Home आपलं शहर पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत सिटीस्कॅन आज पासून सेवा सुरू

पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत सिटीस्कॅन आज पासून सेवा सुरू

0
पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालयात नागरिकांसाठी मोफत सिटीस्कॅन आज पासून सेवा सुरू

भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील एकमेव पंडित भीमसेन जोशी सामान्य रुग्णालय येथे सामान्य नागरिकांसाठी आज सोमवार दिनांक 28 एप्रिल पासून मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी सोबत इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. विशेष म्हणजे शासनातर्फे राज्य शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅनची व्यवस्था करून देण्यात येते. त्याच धर्तीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मीरा भाईंदर मधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी सर्व प्रकारची मोफत सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे.

या सेवेचा फायदा प्रामुख्याने टेंबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या अंतररूग्ण IPD तथा बाह्यरुग्ण OPD रुग्णांसाठी होणार आहे. तसेच जे नागरिक येथे उपचार घेत नसतील पण त्यांना जर सिटीस्कॅन सेवा हवी असेल तर त्यांना देखील अगदी माफक दरात सिटीस्कॅन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सदरची सेवा ही दिवस रात्र म्हणजेच 24 ×7 चालू राहणार आहे. सद्यस्थितीला सदर सेवा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून कृष्णा डायग्नोस्टिक याना देण्यात कंत्राट देण्यात आला आहे. या प्रसंगी सदर सीटी स्कॅन मशीनचे विधिवत पूजा करून श्री नरेंद्र मेहता हांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सदर रुग्णालयाचे प्रमुख जाफर तडवी, सदर कृष्णा डायग्नोस्टिकचे संचालक बल्लाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here