मिरा-भाईंदर महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळेचा अजब कारभार!
भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचे कारण सांगून मंगळवार दिनांक 03 जून 2025 रोजी काही ठराविक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. या पदोन्नती देण्यात आलेल्यांपैकी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या काही अधिकाऱ्यांना देखील ‘आश्चर्यकारक’ पद्धतीने महत्त्वपूर्ण पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा (भा.प्र.से.) यांच्या हस्ते, उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे यांच्या उपस्थितीत पदोन्नतीचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी असलेले प्रकाश बोराडे यांची उप- मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत असलेले अल्पेश संखे, सदानंद पाटील, डॉसन ढोल्या व प्रशांत गुरव यांना अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. लेखा विभागात कार्यरत असलेले लेखाधिकारी उत्तम तारमाळे यांना उप- मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्युत विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेले प्रशांत जानकर यांना शाखा अभियंता (विद्युत) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे त्या त्या विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचा दावा केला जात असला तरी या पदोन्नती दिलेल्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अग्निशमन विभागाचे केंद्र अधिकारी असलेले प्रकाश बोऱ्हाडे यांचेवर अग्निशमन विभागातील वाहन खरेदी प्रकरणात तसेच कर्मचारी निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप झालेले असून त्या प्रकरणांची सद्ध्या चौकशी सुरू आहे. या भ्रष्टाचारा बाबत अनेक वर्तमान पत्रातून बातम्या देखील छापून आलेल्या आहेत.
त्याच प्रमाणे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागात आणि सद्ध्या विद्युत शाखेत कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले प्रशांत जानकर यांना तर शौचालय स्प्रे पंप खरेदी प्रकरणात लाखों रुपयांचा भ्रष्टाचार केले म्हणून ‘दोषी’ ठरविण्यात आले असून प्रशांत जानकर यांचेकडून तब्बल सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. या भ्रष्टाचार प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना भविष्यात कोणत्याही परिस्थितीत वेतनवाढ आणि पदोन्नती देण्यात येणार नसल्याचे सेवा पुस्तिकेत नोंद असून देखील त्यांना बेकायदेशीरपणे पदोन्नती देण्यात आल्यामुळे या पदोन्नती प्रकरणात देखील भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुळात एखाद्या अधिकाऱ्याला पदोन्नती देताना त्यांच्या सेवा पुस्तिकेचे मूल्यमापन केले जाते. अधिकाऱ्यांची कार्यपद्धती, कार्याची सचोटी, निष्कलंक प्रतिमा याचा सर्वांकष अभ्यास करूनच पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु ह्या वेळी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिंपळे यांनी पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तपासून पाहिली का? आणि जर पाहिली असेल आणि तरी जर ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली गेली असेल तर या पदोन्नती प्रक्रियेत नक्कीच भ्रष्टाचार झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त तथा प्रशासक राधा बिनोद शर्मा यांनी नुकताच आपल्या आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळलेला आहे. त्यांना अजून महापालिका प्रशासनाच्या सर्व विभागांची आणि अधिकाऱ्यांची ओळख देखील झालेली नाही. आणि म्हणून कदाचित त्यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पार्श्वभूमीची माहिती दिली गेली नसावी किंवा त्यांची दिशाभूल करून ही पदोन्नती प्रक्रिया पार पाडली असावी अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी असून अत्यंत शिस्तप्रिय आणि कठोर अधिकारी असल्याची त्यांची ख्याती आहे. असे असताना त्यांच्या कार्यकाळात जर अशा प्रकारे भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली गेली तर त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतील आणि म्हणून आता ते या प्रकरणात काय निर्णय घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.com/id/register?ref=UM6SMJM3
Keno’s about balancing probability & fun, right? Seeing platforms like arionplay casino offer diverse games-slots, fishing, live tables-shows a commitment to player choice. Registration seems straightforward too, which is a plus! 👍