Home आपलं शहर *एनएसएस मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या सोडविण्याचे सामर्थ्य येते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर*

*एनएसएस मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या सोडविण्याचे सामर्थ्य येते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर*

0
*एनएसएस मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या सोडविण्याचे सामर्थ्य येते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर*

अहमदपूर:-
मासूम शेख

एनएसएस शिबिराच्या माध्यमातून देशाचा आधारस्तंभ घडत असतो. एनएसएस स्वयंसेवक शिबिराच्या दरम्यान गावच्या विविध समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतात आणि ग्राम संस्कृतीशी एकरूप होतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव तथा युवा नेते पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निवासी विशेष शिबीर मौजे हसर्णी ता. अहमदपूर येथे दि. २५ ते ३१ जानेवारी २०२५ दरम्यान संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा ज्येष्ठ सदस्य ज्ञानदेव झोडगे हे होते. तर किसान मंचावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, अजित पाटील तोंडचिरकर यांच्यासह अहमदपूरच्या पीएसआय स्मिता जाधव, सरपंच वैशाली करे, प्रा. डॉ. रमेश गंगथडे, माजी सरपंच बालाजी गंगथडे, उपसरपंच बालाजी राऊतराव, तंटामुक्ती अध्यक्ष विलास राऊतराव, पोलीस पाटील गिरजाप्पा परीट, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा तिडोळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शादुल्ला शेख, शिवाजी गौंड, बळीराम गौंड, नारायण गव्हाळे, बाबुराव करे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा देशमुख, वनिता नरवटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी पुढे बोलतांना पृथ्वीराज पाटील एकंबेकर म्हणाले की, अशा शिबिराच्या माध्यमातून समाज उपयोगी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातूनच राष्ट्राची जडणघडण होते. तसेच शेतकऱ्यांचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी महाविद्यालयाने ‘माती परीक्षण’ सारख्या प्रयोगशाळा सुरू करून शेतकरी बांधवांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या समारोप कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या मनोगतातून म्हणाले की, देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासात एनएसएसच्या स्वयंसेवकाचे सेवा, समर्पण, त्याग आणि संयम गुणांचे योगदान आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव यांनी स्वानुभवातून स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्याच्या वतीने कु. ऋतुजा देशमुख, गोवर्धन जाधव, कु. वनिता नरवटे, कु. प्रतीक्षा राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. तर ग्रामस्थांच्या वतीने व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. रमेश गंगथडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शादुल्ला शेख आदींनी आपल्या मनोगतातून शिबिराच्या यशस्वीते बद्दल भाष्य केले. याबरोबरच सन २०२४-२५ चे एनएसएस उत्कृष्ट स्वयंसेवक सागर जंगापल्ले व ओम मुंढे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शिबीर अहवाल कार्यक्रमा- धिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी सादर केला व सूत्रसंचालन ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले. यावेळी ग्रामस्थांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व एनएसएसचे स्वयंसेवक विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here