Home Blog Page 138

राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पंकजा मुंडे यांच्या मनातील नाराजी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांचा शपथविधी सोहळा नुकताच काही दिवसांपूर्वी पार पडला असून शपथ घेणाऱ्यांमध्ये अनेक जुन्या मंत्र्यांचा समावेश होता. नव्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागते, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. या मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी दिली जाईल असा अंदाज होता, परंतू त्यांना डावलण्यात आल्याने अनेक जणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पंकजा मुंडे यांनी सावध भूमिका घेतली होती व यावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले होते, परंतू रक्षाबंधन निमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर राखी बांधण्याकरिता पंकजा मुंडे यांच्याकडे आले असता प्रसार माध्यमांनी मुंडे यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी मंत्रिमंडळात स्थान न देण्याचा प्रश्न उपस्थित केला असता पंकजा यांनी मनातील नाराजी व्यक्त केली. यावेळी त्या म्हणाल्या की, “पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नसेल, मात्र जेव्हा वाटेल तेव्हा ते देतील” अशा प्रकारे मुंडे यांनी पक्षश्रेष्ठी व नेतृत्वावर निशाणा साधला.

पुढे संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्याबाबत पंकजा यांचे मत जाणण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला असता, ज्यांनी राठोड यांना मंत्रिपद दिले त्यांनाच प्रश्न विचारा यावर मी काय बोलणार असे सावध उत्तर त्यांनी दिले. एकंदरीतच मंत्रीमंडळातून डावल्याबाबत पंकजा यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती.

 

गिरणी कामगारांची फसवणूक केली म्हणून गिरणी कामगारांने म्हाडाला खेचले कोर्टात!

मुंबई: मुंबईतील गिरणी कामगारने म्हाडाच्या घराची किंमत रू ७.५ लाख एवढी रक्कम स्वीकारून देखील, आजपर्यंत घराचे वितरण दिले नाही, म्हणून त्या रकमेवर व्याज मिळावे व तसेच घराचे वितरण व्हावे म्हणून म्हाडाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका (स्टॅम्प) क्र. २५६५२/२०२२ दाखल करून म्हाडाला कोर्टामध्ये खेचले आहे व तसेच गिरणी कामगाराचे दहा वर्षे पैसे वापरले म्हणून नुकसान भरपाईची मागणी करून याचिका दाखल केली.

याबाबत याचिकेतील वकील एड. नितीन सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, २०१० खाली चंद्रकांत शंकर मयेकर यांनी गिरणी कामगारांसाठी सरकारने राबवलेल्या योजनेमध्ये अर्ज केला असता त्यांना गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांची लॉटरी लागली त्यानंतर टप्प्याटप्प्याने तर, कधी थोडा उशीर करून पण त्यांनी आजतागायत ७.५ लाख रुपये एवढी रक्कम चुकती केली.
संपूर्ण रक्कम स्वीकारल्यानंतर म्हाडाने मुंबईतील गिरणी कामगारांसाठी तयार केलेल्या घरांचा  घराचा ताबा न देता, संपूर्ण पैसे स्वीकारून देखील, वितरित केलेले कामगारांसाठी असलेले घराचा ताबा दिला नाही, उलटपक्षी त्यांचे वितरण रद्द केले गेले मागील दहा वर्षे गिरणी कामगार आणि भरलेले पैसे वापरत आहेत.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगारांचा फार मोलाचा वाटा व सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गिरणी कामगारांच्या सहभागाचा फार मोठा वाटा होता या चळवळीत अनेक हुतात्मे झाले तर अनेक आजही जिवंत आहेत त्याच चळवळीतील एक कार्यकर्ता शंकर मयेकर यांचे सुपुत्र असलेले चंद्रकांत शंकर मयेकर यांनी २०११ साली म्हाडाच्या या योजनेत घर मिळावे म्हणून अर्ज केला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्या व मुंबई गिरणी कामगार असलेल्या कुटुंबाला म्हाडा ने वितरित केलेले घर त्यांच्या दिनांक ९/७/२०१९ च्या आदेशान्वये रद्द केले.

सदरच्या आदेशाने व्यथित होऊन चंद्रकांत शंकर मयेकर यांनी जनहित याचिका दाखल करण्यासाठी प्रसिद्ध असलेले त्यांचे वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालय येथे म्हाडाच्या विरुद्ध नुकसान भरपाई  तसेच घेतलेल्या रकमेवर व्याज मिळावे व ज्यांचे वितरण रद्द केले आहे त्यांना पुन्हा वितरित करावे म्हणून अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

डोंबिवलीकरांकडून कॅबिनेटमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांचे गुलाल उधळत नागरिकांच्या जल्लोषात जोरदार स्वागत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारचा ४० दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीत जल्लोष करण्यात आला. ढोल-ताश्यांच्या गजरात कार्यकर्त्यांनी वाजत गाजत रवींद्र चव्हाण यांची मिरवणूक काढली.

आमदार रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वामुळे राजकीय यश मिळाले आहे. कार्यकर्ता, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री अशा क्रमवारीत भाजपाला नेहमीच चढत्या क्रमवारीत सिध्द केले आहे. आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पद मिळवुन रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक नवा मानाचा तुरा खोवला आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार होताना डोंबिवलीतील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांना नक्की कॅबिनेटमंत्रीपद मिळेल अशी खात्री डोंबिवलीकरांना होती आणि झालेही तसेच. चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि डोंबिवलीकरांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. संध्याकाळी साधा कार्यकर्ता आणि अनेकांचे लाडके दादा रवींद्र चव्हाण आपल्या दृष्टीपथास कधी मिळेल या प्रश्नांनी अनेकांचे फोन वाजत होते. आणि पाच वाजताच डोंबिवलीच्या सीमेवर कॅबिनेट मंत्रीपद मिळालेला दादा रवींद्र चव्हाण सर्वांना पहावयास मिळताच गुलालाची उधळण आणि पुष्पहार, गुच्छ देणं सुरू झाले. हजारो डोंबिवलीकर घरडा सर्कल ते श्री गणपती मंदिर रॅलीत सामील होत ढोल-ताशा, बँड वाजंत्री रॅलीत नाचगाण्यात दंग झाले होते.

दरम्यान टिळकांचा पुतळ्याला पुष्पहार घालून रवींद्र चव्हाणांनी अभिवादन केले. नंतर श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि दरम्यान गणेश मंदिर संस्थान तर्फे चव्हाणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक नेते तथा पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिकांनी चव्हाणांचे स्वागत व अभिनंदन केले. यावेळी चव्हाण म्हणाले, विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी कार्यरत राहीन, नागरिकांच्या हिताचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवेन. यावेळी रिपाई डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड, समाधान तायडे यांसह कार्यकर्त्यानी मंत्री चव्हाण यांचे अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब, पूनम पाटील, सुहासिनी राणे, दिनेश जाधव, मनोज पाटील, मुकुंद पेडणेकर, मंदार टावरे, सुजित महाजन, वर्षा परमार, मनीषा छल्लारे, मयुरेश शिर्के, मितेश पेणकार, मिहीर देसाई, हरीश जावकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या जल्लोषात सहभागी झाले होते.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने रक्षाबंधना निमित्त गडचिरोली पोलिस बांधवां प्रती ऋणानुबंध केले व्यक्त!

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई: देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती प्रत्येक जण सन्मान, आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करीत असतात परंतु देशांतर्गत गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरात जे पोलीस दलाचे जवान आपले प्राण पणाला लावून देशाची सुरक्षा करीत असतात त्यांच्याकडे मात्र फारसे कुणी लक्ष देत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन ह्या रक्षा बांधनाच्या सणाला एक वेगळे रूप देऊन साजरे करण्याचा निर्णय एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाने घेतला असून गडचिरोली सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातील पोलीस बांधवांकरिता विद्यापीठा तर्फे 4000 राख्या पाठविण्यात आल्या आहेत.

ऋणानुबंध उपक्रमांतर्गत गडचिरोली पोलिस बांधवांसाठी एस.एन.डी. टी महिला विद्यापीठाच्या मा.कुलगुरू, प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व एस.एन. डी. टी महिला विद्यापीठाच्या परिवारातर्फे 4000 राख्या आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस बांधवांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. ऋणानुबंध ह्या उपक्रमास एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ह्या सर्वांनी भरघोस प्रतिसाद दिला.

गडचिरोली पोलिसांसोबत रक्षा बंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करून त्यांच्याप्रती एक कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणे हा ऋणानुबंध उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असं मत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच समाजकार्य विभागाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी व्यक्त केले.

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठी रंगभूमी वरील आघाडीचे अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराने आज पहाटे त्यांच्या मुंबईतील राहत्या घरी ( झावबावाडी, चर्नी रोड ) येथे निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते.

मराठी रंगभूमीवर ‘मोरूची मावशी’, ‘बायको असून शेजारी’, ‘लग्नाची बेडी’ यासह असंख्य मराठी नाटकात तसेच मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपटात आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून एक गुणी, निगर्वी स्वभावाचा सहजसुंदर अभिनय करणारा अभिनेता आपण गमावला असे म्हटले आहे