुकाध्यक्ष रामेश्वर हाके पाटील व उपाध्यक्ष रंगनाथ वाघमारे यांनी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना व पक्षश्रेष्ठींना सवाल विचारला की प्रत्येक निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता त्यांच्यावर भाजपामधील आयात केलेले उमेदवार लादले जातात आम्ही मात्र चार वर्षे अकरा महिने पक्षाचे निष्ठेने काम करतो परंतु उमेदवार देताना आम्हाला विचारात घेतले जात नाही अशी नाराजी व्यक्त करत त्यांनी विनायकराव पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. अहमदपूर तालुका वंचित चे महासचिव मौलाना हाफिज बिलाल यांनी अहमदपूरच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सदस्य परमेश्वर आबा घोगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अहमदपूर चाकूरचे पदाधिकारी रामेश्वर भाऊसाहेब हाके पाटील, रंगनाथ बळीराम वाघमारे, मुस्तफा गुडसाब दापकेवाले, फिरोज गैबी साब सय्यद, कांबळे बाबासाहेब कचरू, नवनाथ हाके, सचिन महालिंगे अहमदपूर वंचित चे पदाधिकारी रहमानखान पठाण, रमेश हनुमंते ,भिमराव कांबळे, संतोष गायकवाड, बालाजी थिटे, चंद्रकांत कांबळे, मौलाना बिलाल हुसेन साहब आदी पदाधिकारी उपस्थित होते