Home Blog Page 103

भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या ‘हाय कमांड’ सोनिया गांधींची हजेरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सात सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली काँग्रेस पक्षाची ‘भारत जोडो’ यात्रा आज ६९८ किमी अंतर पार करून कर्नाटक मध्ये दाखल झाली. आज या यात्रेतील सहभागींसाठी उत्साहवर्धक दिवस होता. कारण काँग्रेसच्या हाय कमांड सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या कर्नाटकात आहे. या यात्रेत आज सोनिया गांधी यांची एन्ट्री झाली आहे. मांड्या जिल्ह्यातील डाक बंगला परिसरातून सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेला सुरुवात केली आहे.

राहुल यांनी मोठ्या उत्साहात सोनिया गांधी यांचं स्वागत केलं. यात्रेत उपस्थित महिला नेत्यांनी सोनिया गांधींचा हात मिळवून अभिवादन केलं. सुमारे १५ मिनिटे चालल्यानंतर सोनिया गांधी आपल्या कारकडे परतल्या. मात्र काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सोनिया गांधी पुन्हा पदयात्रेत सहभागी झाल्या.

अध्यक्षपदावरून पक्षात गदारोळ सुरू असताना सोनिया गांधी काँग्रेसच्या पदयात्रेत सहभागी झाल्या आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. बऱ्याच दिवसांनी सोनिया गांधी त्यांच्या मातोश्री वारल्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात हजर झाल्या आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही केला नव्हता. ‘भारत जोडो यात्रा’ सुरू असताना सोनिया गांधी परदेशात उपचार घेत होत्या. सोनिया गांधी काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते ‘भारत जोडो’ यात्रेअंतर्गत कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर अशी पायी यात्रा सुरु केली आहे. राहुल गांधी सातत्याने विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत.

भारत जोडो यात्रेची वैशिष्टे

‘* भारत जोडो यात्रा’ ३ हजार ५७० किलोमीटर लांब असणार आहे. ५ महिन्यांपर्यंत ही यात्रा चालणार आहे.

* ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते कंटेनरमध्येच झोपतात. अशा ६० कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कंटेनरमध्ये बेड, टॉयलेट आणि एसी देखील आहेत.

* यात्रेतील सहभागी काँग्रेसचे नेते दररोज ६ ते ७ तास पायी चालतात आणि २२ ते २३ किलोमीटर अंतर कापतात.

* काँग्रेसचे ११९ नेते या यात्रेत सहभागी आहेत, यात २८ महिला आहेत.

बीकेसी मधल्या दसरा मेळाव्यातील भाषणाची स्क्रिप्ट मुख्यमंत्र्यांना कोणी लिहून दिली ? अमोल मिटकरींनी लगावला टोला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत_

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्यावरून वादळी राजकारण रंगल्याचे दिसून आलं. अखेर सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईच्या शिवाजी पार्कवर पार पडला. दुसरीकडे बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची दसरा मेळावा पार पडला. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात काल प्रथमच दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला.

या सभेतील भाषणात शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही शिंदे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. राष्ट्राच्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या याच भाषणानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाषणाची स्क्रिप्ट भाजपची असल्याची खिल्ली उडवली आहे.

दसऱ्याच्या दिवशी सकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ट्विटरवर त्यांनी भाजपाचा केमिकल लोच्या झाल्याचं म्हटलं होतं. पंकजा मुंडे, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यात भाजपला स्थान मिळाले नाही, असा टोला लगावत याकडे अमोल मिटकरी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “एक मात्र खरे की दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाजपाचा “केमिकल लोच्या” झाला. ना शिंदे गटाच्या मेळाव्यात स्थान, ना पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात, ना शिवतीर्थावर.. भाजपरूपी इतरांची घरे फोडणारा दशासान भविष्यात असाच मातीत मिसळणार हे नक्की.” असं ट्वीट अमोल मिटकरींनी केलं आहे.

“माननीय मुख्यमंत्री महोदयांचे बीकेसी मैदानावरील भाषण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीने लिहून दिलेली स्क्रिप्ट. या भाषणात नरेंद्रजी मोदी, आरएसएस व भारतीय जनता पार्टीवर स्तुतीसुमने तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेवर आगपाखड त्यापलीकडे काहीच नाही.” अशी टीकाही मिटकरींनी ट्विटच्या माध्यमातून केली.

 

दसऱ्या मेळाव्यात शिंदे यांनी दाखवून दिले खरी शिवसेना कोणती ते..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काल शिवसेनेच्या दोन्ही गटांची भाषणे ऐकली नाहीत मुंबईतील दसरा मेळाव्यातली, मी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने व्यस्त होतो अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण आता ऐकले. शिंदेंनी दाखवून दिलं खरी शिवसेना कोणती खरी ते, शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच हे त्यांनी सिद्ध केलं असे फडणवीस म्हणाले. ते विकासाच्या मुद्द्यावर बोलले याबद्दल त्यांचं अभिनंदन असेही फडणीसांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात शिमगा सोडून काहीच नव्हतं, त्यामुळे शिमग्यावर काही बोलणार नाही असे ते म्हणाले. शिवाजी पार्क पेक्षा बीकेसी मैदान दुप्पट मोठं असून बीकेसी मध्ये प्रचंड गर्दी होती असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील निवडणुकांत देखील विधानसभेवर भगवा फडकणार आहे पण तो खऱ्या भाजप-सेना युतीचा फडकणार आहे असे फडणवीस पुढे म्हणाले.

कालच्या शिंदे यांच्या भाषणाची स्क्रिप्ट भाजप ची म्हणणाऱ्यांनी स्क्रिप्ट बदलला पाहिजे, ते पुन्हा पुन्हा तेच बोलताहेत. अजित पवार काय म्हणाले मला माहित नाही. पण मूळ सेनेचा विचार बाजूला टाकला सावरकरांवर टीका करणाऱ्यांसोबत गेले म्हणूनच शिवसेनेत फूट पडली असे सांगून मुख्यमंत्री असताना देखील उद्धव ठाकरे कायम पक्ष प्रमुख म्हणूनच बोलले अशी टीका फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कामा’ संघटनेच्या वतीने अपघातातील आपत्कालीन प्रसंगी घ्यावयाची प्राथमिक काळजी व उपाय योजना यासाठी सराव प्रात्यक्षिकेचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील एमआयडीसी येथे २०१६ साली ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेल्या स्फोटाला काळ उलटला तरी त्या अपघातात सापडलेल्या अपघाती लोकांना सरकारकडून अध्याप मोबदला मिळाला नाही अशी परिस्थिती असताना पुन्हा अश्या दुर्घटना होऊ नयेत व झाल्यास काय उपाय योजना व कोणती खबरदारी घ्यावी लागेल याची काळजी ‘डोंबिवली सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र’ व ‘कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशन’ (कामा) संघटने च्या वतीने आपत्कालीन वाहीका नुकतीच उपलब्ध करण्यात आली आहे. ही वाहीका योग्य पद्धतीने काम करते की नाही हे पाहण्यासाठी कामा संघटना आणि औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने घेतली असून सराव प्रात्यक्षिकेचे अर्थात ‘मॉकड्रिल’ चे आयोजन करण्यात आले होते.

 

मात्र यावेळी पाण्याचे टँकर उशिरा येणे, रुग्णवाहिका उशिरा पोहोचणे या त्रुटी जाणवल्यामुळे खरी घटना घडेल त्यावेळी या त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी कल्पना आली असून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू अशी माहिती प्रशासकीय औद्योगिक सुरक्षा कल्याण सह-संचालक विनायक लोंढे यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

डोंबिवली एमआयडीसी येथील परिसर नेहमीच वादाच्या चर्चेत असतो. या परिसरात अनेक केमिकल कंपन्या असल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने घडत असतात. यापैकीच एक आठवणीत ताजी राहणारी दुर्घटना म्हणजे ‘प्रोबेस कंपनी’ मध्ये झालेला बॉयलर चा स्फोट. कंपनीत लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला होता आणि अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर ‘मेट्रोपॉलिटन कंपनी’ मध्ये देखील अशाच प्रकारची आग लागली होती. मात्र सुदैवाने त्यावेळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नव्हती. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी कामा संघटनेने पुढाकार घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. आपत्कालीन वाहीका सुरू केली असून यामध्ये जनरेटर , ऑक्सिजन, फर्स्टएडबॉक्स, स्ट्रेचर्स, मोठेमोठे पाईप, आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असणारा फोम आधी गोष्टींची सुविधा या वाहीकेमध्ये उपलब्ध केली आहे. ही वाहिका नेमकी कशा पद्धतीने कार्यरत आहे हे बघण्यासाठी त्यांनी गुरुवारी दुपारी सराव प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) केले.

औद्योगिक विभागातील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील खुल्या जागेत आग लावण्यात आली. आगीमध्ये नाट्य सदृश्यतील काही घायाळ जखमी कामगारांवर प्रथमोपचार व आगीवर नियंत्रण करण्याची तसेच कंट्रोल सेंटर आणि ऑनसाइट अत्यावश्यक वाहन यांच्यासह पाणी आणि पंपच्या माध्यमातुन त्याचा वापर करून आग विझवणे व जखमींना इमर्जन्सीची परिस्थिती कशी हाताळावी व रुग्णवाहिका उपलब्ध होईपर्यंत परिस्थिती कशी नियंत्रणात ठेवायची याची सुद्धा प्रात्यक्षिकं करून दाखवण्यात आली. यामध्ये वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याचे निदर्शनास आले. या आधी देखील अनेक वेळा वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नसल्याचे कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात औद्योगिक सुरक्षा समिती कल्याणचे सह-संचालक विनायक लोंढे यांनी आहे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असून वॉटर टँकर आणि रुग्णवाहिका वेळेत कशी उपलब्ध करता येईल या संदर्भात कामा संघटनेशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर राहिलेल्या त्रुटी निदर्शनास आल्यामुळे हे सराव प्रात्यक्षिक फायदेशीर ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.

आगीची घटना तसेच वायुगळती अश्या आपत्कालीन परिस्थितीला प्राथमिकता कोणावर अवलंबून न राहता स्वावलंबी होऊन कसे सामोरे जाता येईल व परिस्थिती कश्या प्रकारे आटोक्यात आणता येईल यासाठीच मॉक ड्रिल म्हणजेच सराव प्रात्यक्षिक घेण्यात आले होते. या प्रत्यक्षिका मध्ये दुर्घटना होऊन आग लागल्यास ती विझवण्या प्राथमिकतेने घ्यावयाच्या काळजीबद्दल काही प्रात्यक्षिके दाखवली गेली. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने त्याच्यामध्ये जे होणारे अपघात आहेत त्याच्यावर उपाय योजना काय आहेत आणि कशाप्रकारे हे अपघात कमी करता येतील यांच्यासाठी मॉक ड्रिल चे आयोजन करण्यात आले व घेतलेल्या सराव प्रात्यक्षिकाने समाधानी असून राहिलेल्या उर्वरित त्रुटींची लवकरच पूर्तता करून पुन्हा असेच सराव प्रात्यक्षिक करू असे ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

प्रियांका भोसलेचे दोन अनमोल रतन अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी! दोघे मिळून करतात अनधिकृत बांधकामांची तोडपाणी?

बांधकाम धारक प्रजापती म्हणतो दीड लाख दिले! हिंमत असेल तर बांधकाम तोडून दाखवा!

भाईंदर, प्रतिनिधी: अमोल मेहेर, कृष्णा थंडापाणी ये मेरे दो अनमोल रतन! असे म्हणत सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले यांनी प्रभाग समिती कार्यालय क्र. 01 मधील सफाई कर्मचारी अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामावरील नवीन वसुली बाज म्हणून नियुक्त केल्याचे आता शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग प्रभाग समिती क्र. 01 च्या भाईंदर पश्चिम उत्तन धावगी येथील सरकारी जमिनीवर प्रजापती नावाच्या व्यक्तीकडून दोन गाळ्याचे अनधिकृत बांधकाम वाचवण्याकरिता स्वतःच प्रभाग अधिकारी म्हणून प्रभागात फिरणारे अमोल मेहेर व कृष्णा थंडा पाणी यांनी आयुक्त व उपायुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून चक्क दीड पेटीची वसुली करून पालिकेला विक्रमी निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामगिरीत प्रियांका भोसले यांचे मोलाचे सहकार्य असल्याने या दोन अनमोल रत्नांकडून सांगण्यात येत आहे. आणि म्हणूनच गाळा मालक प्रजापती म्हणतो “हिंमत असेल तर माझे व्यावसायिक अनधिकृत गाळे तोडून दाखवा”

मेरा प्रभाग, मेरा बांधकाम, मेरा वसुली बाज अनमोल रतन (अमोल मेहेर) बोलणाऱ्या प्रियांका भोसले यांनी आता चक्क उपायुक्त यांच्या नावाचा सर्रास गैरवापर चालू केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रभाग कार्यालयातील कर विभागातील काही कर्मचाऱ्यांना भोसले यांनी अनधिकृत बांधकामाची वसुली करण्यासाठी निवड केल्याची चर्चा महापालिका परिसरात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परीसरात ना-विकास क्षेत्र आणि इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले 350 रु. प्रति चौ. फूट घेत असल्याचे आरोप काही स्थानिक वर्तमानपत्रातून या आधी देखील केले गेले आहेत. त्यामुळे आता त्या महानगरपालिकेला मोठया प्रमाणात निधी मिळवून देऊन मोठा आर्थिक फायदा करून देणार आहेत अशी चर्चा पालिका वर्तुळात चालू आहे.

या कामगिरीत प्रियांका भोसलेचे दोन अनमोल रतन अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात असून पालिका आयुक्त दिलीप ढोले त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन मोठा सन्मान करतील का? असा सवाल सामान्य नागरिकांडून केला जात आहे.