Home Blog Page 107

दोन तरूणांनी दुचाकीवरुन येत केला कांदिवलीत बेछूट गोळीबार !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कांदिवलीमध्ये गोळीबार झाला आहे. येथे दुचाकीवरुन आलेल्या २ जणांनी ४ राऊंड फायरिंग केली आहे. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे उघड झाले असून दहीहंडीच्या वेळी वाद झाला होता, त्यातूनच हा गोळीबार करण्यात आला. रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती मिळाली असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडले ?

शुक्रवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी ही घटना घडली. यावेळी दोन तरुण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अंकित यादव असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमध्ये तीन जण जखमी झाले आहेत. अंदर्गत वादातून हा प्रकार घडला आहे. दहीहंडीच्या वेळी या दोन गटांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या फायरिंग दरम्यान तरुणाने चार गोळ्या झाडल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार फायरिंग केल्यानंतर आरोपी हे तिथून फरार झाले आहेत. गोळीबार करणारे आणि जखमी हे एकमेकांना ओळखत होते. या फायरिंगमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. अंकित यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. तर अवीनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण अशी इतर जखमींची नावे आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. फरार झालेल्या आरोपीचा पोलीसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कांदिवली पोलीस करत आहेत.

 

हैद्राबादच्या भामट्याने उल्हासनगरातील पप्पू कलानीच्या भावाला घातला ४० लाखांना गंडा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

उल्हासनगर शहरातील माजी आमदार पप्पू कलानी यांच्या भावाला हैद्राबादच्या एका भामट्याने ४० लाखांना गंडा घाटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गंडा घालणाऱ्या भामट्या विरोधात उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रीष्णाकांत फुलपाथरी (रा. श्रीपूरम कॉलनी, हैद्राबाद ) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार

माजी आमदार पप्पू कलानी यांचे बंधू नारायण बुधममल कालानी (वय: ७९ वर्षे) यांचे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागातील फर्निचर बाजारमध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे. तर आरोपी क्रीष्णाकांत फुलपाथरी हा हॉटेल मालक नारायण कलानी यांच्या बँकेचे आर्थिक व्यवहार गेल्या अनेक वर्षापासून विश्वासाने सांभाळत होता. त्यातच हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी आरोपी क्रीष्णाकांत याला हॉटेल मालक नारायण यांनी उल्हासनगर मधील २ बँकेत खात्यामधून ४० लाख ९७ हजार ३७५ हजराचे दोन धनादेश ३ ऑक्टोंबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान देऊन हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी दिले.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव

मात्र आरोपी नोकराने हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा न करता सदरचे धनादेश आपल्या व मित्राच्या खात्यात वळते करून मालकांची आर्थिक फसवणूक केली. दुसरीकडे नोकरानेच विश्वासघात करून आपली फसवणूक केल्याचे समजताच हॉटेल मालक नारायण कलानी यांनी २९ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन हैद्राबादला राहणाऱ्या क्रीष्णाकांत फुलपाथरी यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे ४० वर्ष कलानी परिवाराचे शहरात राजकीय व अनेक व्यवसायात वर्चस्व आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहे.

 

उपायुक्तांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला दिली धमकी; ‘शिंदे गटात न आल्यास एन्काउंटर करेन’..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सहभागी न झाल्यास एन्काउंटर करण्याची धमकी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे. नवी मुंबई – परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होण्यासाठी आपल्यावर दबाव टाकत असून, १० लाखाची खंडणी मागत असल्याचा तसेच एन्काउंटर करण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप माजी शिवसेना नगरसेवक एम.के.मढवी यांनी केला आहे.

मढवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. मढवी यांच्या या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आणि एम.के.मढवी यांच्या पत्नी विनया मढवी यांच्यासह नवी मुंबईतील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, माझ्यावर वेगवेगळे गुन्हे नोंदवले जात असून, माझ्या विरोधात महिलांना पुढे करत विनयभंगाच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. २० जूनपासून हा सगळा त्रास मला व माझ्या कुटुंबाला दिला जात आहे. झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे मला विजय चौगुलेंच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव टाकत असून, हे सगळे सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. मात्र मी उद्धव साहेबांची शिवसेना सोडणार नाही. हा सगळा त्रास असाच सुरू राहिला तर उपायुक्त विवेक पानसरेंच्या कार्यालयासमोर मी व माझे कुटुंब सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा मढवी यांनी बोलताना दिला आहे. आपल्या तसेच आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार झोन-१ चे उपायुक्त विवेक पानसरे, संदीप नाईक, विजय चौगुले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा असतील असे मढवी यांनी म्हटले आहे. उपायुक्त विवेक पानसरेंविरोधात आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे देखील मढवी म्हणाले.

उपायुक्त पानसरे म्हणाले, आरोप खोटे :

उपायुक्त विवेक पानसरे यांनी मात्र मढवी यांचे आरोप फेटाळले असून, हद्दपारीच्या भीतीपोटी मढवी बेछूट आरोप करत असल्याचे म्हटले आहे. मढवी यांच्यावर दखल आणि अदखलपात्र असे मिळून १३ गुन्हे दाखल असून त्यांच्या तडीपारीची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली :

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी एम.के.मढवी धमकी प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. राज्यात सध्या बीन पैशाचा तमाशा सुरू आहे. राज्यासमोर महागाई, बेरोजगारी सारखे अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय आकसापोटी शिवसैनिकांना धमक्या देण्यात, त्यांची झुणका भाकर केंद्र, पोळी भाजी केंद्र बंद पाडण्यात व्यस्त असून, शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकली असल्याचे खासदार म्हणाले. मढवी कुटुंब लोकांची कामे करतात म्हणून त्यांना नगरसेवकपदाच्या दोन तीन टर्म मिळाल्या असल्याचे सांगत, शिवसेना मढवी कुटुंबियांच्या पाठीमागे असल्याचे खासदार राजन विचारे म्हणाले. मढवी धमकी प्रकरण हे गंभीर असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते बदनाम होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असे देखील खासदार विचारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

 

सहा महिन्यात मध्य रेल्वेच्या २३ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून १५४ कोटींचा दंड वसूल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मध्य रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या तिकीट तपासणी विशेष मोहिमेअंतर्गत सहा महिन्यात तब्बल २३ लाख २० फुकट्या प्रवाश्यांकडून दीडशे कोटी रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या सहा झोन मध्ये ही मोहीम राबवण्यात आली, त्यापैकी सर्वाधिक फुटके प्रवासी मुंबई विभागात आढळून आले आहेत तर सर्वात कमी पुणे विभागात फुकटे प्रवासी तिकीट तपासनीसांना मिळाले आहेत. सहा विभागाच्या यादीत नागपूर विभाग तिसऱ्या स्थानी आहे.

नागपूर विभागातही ३ लाख ३४ हजार फुकटे प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून २२ कोटी ३६ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. मुंबई विभागात ९ लाख फुकट्या प्रवाश्यांकडून ५१ कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे तर भुसावळ विभागात ४ लाख ८९ हजार अवैध प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांकडून ३८ कोटी ५८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे असे मध्य रेल्वेकडून प्रसार माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

लोखंडवाला मध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय मॉडेलची पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईतील अंधेरी भागातील एका हॉटेलच्या खोलीत ३० वर्षीय मॉडेलचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आकांक्षा मोहन असे या मॉडेलचे नाव असून ती लोखंडवाला येथील यमुना नगर सोसायटीत राहत होती. या प्रकरणी वर्सोवा पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अंधेरीच्या सी ब्रीजमध्ये बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मॉडेल आकांक्षा मोहनने हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी हॉटेलच्या वेटरने रुमची बेल वाजवली. अनेकवेळा बेल वाजवूनही रुमचा दरवाचा उघडला नाही. वेटरने ही माहिती हॉटेलच्या मॅनेजरला दिली. मॅनेजरने तात्काळ पोलीसांना फोन करुन कळवलं.

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर पोलीसांनी मास्टर किच्या आधारे खोलीचा दरवाजा उघडला. आत पाहिलं असता, मॉडेल आकांक्षा मोहनने पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तात्काळ तिला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

पोलीसांनी घटनांवरून सुसाईड नोट जप्त केली आहे. त्यात असं लिहिलं आहे की, ‘माफ करा, याला कोणीही जबाबदार नाही, कोणाला डिस्टर्ब करु नका, मी खुश नाही, फक्त शांतता हवी होती’, असं त्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीत काम न मिळाल्याने मृत मॉडेल नैराश्यात होती असा संशय व्यक्त केला जात आहे. अधिक तपास वर्सोवा पोलीस करत आहे.