Home Blog Page 120

डोंबिवलीत बुधवारी ‘इंजिनिअर्स डे’ दिवशी भरवल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय उद्योजक परिषदेनिमित्त राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत डोंबिवलीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दोन महिन्याचा एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन कालावधी उलटल्यानंतर प्रथमच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे डोंबिवलीत बुधवारी ‘इंजिनिअर्स डे’ दिवशी राज्यस्तरीय उद्योजक परिषदेसाठी येणार आहेत. भारताचे सुपुत्र आणि थोर इंजिनिअर भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती म्हणून हा दिवस संपूर्ण भारतामध्ये “इंजिनिअर्स डे” म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ कल्याण चॅपटर’ यांच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर २०२२, बुधवार राजी दुपारी तीन वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे “इंजिनिअर्स डे” च्या पूर्व संध्येला राज्यस्तरीय उद्योजक परिषद भरवली जाणार आहे.

‘एकमेका साहाय्य करू ! अवघे होऊ श्रीमंत’ हे या ट्रस्ट चे घोषवाक्य असून “प्रत्येक उद्योजक हा त्याच्या व तिच्या व्यवसायातील एक इंजिनिअर असून प्रत्येक इंजिनिअर ने व्यावसायिक बनले पाहिजे” अशी या परिषदेची थीम असून कल्याण-डोंबिवली तसेच आसनगाव – शहापूर – अंबरनाथ – बदलापूर या परिसरातील सुमारे १००० विविध उद्योजक, फॅक्टरी ओनर्स विविध असोसिएशन या परिषदेमध्ये सहभागी होणार असून उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर इथे चर्चा होऊन उद्योजकांच्या मागण्या परिषदेचे उदघाटक महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्याकडे देणार आहेत.

यासंदर्भात ट्रस्टचे पदाधिकारी राकेश चौधरी, संतोष पाटील, विनीत बनसोडे, सुमित पाटील, नितीन बोरसे यांनी डोंबिवली जिमखाना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे उद्योजक बना हा उद्देश समोर ठेवून मराठी उद्योजकांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्यस्तरीय उद्योजक परिषदेचे उद्घाटन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेला उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड, एमआयडीसी चे सीईओ डॉ. पी.अनबलगन (भाप्रसे), एमएसएमई महाराष्ट्र राज्याचे संचालक पार्लेवार, महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीचे सीईओ डॉ. नामदेवराव भोसले यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. “इंजिनीयर डे” अनुषंगाने एका उद्योजकीय प्रदर्शनाचही आयोजनही करण्यात आलेले आहे असे या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले .

 

अनंत चतुर्दशी दिनी डोंबिवलीत झाले ३ हजार ९५१ गणपतींचे विसर्जन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील ६६ सार्वजनिक मंडळांचे आणि ३ हजार ८८५ घरगुती अशा एकूण ३ हजार ९५१ गणपती बाप्पांचे विसर्जन “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात मोठ्या दिमाखात करण्यात आले.

शहरातील खाडी किनारी भोपर, कोपर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखानपाडा तसेच काही कृत्रिम तलावाच्या माध्यमातून गणपती विसर्जन करण्यात आले. संध्याकाळी पावसाने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण जरी घातले असले तरीही विसर्जन सोहळा कोणत्याही व्यत्ययाशिवाय शांततेत आणि उत्साहात पार पडला. दरम्यान मोठागाव येथे माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजेश मोरे, प्रकाश भोईर, यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित होते. तर कोपर येथे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पावशे, तर जुनी येथे जुनी डोंबिवली ग्रामस्थ मंडळ पदाधिकारी, भाजपाचे कृष्णा पाटील आदींनी यावेळी आपली उपस्थिती दर्शावत विशेष सहकार्य केले.

विसर्जनाच्या वेळी वाहतूककोंडी होवून वाहतुकीला अडथळा होऊ नये व विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी या दृष्टीकोनातून महापालिका प्रशासन, वाहतूक यंत्रणा आणि शहर पोलीस यंत्रणा तत्परतेने सज्ज होती. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज असले तरी देखील ऑन कॉल विसर्जन, कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदि उपक्रमांना यावेळी चांगलाच प्रतिसाद लाभला होता.

डोंबिवलीत जुनी डोंबिवली, कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली यासह अन्य गणेशघाट विसर्जनस्थळांसह शहर आणि ग्रामीण भागातील तलाव अशा एकूण २३ ठिकाणी पालिका प्रशासन आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती. कुंभारखाणपाडा, मोठा गाव ठाकुर्ली, जुनी डोंबिवली गणेशघाट अशा मोठ्या विसर्जन ठिकाणी इंजिन रबर बोट व्यवस्था होती. विसर्जन स्थळांच्या ठिकाणी जनरेटर, हॅलोजन्स टॉवर आणि सुरक्षेसाठी सीसीटिव्ही कॅमेरे देखील लावले गेले होते.

विसर्जन स्थळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सुसज्ज होती. पोलीस अधिकारी, होमगार्ड, एसआरपीच्या तुकडया विसर्जना दरम्यान ठिकठिकाणी तैनात केल्या गेल्या होत्या. यावेळी अवजड वाहनांना विसर्जन परिसरात बंदी घालण्यात आली होती.

डोंबिवली शहरात काही ठीकाणी वाहतूकीत बदल करण्यात आला होता. दरम्यान यावेळी वाहनचालक व गणेशभक्तांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस
सातत्याने करीत होते. डोंबिवली पश्चिम मधील मोठागाव येथील गणेश घाटावर विसर्जन दरम्यान माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाउंडेशन आणि स्वामी नारायण गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीत थकलेल्या गणेशभक्तांना मोफत दहा हजार वडा-पाव व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.

‘निर्मल युथ फाउंडेशन’ तर्फे निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प राबवण्याकरिता फाउंडेशन चे युवा स्वयंसेवक सर्व गणेश भक्तांना हार व फुले त्यांच्याकडे जमा करण्यासाठी सतत आवाहन करीत होते.

 

 

महानगरपालिकेच्या उत्कृष्ट नियोजनामुळे अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांततेत संपन्न!

एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन तर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी विसर्जन स्थळांना भेट देऊन जातीने लक्ष देऊन केली पाहणी!

मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील पारंपारिक विसर्जन स्थळांसोबतच शहरात विविध ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या 3 कृत्रिम विसर्जन स्थळांवर तसेच नैसर्गिक तलाव/समुद्रात आणि मुर्ती स्वीकृती केंद्रांवर एकूण 2063 गणेश मूर्तींचे विसर्जन व्यवस्थितरित्या व शांततेत पार पडले.

महानगरपालिकेच्या वतीने मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार सर्वच ठिकाणी करण्यात आलेल्या नियोजनबद्ध विसर्जन व्यवस्थेत अनंत चतुर्दशी विसर्जन सोहळा शांतरितीने पार पडला.

अनंत चतुर्दशी विसर्जन प्रसंगी एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. प्रभाग क्रमांक १ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 100 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

 

प्रभाग क्रमांक २ मध्ये नैसर्गिक तलावात/समुद्रात एकूण 265 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ३ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात एकूण 542 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ४ मध्ये नैसर्गिक तलाव/समुद्रात व कृत्रिम तलावात एकूण 573 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ५ मध्ये कृत्रिम तलावात एकूण 09 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये नैसर्गिक तलावात एकूण 574 श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

अशाप्रकारे अनंत चतुर्दशी निमित्त एकूण 2063 श्रीगणेश मूर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी जातीने लक्ष देऊन शहरातील जरीमरी तलाव काशीमिरा, शिवार गार्डन, जेसल पार्क चौपाटी, भाईंदर पश्चिम चौपाटी याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन स्थळांची पाहणी केली.

सदर पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (वैद्यकीय) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, जनसंपर्क अधिकारी तथा सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे, सहाय्यक आयुक्त प्रभाकर म्हात्रे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत बोरसे, सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे, सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव, सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले, इतर कनिष्ठ अभियंता, अग्निशमन कर्मचारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त ढोले यांनी जेसल पार्क चौपाटीवर विसर्जन स्थळी भव्य अश्या श्रीगणेशाच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करत श्रीगणरायाला वंदन केले.

गणेश विसर्जना मुळे शहरात वाहतूक कोंडी असल्याने आयुक्त व अधिकारी वर्ग यांनी भाईंदर पूर्व, जेसल पार्क चौपाटी ते भाईंदर पश्चिम चौपाटी असा बोटीमध्ये बसून प्रवास केला.

त्याच प्रमाणे शहरातील सर्व प्रमुख विसर्जन स्थळांवर आयुक्त यांच्या निर्देशानुसार नागरिकांसाठी कोव्हिड बूस्टर डोसचे देखील नियोजन करण्यात आले होते.

तसेच जेसल पार्क चौपाटी विसर्जन स्थळावर आमदार गीता जैन व मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते व पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी देखील प्रत्यक्ष भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.

सर्वच विसर्जनस्थळांवर सुरक्षेच्या दृष्टीने बांबूंचे बॅरेकेटींग करण्यात आले होते. अग्निशमन सेवक, महानगरपालिका स्वयंसेवक यांच्यासह वैद्यकीय आरोग्य व सार्वजनिक आरोग्य सेवाही कार्यरत होते.

सर्व विसर्जन स्थळांवर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलीस यंत्रणा तसेच सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत सतर्कतेने कार्यरत होती. अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन सोहळा सुव्यवस्थित रितीने संपन्न होण्यासाठी १ ते ६ प्रभाग समिती कार्यालय क्षेत्रात सर्व यंत्रणा सुसज्ज होत्या.

सहाय्यक आयुक्त व महानगरपालिका अधिकारी तसेच कर्मचारी यांनी अनंत चतुर्दशी व इतर विसर्जन सोहळ्यानिमित्त केलेल्या नियोजनाचे मा. आयुक्त यांनी समाधान व्यक्त करत सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे आभार व्यक्त केले.

तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मिरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनास अनंत चतुर्दशी दिवशी व इतर विसर्जन सोहळ्यात उत्कृष्ट सहकार्य केल्याने आयुक्त दिलीप ढोले यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

मराठा आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत नोकर भरतीला अटकाव घाला; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक वर्षांपासून राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप प्रलंबित असून यावर सत्ता परिवर्तन होऊन सुद्धा या मुद्द्यावर तोडगा निघण्याचा कुठलाही मार्ग सध्यातरी दिसत नाही आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु महाविकास आघाडी सरकारमध्ये याबाबत कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात आले नाही, त्यामुळे हल्लीच्या सरकारकडून क्रांती मोर्चाला आशा लागून आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, असे साकडेच सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुका क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. यावर महिनाभऱ्यात काहीतरी तोडगा निघावा अशी मागणी क्रांती मोर्चाने केली आहे, अन्यथा नाईलाजाने १० ऑक्टोबर पासून आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना नुकतेच देण्यात आले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण रखडल्याने समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत असल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली. यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी नोकरीपासून वंचित होत आहे, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत नोकरभरती थांबवा, अन्यथा आम्ही बेमुदत आमरण उपोषणाचा पर्याय निवडू, असा विनंतीवजा सूचक इशारा मराठी क्रांती मोर्चाने दिला आहे.

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा नव्या विक्रमाची नोंद त्याच्या नावे करणारा पहिला भारतीय ठरला..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारताचा स्टार खेळाडू व ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राने पुन्हा एकदा उत्तुंग कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नुकतीच स्वित्झरलँडच्या ज्युरिख येथे ‘डायमंड लीग’ स्पर्धा पार पडली, यामध्ये भालाफेक खेळात नीरजने स्वतःच्या तसेच देशाच्या नावे एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. ‘डायमंड लीग ट्रॉफी’ जिंकणारा नीरज हा पहला भारतीय ठरला आहे, यामुळे त्याची ही कामगिरी ऐतेहासिक ठरली आहे. या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करत नीरजने अन्य दोन खेळाडूंचा पराभव करून अंतिम विजेतेपद आपल्या नावे केले.

नीरजने ८८.४४ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेज व जर्मनीच्या जुलियन वेबर या दोन प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. स्पर्धेत वाईट सुरुवात झाली असताना देखील अखेर नीरजने दमदार प्रदर्शन करत देशासाठी गौरवाची कामगिरी केली. या अगोदर ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजने देशाचा अभिमान उंचावणारा विक्रम केला होता. आता ‘डायमंड लीग ट्रॉफी’ मिळवत नीरजने पुन्हा एकदा विदेशाच्या भूमीवर देशाचे नाव मोठे करणारा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे, त्यामुळे नक्कीच त्याची ही कामगिरी कौतुकास्पद आहे.