Home Blog Page 116

“इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न!

इंडियन स्वच्छता लीग” स्वच्छता मोहिमेत ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव यांच्या उपस्थितीने उत्साही वातावरण

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण देशात स्वच्छ अमृत महोत्सव साजरा केला जात असून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिके तर्फे शहरवासीयांच्या सहभागाने “इंडियन स्वच्छता लीग” अंतर्गत स्वच्छता लीग रॅली मोहीम यशस्वीरीत्या संपन्न झाली.

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्वच्छता लीग रॅली यशस्वी होण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (पर्यावरण) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, शहर अभियंता दिपक खांबित, सर्व विभागप्रमुख/खातेप्रमुख, महानगरपालिका कर्मचारी, शहरातील सुजाण नागरिक, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस यासारख्या संस्थेचे विद्यार्थी इत्यादींचा प्रामुख्याने सहभाग होता.

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गत भाईंदर स्थानक पश्चिम, प्रभाग समिती क्रमांक 3 भाईंदर स्थानक पूर्व, प्रभाग समिती क्रमांक 4 आयुक्त निवास, प्रभाग समिती क्रमांक 5 मिरा रोड स्थानक, प्रभाग समिती क्रमांक 6 काशीमिरा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणावरून महानगरपालिका विभागप्रमुख व कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी, सामाजिक संस्था यांच्या उपस्थितीत स्वच्छतेची रॅली काढून शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

महाराष्ट्रासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाचे सावट असून देखील आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता लीग रॅली यशस्वीरीत्या संपन्न झाली. या उपक्रमात नागरिकांनी नियोजित केलेल्या मार्गावरून साफसफाई व प्लास्टिक मुक्त शहर म्हणून स्वच्छता मोहीम राबवली. नागरिकांना/शालेय विद्यार्थ्यांना साफसफाई करण्यासाठी हॅण्ड ग्लोव्हज व कचरा उचलण्यासाठी बॅग देण्यात आली होती. इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अंदाजे 4000 ते 45000 नागरिक, शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली.

प्रभाग निहाय स्वच्छता मोहिमेनंतर उपस्थित सर्व विद्यार्थी व नागरिकांनी विपश्यना केंद्र, रामदेव पार्क, मिरा रोड येथे उपस्थिती दर्शवली. सदर विपश्यना केंद्रात “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री मुग्धा गोडसे व अभिनेता राहुल देव हे देखील उपस्थित राहिले.

सदर ठिकाणी आमदार गीता भरत जैन, माजी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, माजी आमदार नरेंद्र मेहता, माजी उपमहापौर हसमुख गहलोत, माजी सभागृह नेता प्रशांत दळवी, तसेच माजी नगरसेवक/नगरसेविका उपस्थित होते.

उपस्थित असलेल्या सर्व सामाजिक संस्था व विविध शाळांचे प्रतिनिधी यांना आयुक्त, आमदार, “इंडियन स्वच्छता लीगचे” ब्रँड ॲम्बेसेडर, सर्व सन्माननीय सदस्य यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

सकाळ पासूनच पावासाचे सावट असून सुद्धा मिरा भाईंदर शहरवासीयांनी, विविध शाळा, कॉलेज, स्वयंसेवी संस्था, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, एनसीसी, स्काऊट, एनएसएस विद्यार्थी यांनी मोहिमेत उत्स्फूर्तरित्या सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी केल्याने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले व मिरा भाईंदर शहरास भारतातील सर्वात स्वच्छ शहर करण्याच्या प्रयत्नामध्ये सर्वांचा सहभाग मोलाचा राहणार आहे अशा प्रकारे भावना व्यक्त केल्या.

विपश्यना केंद्र येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त, सर्व अधिकारी/कर्मचारी व “इंडियन स्वच्छता लीग” ब्रँड ॲम्बेसेडर यांनी वेलंकनी बीच येथे “इंडियन स्वच्छता लीग” स्टार कॅम्पेनर कुमार हर्षद ढगे याच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बीच क्लीनअप मध्ये सहभाग नोंदवून समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत हातभार लावला.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात आले व या कार्यक्रमास पूर्णविराम देण्यात आला.

गौतम अदानींची जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप..

_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी गरुडझेप घेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. यादीतील जेफ बेझोस व बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. सध्या अदानी यांच्या पुढे फक्त एलॉन मस्क आहेत. जर गौतम अदानी यांची अशीच घोडदौड सुरु राहल्यास ते अव्वल स्थानी देखील पोहचू शकतात. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५३.९ बिलियन डॉलर इतकी झाली आहे व एलॉन मस्क यांची संपत्ती २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे.

या यादीत दुसरे भारतीय उद्योपती मुकेश अंबानी हे देखील असून त्यांनी देखील नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे. भारतातील अदानी समूह हा तिसरा सर्वात मोठा उद्योग समूह असून या अंतर्गत त्यांचे बंदरे, खाणकाम, ऊर्जा, संसाधने, संरक्षण, गॅस, विमानतळे व एरोस्पेस इत्यादी उद्योग आहेत.

 

भारतीय वाहन बाजार रूळावर येत ऑटोमोबाईल मार्केटचे ‘अच्छे दिन’ सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारतीय वाहन बाजार आता मंदीतून बाहेर आला आहे. तसेच जगभरात पसरलेला कोरोना आता आटोक्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांत वाहन बाजारात मोठा तोटा पाहायला मिळाला होता. पण आता ऑटोमोबाईल मार्केट रुळावर आले आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने (एसआयएएम) ऑगस्ट २०२२ महिन्याचा वाहन विक्री अहवाल प्रसिद्ध केला आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (एसआयएएम) ने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये भारतीय बाजारपेठेत २ लाख ८१ हजार २१० प्रवासी वाहने विकली गेली आहेत. तर, ऑगस्ट २०२१ मध्ये, २ लाख ३२ हजार २२४ प्रवासी वाहने भारतीय बाजारपेठेत विकली गेली. म्हणजेच ऑगस्ट २०२१ च्या तुलनेत ऑगस्ट २०२२ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत २१.१ टक्के वाढ झाली आहे.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १५,५७,४२९ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १३,३८,७४० युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत १६.३३ टक्के वाढ
दुचाकी वाहनांची विक्री १६.३३ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री ५,०४,१४६ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ४,६०,२८४ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत ९.५ टक्के वाढ
स्कूटर्सची विक्री ९.५ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १०,१६,७९४ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ८,२५,८४९ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत २३.१ टक्के वाढ
मोटरसायकल्सची विक्री २३.१ टक्क्यांनी वाढली.

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १,३३,४७७ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १,०८,५०८ युनिट्स
विक्रीतला फरक
कार्सच्या विक्रीत २३ टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १,३५,४९७ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १,१२,८६३ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत २० टक्के वाढ
‘एसयूव्हीं’च्या विक्रीत २० टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १२,२३६ युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री १०,८५३ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत १२.७ टक्के वाढ
व्हॅन्सच्या विक्री १२.७ टक्के वाढ

ऑगस्ट २०२२ मधील विक्री १०,३०० युनिट्स
ऑगस्ट २०२१ मधील विक्री ९,३९७ युनिट्स
विक्रीतला फरक
विक्रीत ८.७ टक्के वाढ
तीनचाकी वाहनांच्या विक्रीत ८.७ टक्के वाढ.

 

 

 

‘सैराट’ मधील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादाला होणार अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सैराट फेम प्रिन्सवर आहे. याप्रकरणी संशियतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात सुरज पवार याचाही समावेश आहे. सैराट चित्रपटातील आर्चीचा भाऊ प्रिन्सदादा अर्थात अभिनेता सुरज पवार याला अटक होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयात नोकरी लावून देतो असं आमिष दाखवून तरुणाला पाच लाख रुपयांना गंडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक गावातील महेश वाघडकर या तरुणाची फसवणूक करण्यात आली असून फसवणूकीसाठी चक्क भारतीय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला होता. संशयित आरोपींनी सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात नोकरीला असल्याचं महेश वाघडकर या तरुणाला सांगितलं होतं. यासाठी सुरज पवार याने संगमनेरमधून बनावट शिक्के बनवले होते. याप्रकरणी पोलीसांनी तिघांना अटक केल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणात अभिनेता सुरज पवारचाही सहभाग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सुरज पवारला अटक होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील ‘तेजस’ एक्सप्रेस धावणार अत्याधुनिक ‘विस्टाडोम’ कोचसह..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १५.०९.२०२२ पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी ‘तेजस एक्सप्रेस’ आता एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील ही दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी ‘जनशताब्दी एक्‍स्प्रेस’ या विस्टाडोम कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा ‘तेजस एक्सप्रेस’ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात ४० प्रवासी असणार आहेत.

गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार

तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर २०२२ पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.

कसा असतो विस्टाडोम कोच ?

विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्‍या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगर-दर्‍यांचे विहंगम दृश्य या कोचमध्ये बसून आरामात टिपता येते.