Home आपलं शहर दोन डोस घेतलेल्यांना येत्या ‘१५ ऑगस्ट’ पासून लोकल प्रवसाची परवानगी..

दोन डोस घेतलेल्यांना येत्या ‘१५ ऑगस्ट’ पासून लोकल प्रवसाची परवानगी..

0
दोन डोस घेतलेल्यांना येत्या ‘१५ ऑगस्ट’ पासून लोकल प्रवसाची परवानगी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दीड वर्षा पासून कोविड काळामध्ये उभारलेल्या महाभयंकर महामारीत मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी राज्याच्या प्रशासनाकडे विनंती केली आहे. आपणां सर्वास माहीतच आहे की अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही तोवर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष काढून आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाश्यांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना आपण येत्या १५ ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल ऍपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील.

सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर ‘क्यूआर कोड’ असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल
मी आपणांस विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या किंवा बेकायदेशीर रित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व त्याचा पुरावा सोबत ठेऊन प्रवास करावा अशी मी विनंती करतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here