
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रत्येकजण आपलं काम करीत असतो. मी जे करतेय ते कामातून लोकांसमोर येत आहे. आपण केवळ कृतीतून लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला नेता सपोर्ट करीत असेल तर आपण त्याबरोबर जायला हवं. असं दिपाली सय्यद यांनी एक सूचक विधान केलं.
मागील काही दिवसांपासून माझा आवाज ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही. असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.
त्यामुळे त्या शिंदे गटात जाणार, असं दिसून येत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मागील काही दिवसांपासून सय्यद ह्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. सुषमा अंधारे शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर दिपाली सय्यद नाराज असल्याचं बोललं जात आहे.
bet777app https://www.bet777appv.org
phtaya1 https://www.phtaya1.org
tg77com https://www.tg77com.org