
अहमदपूर:-
मासूम शेख
भारतरत्न बोधीसत्व परमपूज्य डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव जाधव पाटील , सय्यद साजीदभाई, सोमेश्वर कदम, गोपीनाथराव जोंधळे, विश्वासराव कांबळे, आसिफभाई पठाण, अकबर पठाण, राजाभाऊ खंदाडे ,राहुल शिवपुजे,नाना कदम, परमेश्वर सूर्यवंशी, शंकर मुळे, धीरज भंडे, भगवानराव ससाने, बाबासाहेब वाघमारे, केरबा कांबळे,धम्मानंद कांबळे, संतोष गायकवाड, मिलिंद कांबळे, कैलास गायकवाड, बालाजी थिटे, संभाजी कांबळे, शिवाजीराव गायकवाड, मासूमभाई शेख, बालाजी वाघमारे, प्रभाकर कांबळे, बालाजी तुरेवाले, कुमार गुळवे, राजाराम कांबळे पाटील,शिवाजीराव जंगापल्ले, पिराजी कांबळे, विकास कांबळे आदींनी दीप प्रज्वलित करत पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे सर यांनी केले.तर या कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच केरबा कांबळे यांनी मानले.