Home Blog Page 132

दुर्मिळ प्रजातीचा वन्यजीवन सर्प मांडूळ साप काळा जादू करण्यासाठी ७० लाख रुपयांना विकणाऱ्या टोळीला कल्याण झोन-३ च्या डीसीपी स्कॉड ने केले अटक..


संपादक: मोईन सय्यद  / प्रतिनिधी: अवधुत सावंत

काळा जादू करण्यासाठी मांडूळ सापाची तस्करी करण्याऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण झोन -३ च्या डीसीपी स्कॉड ने अटक करत ७० लाख रुपये किंमतीचा २ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ४४ इंच लांबीचा एक दुर्मिळ प्रजातीचा मांडूळ वन्यजीव साप जप्त केला आहे व या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ता पाच जणांच्या टोळीने किती लोकांना असे मांडूळ साप विकले आहेत याचा पुढील तपास कल्याण झोन-३ चे पोलीस करत आहेत.

कल्याण झोन-३ चे उपयुक्त सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली की पालघर येथें राहणारे काही लोकं मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार आहेत. डीसीपी स्कॉड चे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे सह पथकाने रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अग्रवाल कॉलेज जवळ सापळा रचला. ३ दुचाकी वरून ६ लोकं संशयित रित्या पोलीसांना येताना दिसले. डीसीपी स्कॉड पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी ता सहा जणांना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून मांडूळ साप आढळण्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३३३/२०२२ वन्यजीवन (संरक्षण) अधिनियम १९७२ व सुधारित अधिनियम २००३ मधील कलम ३९(३)(अ) सह कलम ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे व
मांडूळ वन्यजीव सर्प हस्तगत करून तो वनविभाग व मानद वन्यजीव रक्षक, कल्याण जिल्हा ठाणे यांच्या ताब्यात सुरक्षिततेकरिता देण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण, मा. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ – ३ कल्याण व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, कल्याण विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक नंदकुमार केचे, पोलीस निरीक्षक शरद झिने (गुन्हे), खडकपाडा पोलीस ठाणे, कल्याण (प), पोहवा.पाटील, पोकॉ. भालेराव नेम-नियंत्रण कक्ष कल्याण, पोहवा. शेले, पोहवा.देवरे, पोकॉ बोडके व पोकॉ. तागड नेमणूक खडकपाडा कल्याण (प) यांनी केलेली आहे.

 

उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडल्याने शिवसेनेचा निकाल कधी लागणार ?


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सत्तासंघर्षावरील उद्याची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. मागील सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले होते. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठातील एक न्यायाधीश उद्या उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ४ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना आता कुणाची ? या मुद्द्यावर निवडणूक आयोगाकडे धाव घेत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने चार आठवड्यांचा वेळ मागितला होता. मात्र आयोगाने केवळ दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. त्याची मुदत २३ ऑगस्ट रोजी संपत असून सुप्रीम कोर्टाची सुनावणीही आता २३ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे.

आजची सुनावणी उद्या

तीन सदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती सी.टी. रवी कुमार उद्या अनुपस्थित राहणार असल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्याची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली.

गेल्या सुनावणीत, सरन्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले होते की, या प्रकरणावर सखोल कायदेशीर युक्तिवादाची आवश्यकता असल्यास, हे प्रकरण व्यापक घटनापीठाकडे पाठविण्याचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे याप्रकरणी घटनापीठ स्थापनेबाबत न्यायालय काय निर्णय घेते, याकडे राजकीय निरीक्षकांच्या दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे. २६ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा निवृत्त होत असून, त्यापूर्वी निर्णय होण्याची अपेक्षा शिवसेनेला आहे.

मातंग समाजाचे नेते स्व. बाबासाहेब गोपले यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करणार!- सुरेशचंद्र राजहंस

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: सुरेशचंद्र राजहंस महाराष्ट्रात मातंग समाजाला राजकीयदृष्टय़ा जागरूक करून, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब गोपले साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त मानखुर्द येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री सुरेशचंद्र राजहंस साहेब यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ व क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची ज्यांच्या प्रमुख योगदानातून निर्मिती झाली, रस्त्यावर उतरून मातंग समाजाचा आवाज शासन दरबारी पोहचायचे ते मातंग समाजाचे लढवय्या नेते बाबासाहेब गोपले साहेब यांचे मुंबईत भव्य असे स्मारक व्हावे यासाठी राष्ट्रीय मातंग महासंघ व अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते राजहंस म्हणाले.

मानखुर्द येथील गोपले साहेब यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी व मातंग समाजाच्या आदरणीय नेत्या कुसुमताई गोपले मॅडम यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय मातंग महासंघाचे मुंबई अध्यक्ष सजीत चांदणे, अन्याय निवारण कृती समितीचे मुंबई सचिव दिलीपराव कसबे, जिल्हा अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्वांपर्यंत विकासाची दहीहंडी फोडून मलाई पोहोचवू; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

येत्या काळात शिंदे सरकार विकासाची दहीहंडी फोडून त्यातील मलई राज्यातील प्रत्येकापर्यंत पोहोचवली जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. अमरावती येथे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात फडणवीस बोलत होते.

मलाई ही एकट्यानेच खायची नसते तर ती सर्वांनीच वाटून खायची असते. शिंदे सरकारच्या काळात यापुढे राज्यात सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतील हनुमान चालीसा म्हणणार्‍या कुणालाही जेल मधे टाकले जाणार नाही तर हनुमान चालीसा म्हणणार्‍याचा सत्कार करण्यात येईल असे सांगून आता आमचे सरकार अमरावती सह सर्व विदर्भाचा सर्वांगीण विकास करेल असे फडणवीस म्हणाले.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी खासदार नवनीत राणा, अभिनेता गोविंदा, खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड इत्यादी उपस्थित होते.

कल्याणमध्ये २५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तिघांना अटक…


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

२५ लाखांचा राज्यातील प्रतिबंधित गुटखा जप्त करून कल्याण झोन – ३ च्या डीसीपी स्कॉड च्या  पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. मशाक इनामदार, लव सहानी, प्रेमचंद वाठोरे अशी या तिघांची नावे आहेत.

कर्नाटकहून उल्हासनगरला कल्याण येथील गांधारी मार्गे गुटख्याचा कंटेनर येणार असल्याची माहिती कल्याण झोन – ३ च्या डीसीपी स्कॉडचे पोलीस कर्मचारी ऋषिकेश भालेराव आणि संजय पाटील यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार डीसीपी स्कॉड आणि खडकपाडा पोलीसांनी गांधारी रोडवर सापळा रचत भिवंडी पडघा मार्गे कल्याणमध्ये येत असलेला गुटख्याचा एक कंटेनर पोलीसांनी अडवला. त्या कंटेनरची तपासणी केली असता, त्यामध्ये ‘फोर के स्टार’ नावाचा गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. सदर गुटख्याची बाजारभाव किंमत अंदाजे २५ लाख रुपये आहे. दरम्यान, पोलीसांनी या तिघांना अटक केली असून, हा गुटखा कोणाला देण्यासाठी आणला गेला याचा पुढील तपास चालू आहे असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.