Home आपलं शहर *बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावे- तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे आवाहन*

*बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावे- तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे आवाहन*

0
*बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावे-                               तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे आवाहन*

अहमदपूर:-
मासूम शेख

अहमदपूर तालुक्यातील सर्व अतिवृष्टी /पूर बाधीत शेतकर्‍यांनी लवकर विनाविलंब करता आवश्यक ते कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहे सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी / पूर यामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकर्‍यांना अनुदान मदत सन 2024 मध्ये एकुण बाधिक शेतकरी संख्या 57404 पैकी 45420 बाधीत शेतकर्‍यांच्या याद्या डीबीटी पोर्टलव्दारे अपलोड करण्यात आल्या आहेत. तसेच बाधीत शेतकर्‍यांना व्हीके नंबर प्राप्‍त झाल्यानंतर ईकेवायसी केल्यानंतर तपासणी करुन शासन स्तरावरुन अशा शेतकर्‍यांना मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे. 45420 अपलोड पैकी 36015 या शेतकर्‍यांनी ईकेवायसी केली असुन 9405 शेतकरी यांची ईकेवायसी करणे प्रलंबित आहे. सदरील शेतकर्‍यांनी विनाविलंब बाधीत शेतकरी यांनी तात्काळ ईकेवायसी आपल्या जवळच्या महा ई सेवा केंद्रावरुन करुन घ्यावी. तसेच शिल्‍लक असलेल्या बाधीत शेतकर्‍यांनी आपले आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफ सी कोड, मोबाईल नंबर, इ. संबंधीत तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करावे. तसेच बाधीत शेतकर्‍यांनी डीबीटी पोर्टलव्दारे याद्या अपलोड झाल्यानंतर, बाधीत शेतकर्‍यांना व्हीके नंबर प्राप्‍त होईल. त्यानंतर ईकेवायसी केल्याची खात्री करुन शासन स्तरावरुन आपणास मदत देण्यात येत असते याची नोंद घ्यावी.
सदरील प्रक्रिया शासनाने सुचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी या कार्यालयाकडून बाधीत शेतकर्‍यांच्या याद्या अपलोड करण्यात आलेल्या आहेत. पुढील प्रक्रिया शासन स्तरावरुन संबंधित लाभार्थी यांचे खातेवर जमा करण्याची प्रक्रिया चालु आहे. तरी राहिलेले उर्वरीत 11984 बाधीत शेतकर्‍यांनी आपले आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफसी कोड, मोबाईल नंबर इत्यादी संबंधीत तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करावे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here