Home आपलं शहर *उच्चशिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन*…. … प्रा बालाजी आचार्य *वाघंबर परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांना कपडे वाटप*

*उच्चशिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन*…. … प्रा बालाजी आचार्य *वाघंबर परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांना कपडे वाटप*

6
*उच्चशिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन*….    … प्रा बालाजी आचार्य    *वाघंबर परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांना कपडे वाटप*

अहमदपूर:-
मासूम शेख

उच्च शिक्षण हे बुध्दीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातील दुर्बल, मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळायला पाहिजे उच्च शिक्षणातूनच समाजाची प्रगती होते उच्चशिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे असे प्रतिपादन अहमदपूर येथील कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर याच्या परिवाराने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या औचित्याने गोर गरीब महिलांना कपडे वाटप डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याते प्रा बालाजी आचार्य यांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण महर्षी शिवानंद हेगणे तर उद्घघाटक सामाजिक युवक नेते डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी , उद्योजक प्रकाश फुलारी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा बालाजी आचार्य प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे , आर. जी. कांबळे, ग्रामसेवक किनगाव, प्रा. बाबासाहेब वाघमारे, आशिष तोगरे, अजहर बागवान, नीलकांत पाटील, राहुल शिवपुजे, मुसाभाई तांबोळी न.प., स्वरूप चिर्के, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, वसंतराव आचार्य, सुरेखाताई आचार्य, प्रकाश राठोड, डी बी कांबळे, आचल ओस्तवाल, गणेश मदने, हुसेन मणियार, भांगे सर, मुख्याधिपिका दर्शना हेंगणे मा नगरसेविका शाहूताई कांबळे शिक्षक पत संस्थेचे चेअरमन सुजीत गायकवाड, शेख अफरोज भाई, तलाठी महेश गुपिले,बिराजदार साहेब, कांताबाई आचार्य, शकुंतलाबाई बनसोडे आदि उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली यानंतर अंजलीताई वाघंबर या प्रस्ताविकपर भाषणात म्हणाल्या की
कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संकल्पनेतून गेल्या ३४ वर्षापासून महिलांना कपडे वाटप व तिळगुळ देऊन शुभेच्छा कार्यक्रम या सामाजिक उपक्रमांची सुरुवात माझे सासरे भाऊसाहेब वाघम्बर यांनी केली त्यांचा वारसा आम्ही माझे पती अरुण वाघम्बर हे आणि मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून हा कार्यक्रम असाच चालू ठेवणार आहोत असे आपल्या प्रास्ताविक पर भाषणात अंजली वाघमारे या म्हणाल्या. या कार्यक्रमात पुढे बोलताना प्रा आचार्य यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचा इतिहास सविस्तर मांडला आणि या नामांतर लढ्यात कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचे फार मोठे योगदान होते त्यांनी नामांतरासाठी मोठा लढा लातूर जिल्ह्यात उभा केला होता त्यांनी नामांतर लढ्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, अहमदपूर येथे जेल भोगली असून त्यांचे खूप मोठे योगदान नामांतरासाठी आहे असे प्राध्यापक आचार्य सर आपल्या भाषणात म्हणाले. तत्पूर्वी सुजित गायकवाड, आणि डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी यांनी कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचा सामाजिक उपक्रमाचा वारसा पुढे चालवत असल्याबद्दल अरुण भाऊसाहेब वाघंबर, परिवाराचे कौतुक केले. यानंतर शिवानंद हेगणे यांनी सर्वाचे कौतुक करत कर्तुत्ववान कर्मवीर भाऊसाहेब , अरुणभाऊ आणि अंजलीताई यांना साथ देऊन त्यांच्या फाऊडेशन ला मदत करण्याचे आश्वासन दिले यानंतर या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व 485 महिलांना साडी -चोळी कपड्याचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक, निमंत्रक- अरुण भाऊसाहेब वाघंबर माधव झुबरे, बालाजी भोगे, आदित्य वाघंबर, चेतन लामतुरे, रितेश वाघम्बर, राजकुमार आचार्य,शुभम वाघम्बर, आकाश व्यवहारे, विकास व्यवहारे, अनिल वाघमारे, डॉन वाघमारे, सुशील आचार्य, तेजस बनसोडे, सौ अंजली वाघंबर, अश्विनी वाघंबर, दैवशाला वाघम्बर, कांताबाई आचार्य ,रसिका बनसोडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्यानंतर या कार्यक्रमात संध्याकाळी भीमशाहिर यादव परतवाय , सुभाष साबळे यांच्या परिवर्तनवादी भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार माधव झुबरे यांनी सर्वांचे मानले..

Spread the love

6 COMMENTS

  1. Yo, just downloaded from goagamesapk. Seems legit, got a bunch of cool mods and older versions I was looking for. Fingers crossed no dodgy stuff, but so far so good! Worth checking out if you’re hunting for those specific APKs.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here