Home आपलं शहर *महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन*

*महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन*

6
*महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन*

अहमदपूर:-
मासूम शेख

येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त व क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते तर सोनखेड येथील लोकमान्य महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. गोविंद घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. नागराज मुळे , डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. किरण गुट्टे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, शिवाजी चोपडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते

Spread the love

6 COMMENTS

  1. Been playing on hh555 for a bit and I’m enjoying it. The site’s easy to use, and the customer support has been responsive whenever I’ve had a question.

  2. Mh888… hmm. It’s alright. Nothing really jumps out at me, but nothing particularly bad either. Just kind of…average. Check it out and decide for yourself: mh888

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here