
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘इंदु मिल’च्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने म्युझियम उभं करण्यात यावं यासाठी मागणी केली होती मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी इंदू मिलमध्ये पुतळा बसवण्याची मागणी केली, त्याच विषयावर आज चर्चा झाली.
आता पुतळ्यासोबत म्युझियम देखील उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. त्याच विषयावर रूपरेषा ठरवण्यासाठी चर्चा झाली. येवढंच या बैठकीत झालं बाकी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. तर त्यांनी शिवसेने सोबतच्या युतीवर भाष्य केलं ते म्हणाले, “काँग्रसवाल्यांनी आम्हाला वापरायचं तेवढं वापरलं, तरीही आम्ही कधीही भाजप सोबत जाण्याचा विचार केला नाही. सेने सोबतच्या युतीवर ऑफर आम्ही त्यांना दिली होती मात्र त्यांच्या समोर एक अट ठेवली होती की, तुम्ही भाजपची साथ सोडा परंतु सेना त्यावेळी साथ सोडायला तयार नव्हती. मात्र आता युतीचा चेंडू उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे.” त्यामुळे आजूनही ठाकरे-आंबेडकर ऐकत्र येतील की नाही हे अजून तरी स्पष्ट झालं नाही.
peso99 https://www.repeso99.net
okbet15 https://www.okbet15.org
okebet3 https://www.okebet3u.org