Home आपलं शहर *किनी कदू येथे सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह आणि परमरहस्य ग्रंथाचे पारायण सोहळा उत्साहात साजरा* *सकल मानव जातीच्या कल्याणासाठी शिव सप्ताहामध्ये सहभागी व्हावे* *शि भ प प.पू. दिगांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांचे प्रतिपादन*

*किनी कदू येथे सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह आणि परमरहस्य ग्रंथाचे पारायण सोहळा उत्साहात साजरा* *सकल मानव जातीच्या कल्याणासाठी शिव सप्ताहामध्ये सहभागी व्हावे* *शि भ प प.पू. दिगांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांचे प्रतिपादन*

0
*किनी कदू येथे सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह आणि परमरहस्य ग्रंथाचे पारायण सोहळा उत्साहात साजरा* *सकल मानव जातीच्या कल्याणासाठी शिव सप्ताहामध्ये सहभागी व्हावे* *शि भ प प.पू. दिगांबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

आज कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल्या कामकाजामध्ये व्यस्त असून त्याचे कुटुंब आणि कुटुंबातील सदस्य यांचे नातेगोते यांच्यावर फारसे लक्ष नाही. त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. समाजातील ही अस्थिरता दूर करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने परमेश्वराचे नामस्मरण चिंतन मनन करून युवकांना संस्कारक्षम करावे असे अभूतपूर्व कार्य शिव सप्ताहाच्या माध्यमातून केले जाते असे आग्रही प्रतिपादन वसमत थोरला मठाचे मठाधिपती परमपूज्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी केले.
ते अहमदपूर तालुक्यातील किनी कदू येथील आयोजित सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह च्या समारोपप्रसंगी आशीर्वचन पर मार्गदर्शन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे, बाजार समितीचे संचालक किशन पाटील, शिवानंद हैबतपुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या अखंड सप्ताहामध्ये शिवपाठ, राष्ट्रसंत परमपूज्य डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या परम रहस्य पारायण, बसवकथा, गाथा भजन, शिवपाठ आणि रात्रीच्या सुमाराला महाराष्ट्रातील नामवंत शिवाचार्याच्या कीर्तनाची सेवा होती.
ग्रामस्थांच्या वतीने त्रिकाल वंदनी जग ज्योती महात्मा बसवेश्वर, परमपूज्य मन्मथस्वामी , राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि वीर मठ संस्थांचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची गावातून शोभायात्रा काढून मूर्तीची प्राण प्रतिष्ठापणा वीरमठ संस्थांनचे मठाधिपती परमपूज्य राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तीन ते पाच च्या दरम्यान शि भ प अडवोकेट शिवानंद हैबतपुरे यांची सुश्राव्य बसवकथा घेण्यात आली.
या अखंड शिवनाम सप्ताहाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यात 50 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले.
डॉ. तुकाराम नलवाड यांच्या वतीने मोफत बी पी शुगर ची तपासणी भाविक भक्तांची करण्यात आली.
सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह मध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हजेरी लावली होती. त्यात निलंगा विरक्त मठाचे शि भ प संगनबसव महास्वामी, सद्गुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर, सद्गुरु शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर, सद्गुरु डॉक्टर सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, सद्गुरु सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गेल्या पन्नास वर्षापासून गावातील अन्नदाते या सप्त्यासाठी अन्नदान करतात. त्या अन्नदात्यांचा सन्मान परमपूज्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
सुवर्ण महोत्सवी अखंड शिवनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी सप्ताह समितीचे अध्यक्ष शि भ प विठ्ठलराव गुडमे, उपाध्यक्ष वैजनाथ मुरडे, शि भ प शिवलिंग पाटील, रामेश्वर भुरे, दिलीप शेंबाळे, संजय भुरे, भगवंतराव पाटील, माधव शेंबाळे, राजू तरगुडे,प्रा.व्यंकटराव भुरे, पद्माकर पाटील, शिवदास पाटील, नरसिंग मटके, आर आर पाटील, राजू पाटील, ओम पाटील, राहुल शेंबाळे, राजेंद्र भुरे, परमेश्वर भुरे, अंकुश पाटील, व्यंकटी पाटील, विश्वंभर मटके, काशिनाथ हिपळगावे, भास्कर पाटील, परमेश्वर भुरे आणि सप्ताह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here