
अहमदपूर:-
मासूम शेख
236 विधानसभा अहमदपूर – चाकुर मतदार संघ निवडणुक कार्य उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ. मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, 236 विधानसल अहमदपूर – चाकुर मतदार संघ निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यापासून दोन्ही ट्रेनिंगचे कार्य, पोस्टल मतदान, दिव्यांग मतदान इत्यादी निवडणुकीचे कार्य उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ. मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष अहमदपूर तालुका अध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी, सचिव शिवाजी गायकवाड, कोर्याध्यक्ष उदयकुमार गुंडीले, संघटक डॉ. बालाजी गोविंदराव कारामुंगीकर, जेष्ठ पत्रकार दिनकर मद्येवाड, सहसचिव बालाजी तोरणे पाटील, उपाध्यक्ष प्रा. मारोती बुद्रूक पाटील, बालाजी पारेकर, महादेव महाजन, धम्मानंद कांबळे, संदिप गुंडरे, मासुम शेख आदींची उपस्थिती होती.
यावेळी सत्काराला उत्तर देताना निवडणुक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे म्हणाल्या की, निवडणुक कार्य उत्तम व पारदर्शी होण्यासाठी माझ्या सर्व टिमने उत्तम कामगिरी केली आहे या सर्वांचे मोलाचे योगदान आहे. पोलिस प्रशासनानेही आम्हास चांगले सहकार्य केले. सदरील सत्कार आम्हास नविन पुढिल कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव शिवाजी गायकवाड यांनी केले. तर यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे, प्रा. विश्वंभर स्वामी आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रचंलन डॉ. बालाजी कारामुंगीकर यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी मानले.