
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतांश भागात मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले ही घटना तब्बल दोनवेळा झाल्याने भीतीने अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.३ इतकी नोंदवण्यात आली आहे. रात्रीला झालेल्या या भूकंपाचे केंद्रस्थान नेपाळमध्ये मणिपूर या ठिकाणी जमिनीच्या आत १० किलोमीटर खोल असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेपाळ मधील काही भाग देखील या भूकंपाने हादरला असून एकूण ६ जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आहे.
काल रात्री ९ वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेशातील लखनऊ व आजपासच्या भागात प्रथम भूकंपाचे धक्के जाणवले होते ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.९ इतकी होती. त्यानंतर काही तासानंतर मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास राजधानी दिल्ली व उत्तर भारतात जास्त तीव्रतेचे भूंकपाचे धक्के जाणवले. भारतात झालेल्या भूकंपामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्ता हानी झाल्याची नोंद नाही. मात्र नेपाळच्या बाबतीत ही जीवितहानी करणारी नैसर्गिक आपत्ती ठरली.
भारतात दोनदा भुकंपाचे धक्के जाणवले असले तरी नेपाळ अवघ्या २४ तासांत तीनवेळा भूकंपामुळे हादरला असून सध्या तिथे झालेल्या मालमत्ता हानीबाबत कुठलीही माहिती समोर आली नाही. यापूर्वी नेपाळने भूकंपांची सर्वात मोठी हानी सहन केली होती, ज्यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला होता तसेच प्रचंड मालमत्ता हानी झाली होती.