Home आपलं शहर डाव्या विचारसरणीला चिरडून टाकण्याची गरज आहे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण

डाव्या विचारसरणीला चिरडून टाकण्याची गरज आहे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण

0
डाव्या विचारसरणीला चिरडून टाकण्याची गरज आहे – कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सावरकरांचा नेहमीच गौरव केला आहे. परंतु ही डाव्या विचारसरणीचे मंडळी आपल्यासारख्या उजव्या विचारसरणीच्या लोकांना खिजवण्याचे काम करीत आहे. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन ही डावी विचारसरणी चिरडून टाकण्याची गरज असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी वीर सावरकर गौरव यात्रे च्या समारोप प्रसंगी डोंबिवली येथील आप्पा दातार चौकात सांगितले.

काँग्रेसचे नेते आणि निलंबित खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याबद्दल डोंबिवली येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने एका गौरव यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेच्या समारोप प्रसंगी व्यासपीठावर नामदार रवींद्र चव्हाण यांच्यासह लोकसभा खासदर डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रमेश पाटील माजी राज्यमंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण जिल्हा भाजपचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली शिवसेना शहर शाखेचे प्रमुख राजेश मोरे उपस्थित होते.

यावेळी नामदार चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्या वर्तमानपत्रात जे काही लिहून येत होतं. त्याचा राग विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात होता. नऊ महिन्यापूर्वी एक उठाव होऊन, हा मनातील राग बाहेर उफाळून आला. शंभर कॅरेट असलेलं सोन्यासारखं हिंदुत्वाचं ईडी सरकार या महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आले. त्यामुळेच या डाव्या विचारसरणीच्या मंडळींमध्ये पोटात दुखायला सुरुवात झाली आहे. आता यावर एकच औषध आहे ‘जो हिंदू हितकी बात करेगा, वही देश पे राज करेगा’ संपूर्ण राज्यामध्ये हेतू पुरस्सर अशी वक्तव्य केली जातात. अशामुळे विकास कामे भरकटली जात आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा आणि उजव्या विचारसरणीचा विचार हा घराघरात पोहोचवण्याचे काम आपण केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नव्हे तर जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने आपण जात आहोत. त्यामुळे हिंदुत्व आणि उजवी विचारसरणी पुढे नेण्याचे काम आपणच केले पाहिजे. हाच विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितला होता. उजवी विचारसरणी दाबण्याचे काम डावी विचारसरणी करीत आहे. त्याविरोधात आपण पेटून उठून काम केले पाहिजे.

खासदर डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, की रविवारी सकाळी नाशिक भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म गावी गेलो होतो. वीर सावरकरांना अभिवादन करण्यासाठी. सावरकरांचे विचार हे तरुण मंडळींनी आत्मसात केले पाहिजे. १४ वर्ष त्यांनी जन्मठेप भोगली. ते स्थळ मी पाहिले असून १४ मिनिटे देखील आपण तिथे काढू शकत नाही. अशी त्या सेल्युलर जेल ची अवस्था आहे असे ते म्हणाले.

 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here