Home आपलं शहर *विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि मेहनतीवर जीवन घडवावे* *पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन* *यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा*

*विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि मेहनतीवर जीवन घडवावे* *पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन* *यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा*

0
*विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि मेहनतीवर जीवन घडवावे* *पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन* *यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा*

अहमदपूर:-
मासूम शेख

प्रचंड स्पर्धेच्या जगात जीवनात नेत्रदीपक यश प्राप्त करण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वयसिस्त, संयम आणि प्रचंड मेहनतीवर आपले उज्वल भवितव्य घडवावे असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी केले.
ते यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर पर्यवेक्षक
शिवाजी सूर्यवंशी, स्वंयशासन दिनाच्या मुख्याध्यापिका साधना बैकरे, उप मुख्याध्यापक ज्ञानदा दाचावार, सोहम देशमुख, पर्यवेक्षक राही डावळे, साईराज मुंडे, गहिनीनाथ क्षिरसागर, विभाग प्रमुख आर व्ही पाटील, डॉ. शरद करकनाळे यांच्यासह यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी गहिनीनाथ क्षिरसागर, सृष्टी बेरळकर, सोहम देशमुख, साधना बैकरे यांचे मनोगत पर भाषणे झाले.
प्राचार्य गजानन शिंदे यांच्या भाषणाने अध्यक्षीय समारोप करण्यात आला.
प्रास्ताविक आर व्ही पाटील यांनी केले सूत्रसंचालन डॉ. शरद करकनाळे यांनी तर आभार धनंजय तोकले यांनी मांनले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here