
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
यंदाही दरवर्षी प्रमाणे नांदिवली पंचानंद येथील गावदेवी आईचा मानाच्या साडीचा व अलंकाराचा पालखी सोहळा बुधवारी दुपारी संपन्न झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदिवली गावात देवीची पालखी काढण्यात आली होती. पालखीच्या मिरवणुकीमध्ये पारंपारिक गीते बँडवर वाजवण्यात आली. या पालखीच्या मिरवणुकीत सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीमध्ये गुलाल उधळत पालखी उत्सवानिमित्त आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पारंपारिक गीतांवर सगळ्याच आबाल वृद्धांनी ठेका धरला होता. पालखी गावदेवीच्या देवळाजवळ आल्यानंतर फटाके वाजवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावदेवी आईचे आरती करून सर्व भक्तांना प्रसाद वाटण्यात आला.


गावदेवी मंदिराचे अध्यक्ष चांगदेव सिताराम म्हात्रे, उपाध्यक्ष तुकाराम पुंडलिक म्हात्रे, उमेश बाबूराव पाटील, जितेंद्र मधुकर म्हात्रे, अनिल सिताराम म्हात्रे, वर्गीस पदू म्हात्रे, विजय म्हात्रे, दीपक कृष्णा म्हात्रे, बंडू पदू म्हात्रे, यशवंत बाबुराव म्हात्रे, दिनेश अनंता पाटील, बबन हनुमान म्हात्रे, जनार्दन विठ्ठल म्हात्रे, राजेंद्र हरिश्चंद्र म्हात्रे आणि इतर पदाधिकारी, महिला गावदेवी आईचा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी झटत होते.
गावदेवी पालखी उत्सवाचे ४९ वे वर्ष असून, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षात गावदेवी आईचा उत्सव प्रवेश करणार आहे. सुवर्ण महोत्सव मोठ्या धुमधडाकात व उत्साहात गावदेवी आईचा पालखी सोहळा करण्यात येईल. असे गावदेवी उत्सव मंडळाचे पदाधिकारी अनिल सीताराम म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. या गावदेवी देवळात दरवर्षी गुढीपाडव्याला भंडाऱ्याचा मोठा सोहळा आयोजित करण्यात येत असून सुमारे ५००० भक्तगणांना महाभोजनाचा लाभ दिला जातो. गावदेवी ही नांदिवली पंचानंदची नवसाला पावणारी जागृत ग्रामदेवता असल्याचे गावदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नांदीवली पंचानंद येथील ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी या गावदेवी पासळखी सोहळ्याचे आयोजन केले होते.
fg777link https://www.befg777link.com
phtaya 63 https://www.phtaya-63.org
philucky https://www.usphilucky.org