Home Blog Page 139

संजय राऊतांच्या “रोखठोक” प्रश्नी ईडी सतर्क..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

संजय राऊतांनी शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून रोखठोक सदर लिहिलं आणि ईडी आणखी सतर्क झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेले राऊत हे तुरुंगातून लेख लिहायला स्वातंत्र्यसेनानाही आहेत का? असा प्रश्न मनसेचे संदीप देशपांडेंनी विचारला होता. ‘ईडी’च्या कोठडीत असताना राऊतांनी लिखाण कसं काय केलं, या प्रकरणी ‘ईडी’ तपास करणार असल्याच बोलले जात आहे. तुरुंगात असताना कोणतीही व्यक्ती अशा प्रकारे लेख लिहू शकत नाही. लेख लिहायचा असेल, तर न्यायालयाच्या विशेष परवानगीची आवश्यकता असते. त्याशिवाय लेख लिहिता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणात ‘ईडी’कडून संजय राऊतांची चौकशी होणार असल्याचं वृत्त आहे. रविवारी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कठोर टीका केली होती.

मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती गेले तर मुंबईत पैसा शिल्लक राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. जेव्हा मराठी उद्योजक साखर कारखाने, गिरण्या आणि इतर उद्योग चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ‘ईडी’ त्यांच्यावर कारवाई करते. त्याबद्दलही राज्यपाल कोश्यारींनी काहीतरी बोलायला हवं. असे राऊतांनी आपल्या लेखात नमूद केले होते, या रोखठोकबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका करत शंका उपस्थित केली होती. आता या प्रकरणाची ‘ईडी’कडून चौकशी केली जाणार आहे.

“घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवार दि. १२ ऑगस्ट रोजी शाळा, विद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट-गाईड विद्यार्थी यांच्या भारतीय सांस्कृतिक पोशाखातील प्रभाग फेरीचा आयोजन !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विध्यार्थी, पालक, बालक आणि बालकांचे शिक्षक यांचे राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असते, त्यामुळे आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उचित साधून “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने देखील कंबर कसली असून महापालिकेचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये तसेच महापालिका परिक्षेत्रातील इतर शाळांमध्ये देखील “घरोघरी तिरंगा” या उपक्रमासाठी दिनांक ०१ ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या घेण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने हा उपक्रम घरोघरी पोहोचविण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रत्येक शाळेत पालक सभा ही आयोजित करण्यात येत आहे आणि आता “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी गुरुवार दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी कल्याण व डोंबिवली विभागांतर्गत शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी, स्काऊट गाईड चे विद्यार्थी त्यांच्या भारतीय संस्कृती पोशाखातील प्रभाग फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

कल्याण मध्ये या प्रभाग फेरीचा प्रारंभ १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता बिर्ला महाविद्यालयातून होणार असून बिर्ला महाविद्यालय- आरटीओ कार्यालय – वाणी विद्यालय – साई चौक – राधानगर – वायले नगर – त्रिवेणी गार्डन – शासकीय गोडाऊन – लालचौकी – पारनाका – गांधी चौक – सुभाष मैदान येथे पोहोचून सामूहिक राष्ट्रगीता नंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल तर डोंबिवली मध्ये गुरुवारी सकाळी ८.०० वाजता सावळाराम क्रीडा संकुल घरडा सर्कल येथून प्रभाग फेरीचा प्रारंभ होणार असून सावळाराम क्रीडा संकुल – घरडा सर्कल – शेलार नाका, शाळेकडून, गोग्रासवाडी रोड – गोपाल नगर मार्ग – टायटन शोरूम जवळून टिळक पुतळा चौक मार्गे फते अली शाळा येथे पोहचून सामूहिक राष्ट्रगीतानंतर या प्रभाग फेरीची सांगता होईल असे या प्रभात फेरीचे नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी विजय सरकटे व वंदना गुळवे उपायुक्त (शिक्षण संस्था) यांच्या कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.

 

मनसे’ पक्षाचा राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच “जे चाललंय ते सर्वच खपवून घेणार नाही” असा ट्विटरद्वारे दिला सरकारला सज्जड दमवजा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तरावरून आज डोंबिवलीतील मनसे पक्षातील एकमेव आमदार राजू पाटील यांनी ‘ट्विटर’ द्वारे खोचक सवाल केला होता. सरकारच्या बाजूने मतदान करणारे मनसे आमदार राजू पाटील यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा मुहूर्त सापडलेला असताना आणि सरकार मंत्र्यांची यादी बनविण्यात व्यस्त असताना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मात्र सरकारला ट्विटरद्वारे सज्जड दमवजा इशारा दिला आहे. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातील रखडलेली रस्त्यांची कामे रस्त्यांची झालेली दुरावस्था याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष्य केलं आहे. या पूर्वी मनसे आमदार पाटील यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला होता, तर आता त्यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे.

कल्याण-डोंबिवली खड्ड्यावर काय बोलले मनसे पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील ?

डोंबिवलीतील एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे सुरू व्हावीत यासाठी बॅनर फाटले, उलटे लावून झाले, तरी कामे अजून सुरू झाली नाहीत, असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही यांना समर्थन दिले याचा अर्थ असा नाही की वाईट गोष्टींनाही आमचं समर्थन असेल. कोणीतरी बोलायला पाहिजे, ते आम्ही बोलतं आहोत. या मागची भावना व भूमिका कोणावर टीका करण्याची नाही, तर या कामाकडे लक्ष द्यावे अशी आहे. जिथे कामे झालेली नसतील तिथे आम्ही बोलणारच. आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकारला पाठिंबा दिला याचा अर्थ असा नाही जे चाललंय ते सर्वच आम्ही खपवून घेऊ. जिथे अन्याय दिसेल तिथे आम्ही बोलणार, आमच्या पद्धतीने मांडणार, असा सज्जड दमवजा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीच आता राज्याचे मुख्यमंत्री असताना निदान जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे तरी भरले जावेत हीच अपेक्षा !

पाऊस जोरात होता, त्यावेळी खड्डे भरता येत नाही हे समजू शकतो, मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स बनवण्याची घोषणा केली. मात्र तसे कुठे डोंबिवली – कल्याणमध्ये कुठेही झालेले नाही. इथे सगळे तात्पुरते काम करून जात आहेत. इथे प्रशासक आहे, लोकप्रतिनिधी नाहीत, राज्यात मंत्रिमंडळ नाही, ४० दिवस झाले आता, दाद मागायची कुठे ? असा खोचक टोला राजू पाटील यांनी सरकारला लगावत ‘ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हेच आता मुख्यमंत्री असताना आता तरी खड्डे भरले जावेत’, एव्हडीच अपेक्षा आहे अशी मागणी मनसे चे एकमेव आमदार राजू पाटील यांनी केली.

भाजपच्या १६ मंत्री राजीनामा देत नितीशकुमार यांचे सरकार कोसळले; बिहारमध्ये राजकीय भूकंप !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून नितीशकुमार यांचे सरकार कोसळले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजप पासून अधिकृतपणे फारकत घेतली आहे. त्यानंतर ते आज दुपारी राज्यपाल फग्गु चौहान यांची भेट घेवून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी राज्यपालांच्या भेटीची वेळही मागितली आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या या भेटीपूर्वी भाजपच्या १६ मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्वांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला असून नितीशकुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे पत्रही दिले आहे. उद्या किंवा परवा नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

नितीशकुमार आणि भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे. महिन्याभरातील घडामोडींवर नजर टाकल्यावर नितीश कुमार आणि भाजपमध्ये सर्व काही आलबेल सुरु असल्याचे दिसून येत नाही. नितीश कुमार यांनी एका महिन्यापासून भाजप पासून अंतर ठेवले आहे.

त्यामुळे नितीश कुमार आणि भाजपमध्ये काडीमोड होवून बिहारमध्ये ११ ऑगस्टपूर्वी ‘एनडीएचे सरकार’ पडेल आणि नितीश पुन्हा ‘राजद’ सोबत सरकार स्थापन करतील असे अंदाज बांधले जात होते.

 

दिवा येथे ‘कजरी महोत्सव’ कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

दिवा येथे रविवारी भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय आघाडीतर्फे ‘दिवा कजरी महोत्सव’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व सदर कजरी महोत्सव धुमधाम आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कजरी कार्यक्रमात उत्तर प्रदेशातील बलिया येथून आलेल्या गायिका सुनीता पाठक यांच्या “पिया मेहंदी लिया दा मोती झील से, जायके साईकिल से” या कजरा गीताने उपस्थित श्रोते उल्हासित होऊन मंत्रमुग्ध झाले होते.

या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, तर भारतीय नेते प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा, भटक्या विमुक्त आघाडीचे महासचिव शिवाजी आव्हाड, बिंदुरा फाउंडेशन च्या अध्यक्षा ऍडव्होकेट बिंदू दुबे, भाजपाचे अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला आघाडीचे अध्यक्षा ज्योती पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस श्रीयुत भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, प्रदेश भाजपाच्या महिला उपाध्यक्षा हर्षलाताई बुबेरा, रोशन भगत, उत्तर भारतीय आघाडी चे समशेर सिंग यादव, शीला गुप्ता, गौरीशंकर पटवा तसेच असंख्य उत्तर भारतीय कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.