Home Blog Page 130

५ कोटी खंडणी च्या बदल्यात ‘ललित हॉटेल’ उडवून देण्याच्या धमकी प्रकरणी मुंबई पोलीसांची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईच्या सहार विमानतळा शेजारील पंचतारांकित हॉटेल ‘द ललित’ मध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवलेत ५ कोटी दे नाहीतर संपूर्ण हॉटेलला उडवून देण्याची धमकी आल्यानंतर मुंबई पोलीसांनी या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध ललित हॉटेलला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ‘५ कोटी द्या नाहीतर चार ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत’, अशी धमकी काल देण्यात आली होती. या प्रकरणी आता पोलीसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी यामध्ये गुजरातमधील वापी येथून २ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वलसाड आणि वापी येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. सहार पोलीसांनी आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. आरोपींनी पहिल्या कॉलमध्ये ५ कोटी आणि नंतर तडजोड करून ३ कोटींची मागणी केली होती. यासाठी त्याने हॉटेलमध्ये ४ बॉम्ब लावले असल्याचं धमकावलं.

मुंबईला उडवण्याच्या धमकीनंतर पोलीसांची सगळ्यात मोठी कारवाई, विरारमधून एकाला अटक

सहार पोलिसांनी आरोपीच्या शोधात गुजरात गाठले आणि दोघांना अटक केली. यानंतर आता पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती येत आहे. दरम्यान, मुंबईला दहशतवादी हल्ला करत उडवून देण्याची धमकी आल्यानंतर आता या धमकीच्या फोनने संपूर्ण मुंबई अलर्टवर गेली आहे. मुंबईतील ललित होटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी काल देण्यात आली होती. सोमवार संध्याकाळी फोन करून ही धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एका अज्ञाताने ललित हॉटेलमध्ये फोन करून पैशांची खंडणी मागितली. यामध्ये त्याने तब्बल ५ कोटींची खंडणी मागितली आहे. हॉटेलमध्ये ४ ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत असं आरोपीने सांगितलं. या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आता एकाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आता पुढे काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य केलेली ‘राज्य मराठी विकास संस्थे’ची मुंबईतील जागा कायम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागानं पाठवलंय. त्यामुळे मुंबईत आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्त्वाचा विषय विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात मांडला.

दरम्यान, मराठी भाषा विकास संस्थेच्या कार्यालयाची जागा यापुढेही त्यांच्याकडे कायम राहील, हे सुनिश्चित करण्याची आग्रही मागणी अजित पवारांनी यावेळी केली. त्यावर ही जागा मराठी विकास संस्थेकडे कायम राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील ‘एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या आवारात पहिल्या मजल्यावर मराठी विकास संस्थेची जागा आहे. मात्र ती जागा सोडण्याचे पत्र आल्याने मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या विकास संस्थेला मुंबईतच बेघर व्हायची वेळ आली होती. सरकारकडून पुरवणी मागण्या, गुजराती, सिंधी भाषांसाठी निधीची तरतूद केली, आम्ही सर्वांनी त्याचे स्वागत केले. महाराष्ट्रात मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी अपेक्षा आम्ही त्यावेळी व्यक्त केली होती. त्यानुसार मराठी भाषा संस्थेची जागा कायम ठेवण्याचे आदेश करण्याची मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.

त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ही जागा मराठी भाषा विभागाकडेच राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या संस्थेच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने जागा रिकामी करण्याचे पत्र परस्पर कसे दिले ? याची चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

सणासुदीच्या काळात खाद्यतेल अर्ध्याने स्वस्त; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

गेल्या काही दिवसांत महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महागाईवर मात करण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. खाद्य तेल कंपन्यांना प्रतिलिटर तेलाचे दहा रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारचे तेल कंपन्यांना कडक निर्देश

खाद्यतेलाच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. देशभरातील एकाच ब्रँडच्या खाद्यतेलाची एमआरपी समान ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले. खाद्य तेल कंपन्यांना किरकोळ किमती कमी करण्यास सांगण्यासाठी अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बुधवारी बैठक घेतली.

जगभरात स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती घसरल्या असतानाही देशात चढा भाव आकारत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना जागतिक किंमतीतील दर कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत. भारत दरवर्षी आपल्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेच्या ६० टक्के आयात करतो.

‘सॉल्व्हेंट असोसिएशन ऑफ इंडिया’चे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावर किंमत ३००-४०० डॉलर प्रति टन कमी झाली आहे. पण त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागेल. येत्या काही दिवसांत भारतात खाद्यतेलाच्या किंमतीही घसरतील असे अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी बुधवारी मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीत  सांगितले.

 

‘धर्मांतरबंदी कायदा’ महाराष्ट्रात लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत असल्याने राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त आयोजित पत्रकार परिषदेला बोलत होते.

पालघर जिल्ह्यातील डहाणू पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातही आदिवासी महिलेच्या धर्मांतराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकताच संभाजीनगर येथेही एक पाद्री ‘चंगाई सभे’त गंभीर आजार बरे करण्याचा दावा उघडपणे करतांना दिसून आला. धर्मांतराचा प्रयत्न होत असलेल्या घटना या केवळ हिमनगाचे टोक असून राज्यात मोठ्या प्रमाणावर छुप्या पद्धतीने धर्मांतराच्या घटना घडत आहेत. यापूर्वी राज्यात काँग्रेसी शासन असतांना महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांच्या संदर्भात निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने २९ नोव्हेंबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र शासनाला ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करण्याची शिफारस केली होती. या शिफारसीनुसार शासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी आणि राज्यात कठोर ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन केली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे घनवट यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, ‘लंगडा चालू लागेल’, ‘आंधळ्याला दिसू लागेल’, ‘बहिरा ऐकू लागेल’ आदी धादांत अंधश्रद्धेचा खोटा प्रचार करणार्‍या ‘चंगाई सभां’चा राज्यात सुळसुळाट झाला आहे. या सभांतून गोरगरीब हिंदूंना ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित केले जाते. फरार आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’च्या रिझवान खान आणि अर्शद कुरेशी यांना काही वर्षांपूर्वी कल्याण येथून अटक केली होती. या दोघांनी सुमारे ७०० हिंदूंचे फसवून अन् प्रलोभनाद्वारे इस्लाममध्ये धर्मांतर केले होते, असे आतंकवादविरोधी पथकाच्या तपासात आढळून आले होते.

देशात प्रतीवर्षी १० लाख हिंदू धर्मांतरीत होत आहेत. हिंदूंचे धर्मांतरण हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. नागालँड, मिझोराम, मेघालय, अरूणाचल प्रदेश, मणिपूर ही राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत. भारतात हिंदु ९ राज्यांमध्ये अल्पसंख्य झाले आहेत. यातील काही राज्यांत ‘स्वतंत्र देश’ घोषित करण्याच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे म्हटले होते, याचा प्रत्यय या घटनांतून येत आहे.

नुकतेच पुणे जिल्ह्यातून ८४० महिला-मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’नुसार वर्ष २०१८ मध्ये महाराष्ट्रातून १८,९०१ महिला-मुली बेपत्ता झाल्या होत्या. या मुली जातात कुठे ? ‘लव्ह-जिहाद’ मध्ये अडकतात, आखाती देशांत विकल्या जातात, लग्नाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसायात पाठवल्या जातात कि आणखी काय होते, याचा छडा लागायला हवा. याच संदर्भात तत्कालीन नि. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने मध्यप्रदेश आणि ओडिसा राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, अशी शिफारस शासनाला केली होती. आजघडीला देशात उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, ओडिसा, झारखंड, कर्नाटक या १० राज्यांनी ‘धर्मांतरबंदी कायदा’ केला आहे. गोव्यातही तशी शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही हा कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी श्री. घनवट यांनी या वेळी केली.

 

स्वप्ना पाटकरांना ईडीचा समन्स; पत्राचाळप्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत सध्या पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी तुरुंगात असून या प्रकरणी स्वप्ना पाटकर या मुख्य साक्षीदार आहेत. ‘ईडी’ने स्वप्ना पाटकर यांना चौकशीसाठी बोलावले असून याबाबत समन्स बजावला आहे. सध्या राऊत यांच्या कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे जमीन खरेदी व्यवहार झाला असून, या प्रकरणात संजय राऊतांवर स्वप्ना पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहे. यापूर्वी पत्राचाळ प्रकरणी स्वप्ना पाटकर यांचा जवाब ‘ईडी’ने नोंदविला असून, पाटकर काही नवीन माहिती देणार आहे, यामुळे संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सुजित पाटकर हे संजय राऊतांचे जवळचे व्यक्ती असून स्वप्ना पाटकर यांचे पती देखील होते, सध्या स्वप्ना पाटकर व सुजित यांच्यात घटस्फोट झाला आहे. ‘ईडी’ने स्वप्ना पाटकर यांना समन्स बजावल्याने त्यांना पुन्हा एकदा चौकशीकरिता हजर रहावे लागणार आहे. येत्या काळात स्वप्ना पाटकर काय खुलासा करतात यावर सर्वांचे लक्ष लागले असून लवकरच याप्रकरणी नवीन धागेदोरे ईडीला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.