Home Blog Page 117

राज्यात यंदा दिवाळीही धुमधडाक्यात साजरी होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या महाभयंकर कालावधी नंतरच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवानंतर आता राज्यात दिवाळी सुद्धा तश्याच धुमधडाक्यात साजरी होणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीत संपूर्ण मुंबई उजळून निघणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सवात अनेक सेलिब्रिटी आले, ते माझ्याशी बोलले, सरकारबद्दल चांगले किंवा वाईट मत बनवणे हे अधिकार्‍यांवर अवलंबून असते. मुंबईत आमूलाग्र बदल होणार आहेत. रस्त्यांच्या दर्जाकडे लक्ष द्या, तुम्ही खर्च केलेला पैसा वाया घालवू नका. यामुळे ‘काहींना टीका करण्याची संधी मिळते, जी त्यांना मिळणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी अभियंत्यांना संबोधित करताना सांगितले.

‘पूर्वी माझ्याकडे कमी अधिकार होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आयुक्त चहल यांना फोन केला. साडेपाच हजार कोटींच्या रस्त्यांचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार. ठाणे-नवी मुंबईत जे सुशोभीकरण केले आहे तेच आपणही करू’, असे एकनाथ शिंदे यांनी अभियंत्यांना सांगितले.

‘लोकांना हा आपला मुख्यमंत्री वाटतो, म्हणून ते फोटो काढायला येतात. मी अधिवेशनात विरोधकांना चोख उत्तर देतो. मी सर्व काही साठवले आहे. ‘वेदांता कंपनी’चा विषय खूप गाजतोय, त्यांनी अडीच वर्षात काहीच केले नाही. आम्ही दोन महिन्यांत प्रयत्न केला पण कंपनीने आधीच गुजरात येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता मी माझ्या कामावरून उत्तर देईन. याबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यांनी राज्यात मोठे प्रकल्प आणण्याचे आश्वासन दिले आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

वेदांता प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात परत आणा – सुप्रिया सुळे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्पावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राजकारण तर आता चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी गंभीर व्हावं. राज्य आणि देशासमोर बेरोजगारीचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. राज्याच्या हितासाठी एकत्र यावं. सर्व पक्षीय प्रतिनिधींचं शिष्टमंडळ दिल्लीत न्यावं. पंतप्रधानांना भेटून आपला प्रकल्प परत आणावा असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

तसेच राज्यातील अडीच ते तीन लाख रोजगाराचा प्रश्न आहे. त्यावर गांभीर्य व्हायला हवं. तळेगावला साईट पाहिली होती. सर्व तयारी झाली होती. मग अचानक काय झालं ? प्रकल्प गुजरातला का गेला त्याची जबाबदारी घ्या. सत्तेत बसणं म्हणजे नुसतच सत्कार घेणं. लाल दिवा बंद करून लोकांची गैरसोय करणं आणि गाड्यांचा सुसाट धावणारा ताफा नसतो. सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी यालाच सत्ता म्हणतात असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

यावर ‘वेदांता ग्रुप’चे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेली १ लाख ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक गुजरातकडे वळली असल्याचा आरोप होत असतानाच कंपनीचे मालक अनिल अग्रवाल यांनी महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. रात्री सव्वा दहाच्या आसपास अनिल अग्रवाल यांनी ट्विटरवरुन ही घोषणा केली. हा प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय आधीच घेतला गेला असल्याचं अग्रवाल म्हणाले आहेत. अनिल अग्रवाल यांनी सोशल मिडियावरुन माहिती दिली आहे की, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यातील सरकारशी करार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तसेच सर्वोत्तम डील त्यांना कोणत्या राज्याकडून मिळते यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. ते डील गुजरात सरकारकडून मिळाल्याचे अनिल अग्रवाल यांनी सांगितले.

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे रशियातील भारतीय दूतावासात अनावरण कार्यक्रमात “कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला”, असे विचार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मॉस्कोत व्यक्त केले.

सकाळी मॉस्को स्टेट लायब्ररीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर सायंकाळी मॉस्कोतील भारतीय दूतावासातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. या कार्यक्रमाला विधानसभाध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, मिलिंद कांबळेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज एकाच दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना दुसऱ्यांदा मानवंदना अर्पित करण्याची संधी मला मिळाली, याचा अतिशय आनंद होत आहे. एक आठवण सांगताना ते म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या घराचा दरवाजा थोडा छोटा होता. लोक त्यांना विचारायचे की इतका लहान दरवाजा का ? त्यावर ते गंमतीने उत्तर द्यायचे, पंडित नेहरू जरी आले तरी त्यांना माझ्या घरात वाकून यावे लागेल. आज नेहरु सेंटरमध्येच त्यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले, हा योगायोग
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण झाले नाही, त्यांना शाळेत जाता आले नाही. पण, आज त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थी पीएचडी करतात. त्यांची लेखणी इतरांना प्रेरणा देणारी ठरली. लेखणीने परिवर्तन, लेखणीने समाजाला धीर आणि त्याच लेखणीने लढण्याचे बळ असे काम त्यांनी केले. रशिया प्रवासाचे त्यांनी केलेले वर्णन खऱ्या अर्थाने यथार्थ होते. प्रवास वर्णन हे साधारणत: रंजक असते. पण, त्यातूनही प्रेरणा मिळणे, अशा पद्धतीचे वर्णन त्यांनी केले. प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदीजी यांच्या पाठिंब्यामुळे आजचे दोन्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झाले, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी इथे बोलताना सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील फेरोज मणियार यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर!

फेरोज मणियार यांचा जयपूर येथे व्यक्तिविशेष उत्कृष्ट कार्य पत्रकारिता पुरस्काराने होणार सन्मान गौरव!

लोहा प्रतिनिधी:  नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून प्रथमच प्रकाशित होणारे दैनिक जनतेचे मत माझे मत वृत्तपत्राचे संपादक तथा जनतेचे मत युट्यूब चॅनल संचालक तरुण हुनहुनरी निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रामीण भागातून सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडणारे फिरोज मणियार उत्कृष्ट कार्याची दखल घेत व्यक्ती विशेष उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड 2022 जयपुरचा बहुमान पुरस्कार लोहा शहरांचे भूमिपुत्र दैनिक जनतेचे मत माझे मतचे संपादक व‌ नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध यूट्यूब न्यूज चैनलचे संचालक फेरोज मणियार यांना हा बहुमान राजस्थान जयपुर येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेत्री- अभिनेत्यांच्या हस्ते दिला जाणार आहे.

सदरील पुरस्कारासाठी नांदेड येथील पत्रकार नईम खान यांचे मार्गदर्शन लाभले असून मणियार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे लोहा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सोशल मीडिया व सर्व स्तरावरून फेरोज मणियार यांना अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

‘ईडी’ ची मुंबईमध्ये मोठी कारवाई, ९१.५ किलो सोनं, तर ३४० किलो चांदी केली जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईमध्ये ‘इडी’ने मोठी कारवाई केली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या परिसरात ‘इडी’ला मोठं घबाड हाती सापडलं आहे, यामध्ये ९१.५ किलो सोनं तर ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ‘पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ कंपनीच्या विरोधात चौकशी सुरू आहे, त्याच्या तपासादरम्यान ‘इडी’ला मागच्या आठवड्यात हे घबाड हाती सापडलं आहे. ‘इडी’ला शोध कारवाई दरम्यान ‘मेसर्स रक्षा बुलियन’च्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या. या लॉकरची झडती घेतली असता योग्य नियम न पाळता लॉकर चालवले जात असल्याचं ‘इडी’ला आढळून आलं. कोणतेही केवायसी न पाळता तसंच लॉकरच्या आवारात सीसीटीव्ही नसल्याचं, कोणतंही रजिस्टर नसल्याचं :इडी’ला आढळून आलं आहे.

‘इडी’ने लॉकरची झडती घेतली असता त्यांना इकडे ७६२ लॉकर्स आढळून आले, यातले ३ लॉकर्स ‘मेसर्स रक्षा बुलियन’चे होते. लॉकर्स चालवताना २ लॉकरमध्ये ९१.५ किलो सोनं तर १५२ किलो चांदी सापडली आहे. याशिवाय ‘मेसर्स रक्षा बुलियन’च्या आवारातून अतिरिक्त १८८ किलो चांदीही सापडली आहे. हे सगळं सोनं-चांदी ‘इडी’ने तूर्तास जप्त केलं आहे.

जप्त केलेल्या वस्तूंची एकूण किंमत ४७.७६ कोटी एवढी आहे. ‘इडी’ने ‘मेसर्स रक्षा बुलियन’ आणि ‘मेसर्स क्लासिक मार्बल्स’च्या ४ परिसरांमध्ये शोध मोहिम पूर्ण केली. ‘मेशर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ च्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग चौकशीच्या संदर्भात शोध घेण्यात आला. त्याआधी ‘ईडी’ ने ८ मार्च २०१८ ला पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार ‘मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड’ विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती.