Home Blog Page 144

राज्यपाल कोश्यारींच्या वक्त्याव्यवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीयांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंही त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचं म्हटलं आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मराठी माणसांमुळे मुंबई, महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालं आहे. राज्यपाल हे मोठं पद आहे. एक संविधानिक पद आहे, कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. १०६ हुतात्म्यांनी या मुंबईसाठी बलिदान दिलं आहे. मराठी माणसांमुळं मुंबईला वैभव मिळालंय. राज्यपालांनी काही खुलासा याबाबत केला आहे. पण त्यांनी कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतलीच पाहिजे, असंही ते म्हणाले. मुंबईत इतर राज्यातील लोकंही रोजगार मिळवतात, मात्र ते मुंबईच्या असलेल्या महत्वामुळं मिळत असतं. त्याचा अवमान कुणालाही करता येणार नाही. मुंबईवर अनेक प्रसंग आले, अनेक संकटं पाहिली. पण संकटकाळातही मुंबई थांबली नाही. करोडो लोकांनी मुंबई रोजगार देतेय, त्यामुळं असं अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्यावारील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेत म्हणाले.

पोलीसांच्या घरांना सर्वोच्च प्राधान्य देऊन घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पोलीसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलीसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्वं विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पोलीस गृहनिर्माण या विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव,अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, बृहन्मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त श्रीनिवासन, सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, प्रधान सचिव, (गृहनिर्माण) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (नगर विकास) सोनिया सेठी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सद्यस्थितीत राज्यातील मोठ्या प्रमाणात पोलीस घरापासून वंचित आहेत. त्यांना घरं मिळवून द्यायची असल्यास तेवढ्या मोठ्या संख्येने घरांची निर्मिती करण्याची गरज आहे. यासाठीच शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म असे तीन टप्प्यात काम करण्यासाठीचे नियोजन करण्यात यावे. तसेच, हा आराखडा तयार करतांना भाडेतत्वावर (रेंटल), शहरी जमीन कमाल मर्यादा (युएलसी) अंतर्गत, इतर शहरांतील पोलीस गृहनिर्माणासाठी आरक्षित भूखंडावरील प्रकल्प यांसह एसटी महामंडळाचे भूखंड विकसित करून, त्याबदल्यात घरे उपलब्ध करून घेता येतील अशा विविध पर्यायांचा विचार करण्यात यावा. पोलीस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच निधी उपलब्ध करण्याकरिता विविध पर्यायांचाही विचार केला जाईल. असेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आव्हानात्मक परिस्थिततीत सातत्याने कर्तव्यावर असणाऱ्या पोलीसांना हक्काची घरे तसेच शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्धार केला आहे. यासाठी विविध पर्याय आणि योजनांचा विचार करावा. म्हाडा, सिडको, एसआरए, क्लस्टर योजना यांसह घरकुल योजना, परवडणारी घरे तसेच एमएमआरडीए आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून पोलीसांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावीत यासाठी नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. पोलीसांसाठी घरे बांधताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सामुग्रीचा वापर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कामांना गती द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून पोलीस स्टेशन आणि पोलीसांच्या शासकीय निवासस्थानांची उत्कृष्ट आणि दर्जेदार निर्मिती करण्यात येत आहे. परंतु ही कामे अतिशय संथ पद्धतीने सुरु आहेत. या कामांना गती देण्याची गरज आहे.यासाठी कालमर्यादा निश्चित करून प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. तसेच
या इमारतीच्या निगराणीसाठी पोलीस गृहनिर्माण मंडळाने एक स्वतंत्र विभाग तयार करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. नवीन पोलीस स्टेशनचा इमारत आराखडा तयार करतांना सदर इमारती मध्ये अथवा परिसरात पोलीस सदनिका बांधण्याबाबत नियोजन करण्यात यावे असेही श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पोलीसांची घरे या विषयाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून पुढील चार वर्षासाठी ठोस धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पोलीस गृहनिर्माण कल्याण मंडळाच्या अपर पोलीस महासंचालक श्रीमती अर्चना त्यागी यांनी मंडळामार्फत सुरु असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.

 

सीबीएसई बोर्डात ९९.६०℅ गुण पटकावून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवत टॉपर बनलेली ‘होली एंजेल्स’ शाळेची विध्यार्थीनी कु.दीक्षा सुवर्णा चा कल्याण-डोंबिवली महापालिकेचे मा.आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे हस्ते जाहीर सत्कार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक २२ जुलै रोजी लागलेल्या यंदाच्या सीबीएसई बोर्ड २०२१-२२ इयत्ता १०वी च्या परीक्षेच्या निकालात डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम नगर आयरे रोड येथील ओम मातृछाया गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या व पीएनटी येथील ‘होली एंजेल्स’ शाळेत शिकत असणाऱ्या ह्या गुणवंत विद्यार्थिनी कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा हिने ५०० गुणांपैकी ४९८ गुण (९९.६०℅) पटकावत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला म्हणून आज डोंबिवली-कल्याण महापालिकेचे आयएएस दर्जा लाभलेले आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक देऊन कौतुक करत “महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनीने सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे” असे उद्गार काढून तिचा सत्कार करण्यात आला.

सोबत कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या गुणवंत विद्यार्थिनीचे पालक श्री व सौ सुरेंद्र सुवर्णा व ‘होली एंजेल्स’ संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओमेन डेव्हिड सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बिजॉय ओमेन, श्रीमती रफत शेख यांचा देखील यावेळी कडोंपा चे मा.आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आपल्या कल्याण-डोंबिवली करांसाठी सदर बाब सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी आहे व भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात किंवा भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश घेवून नागरिकांची सेवा करण्याचा मनोदय कु.दीक्षा सुवर्णा हिने यावेळी बोलताना व्यक्त केला.

या सत्कार सोहळया समयी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिमंडळ-१ चे उप-आयुक्त श्री.धैर्यशील जाधव, शिक्षण विभागाच्या उप-आयुक्त वंदना गुळवे, शिक्षणाधिकारी श्री. विजय सरकटे, श्री. श्याम भोईर, शिक्षण विभागातील कर्मचारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.

 

राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ६२व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख, उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या अधिकृत सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाउंटवरुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी आपल्या ट्विट व फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे की, “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना”.

डोंबिवलीतील भोपर येथे ‘भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज डोंबिवलीतील भोपर येथे ‘भाजपा बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत बिन्दूरा फाउंडेशन व जे.के.पाटील स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फ डिफेन्स या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजी आव्हाड यांच्या हस्ते झाले. या वेळेस त्यांनी आपल्या भाषणात मुलीने व महिलेने सेल्फ डिफेन्स च्या पोस्टमधून आपणा स्वतःला स्वयंपूर्ण करणे आवश्यक आहे हे सांगितले. कुठल्याही संकटाचा सामना करत असताना आपल्याला त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना व शिक्षकांना याची ट्रेनिंग दिली जाईल जेणेकरून भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होईल.

या कार्यक्रमाचे वेळेस भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सदस्याच्या पदाधिकारी ऍडव्होकेट बिंदू दुबे यांनी आपल्या भाषणात सेल्फ डिफेन्सचे महत्त्व सांगितले. यावेळेस सामाजिक कार्यकर्ते जे.के.पाटील स्कूल चे चेअरमन श्री गजानन पाटील, मुख्याध्यापिका मंजूषा पाटील, उपमुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

तीन दिवस चाललेल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना किक बॉक्सिंग व सेल्फ डिफेन्सच्या अनेक प्रकारांची ट्रेनिंग दिली जाणार आहे. यावेळी शिक्षक या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सेल्फ डिफेन्स चे सर्व ट्रेनिंग स्वतः घेऊन नंतर भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांना दर महिना याची ट्रेनिंग देणार आहेत.