
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
नाशिक येथील म्हसरुळ भागात एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका महिलनेनं तिच्या पतीला भुलीचं इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पेशानं डॉक्टर असलेल्या व्यक्तीवर जवळपास ३२ दिवस रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला.
सतीश देशमुख असं मृत पावलेल्या डॉक्टरचं नाव आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराने डॉ. देशमुख यांना भुलीचे इंजेक्शन देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीचे इतर व्यक्तीशी संबंध असल्याचं डॉक्टर देशमुख यांना कळलं होतं. त्यानंतर देशमुखांची पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्यात वाद निर्माण झाला. १० सप्टेंबर रोजी देशमुखांची पत्नी आणि प्रियकर सतिश १० सप्टेंबर रोजी क्लिनिकमध्ये आले होते. त्यावेळी दोघांनी देशमुखांसोबत वाद सुरु केला.
त्यानंतर त्यांच्या पत्नीने भुलीचे इंजेक्शन देऊन देशमुखांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घडलेला संपूर्ण प्रकार देशमुखांनी त्यांच्या मुलाला सांगितला. त्यानंतर त्यांच्या मुलाने याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली. तेव्हापासून देशमुखांवर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांचा मृत्यू झाला. पोलीसांनी या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
nustaronline https://www.umnustaronline.org