
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचा चिन्ह गोठवल्यानंतर राज्यात शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर राऊतांचा हा व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोपामध्ये गुंतले आहेत. दुसरीकडे शिवसेनेची तोफ संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे असे भाकित केले होते. राऊतांच्या या भविष्यवाणीची सध्या सोशल मिडीयातही मोठी चर्चा रंगली आहे.
संजय राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या मदतीने सुरत व्हाया गोवाहाटी मध्ये जाऊन बंड केला. शिवसेनेत या बंडखोरीने दोन गट पडले. फुटीर शिंदे गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा केला. संजय राऊतांनी यानंतर शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांवर घणाघात चढवला होता. संजय राऊतांच्या आक्रमकतेने राज्यातील शिवसैनिक चवताळून उठला होता. अखेर कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी ‘ईडी’ने संजय राऊत यांना अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘ईडी’ने संजय राऊत यांना अटक करताच शिंदे गटाच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला. संजय राऊत यांनी ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा पेढे, असे विधान केले होते.
संजय राऊत यांचा प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेला ओळख म्हणून वाघ चिन्ह तर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेले. राज्यात यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जातो आहे. एका प्रादेशिक पक्षाला संपवल्याचा शिंदे गटावर ठपका सोशल मीडियातून ठेवण्यात आला आहे. तसेच जोरदार टीकास्त्र सुरु आहेत. अशातच संजय राऊत यांच्या महाराष्ट्र कमजोर होतोय, हे भाकित करणारे विधान जोरदार व्हायरल झालं आहे. अनेकांनी संजय राऊतांनी वर्तवलेल्या भाकितांवरून भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्येष्ठ नेत्यांना डावलणारा भाजप पक्ष आगामी काळात शिंदेंना किती सहकार्य करेल, असा प्रश्न ही सोशल मीडियातून विचारला जातो आहे.
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
a45com https://www.a45com.org
jilibet004 https://www.jilibet004.org
philbet https://www.philbetts.net
fg777link https://www.befg777link.com