Home आपलं शहर नाताळच्या पूर्वसंध्येला आय.सी. कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंटचे लोकार्पण सोहळा संपन्न !

नाताळच्या पूर्वसंध्येला आय.सी. कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंटचे लोकार्पण सोहळा संपन्न !

0
नाताळच्या पूर्वसंध्येला आय.सी. कॉलनीमध्ये सेल्फी पॉइंटचे लोकार्पण सोहळा संपन्न !

जगदीश काशिकर, मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 01 या आपल्या प्रभागात सर्वाधिक उद्याने असून यामागे आपले सर्वांचे सहकार्य असल्याचे शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. एक व्हिजन ठेऊन नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी याठिकाणी विभागाचा कायापालट केल्याचे सांगत आपण याचे साक्षीदार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या पुनर्विकास आराखड्यात शहरासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कार्यरत असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. बोरिवली पश्चिमेकडील आय. सी. कॉलनी रहिवाशासाठी नाताळच्या पूर्वसंध्येला काल एका लक्षवेधी सेल्फी पॉइंटचे लोकार्पण करण्यात आले. शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. आय सी कॉलनी, आय. सी.रेसिडन्सी याठिकाणी संध्याकाळी ह्या सेल्फी पॉइंटचे उदघाटन सेंट लुईस चर्चचे फादर रोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.आय.सी. कॉलनीतील ह्या आकर्षक सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून स्वच्छ- सुंदर आय. सी. कॉलनी हे ब्रीदवाक्य खरोखरच सार्थ ठरेल असे माजी नगरसेवक, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी वुमन वेल्फेयर असोसिएशनचे अध्यक्ष ईव्हान डिसूज़ा, आय.सी.सी.आर.डब्ल्यू .ए. चे किशोर मारवाड़ी, आय.सी.कॉलनी स्पोर्ट्स क्लबचे सचिव दयानंद कुमार, मुंबई मोहल्ला कमिटी मोमेंट ट्रस्टचे मेरी डिसूज़ा, विधानसभा संघटक बालाकृष्णा ढमाले, शाखाप्रमुख राजेन्द्र इंदुलकर,भूपेंद्र कवळी, आय. सी विजनचे रैंडल परेरा, शाखा संघटक जुड़ी मेंडोसा, युवासेना शाखा अधिकारी जितेन परमार, शाखा समन्वयक दर्शित कोरगावकर सहित स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here