Home Blog Page 143

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ वा जयंती महोत्सवाचा कार्यक्रम चेंबूर येथे पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं. अण्णाभाऊ साठे महामंडळ सक्षम करण्याचं काम सरकार करणार आहे. अण्णाभाऊंच्या कार्याला साजेसं स्मारक उभारण्यासाठी राज्यसरकार युद्ध पातळीवर काम करेल. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, यासाठी केंद्राकडे शिफारस करू, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिले.

त्यांचं प्रमाणे वीना तारण कर्ज योजना त्वरित चालू करणार असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. चेंबूर येथील अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मातंग समाज दिलेला शब्द फिरवत नाही, हा अनुभव मला ठाण्यात आलाय. आमचं सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरेंचीच भूमिका पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. मधली अडीच वर्षे सोडा, आता खऱ्या युतीचं सरकार आलंय. जे थांबलय ते पुढे नेऊ. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही आपल्याला सहकार्य आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावं, यासाठी केंद्राकडे शिफारस करणार आहोत. अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारक होते. त्यांनी देश हितासाठी काम केलं आहे.

 

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना अखेर ‘ईडी’ कडून अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजप यांच्यावर सातत्याने तोंडसुख घेण्यात मग्न असणारे आणि महाविकास आघाडीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांचा तकलादू शूरपणा त्यांच्याच अंगलट आला आहे. इतके दिवस ‘ईडी’ कार्यालयाकडून हजर राहण्यासाठी वारंवार नोटीसा येऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा शेवटी त्यांच्याच अंगलट आला आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ‘ईडी’ कडून काल अटक करण्यात आली आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली केली आहे. वारंवार नोटीस पाठवूनसुद्धा संजय राऊतांनी ईडीच्या कार्यालयात जाणे टाळले असल्याने शेवटी रविवारी सकाळी ईडीची धाड राऊतच्या घरावर पडलीच.

गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकासात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार प्रवीण राऊत यांचे नाव आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करून अखेर ईडीकडून संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. संजय राऊतांवर ईडीकडून अटकेची
होणारी कारवाई राजकीय सूडबुद्धीनेच होत आहे असा आरोप शिवसेना खा.अरविंद सावंत यांनी केला आहे.

 

डोंबिवलीतील ‘होली ऍंजेल्स’ आणि ‘पाटकर विद्यालय’ च्या मुलांनी ‘९ व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत’ महाराष्ट्रातर्फे बाजी मारून २ सुवर्ण पदक, ३ रजत आणि १ कांस्य पदक मिळवत राखलं वर्चस्व..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नववी स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धा २०२२-२३ उत्तराखंडमधील हरिद्वार येथे २७ ते २९ जुलै कालावधीत घेण्यात आली. यात महाराष्ट्राचा संघ २०१ विद्यार्थ्यांसह, श्री. सुनील शिंदे महाराष्ट्र सचिव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाला होता. यात सुवर्ण १२०, रजत ४५ , व २० कांस्य पदक पटकावत सदर स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल राहिला. या स्पर्धेत श्री.गणेश बागुल यांनी महाराष्ट्राचे मॅनेजर म्हणून काम पाहिले तसेच श्री.अविनाश ओंबासे यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले.

या ९ व्या स्टुडंट्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत योगा, बुद्धिबळ, कॅरम, कुस्ती, कराटे, कबड्डी, इत्यादी खेळांचा समावेश होता. डोंबिवलीतील ‘होली ऍंजेल्स’ शाळेचे ६ विध्यार्थी जिल्हा आणि राज्य स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत विजय प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. तसेच ‘चंद्रकांत पाटकर’ विद्यालयातील ९ विद्यार्थ्यांनी कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला होता. ‘होली ऍंजेल्स’ शाळेच्या सहाही विध्यार्थ्यानी चुरशीने खेळून स्पर्धेत पदके प्राप्त केली, यामध्ये २ सुवर्ण पदक, ३ रजत आणि १ कांस्य पदक मिळविले. निरव अढळकर आणि अर्विना मरगजे (सुवर्ण पदक) , शर्विल गमरे, वैष्णवी पाटील , ओम दांडे (रजत पदक) आणि प्रशवेत भोसले (कांस्य पदक) मिळवत महाराष्टाला अव्वल स्थान मिळवून दिले. तसेच पाटकर विद्यालयाने देखील कॅरम मध्ये ३ सुवर्ण, ३ रौप्य, २ कांस्य आणि बुद्धिबळ स्पर्धेत १ रौप्य पदक मिळवले. सर्व खेळाडूंचे संघ प्रशिक्षक म्हणून राजू घुले आणि विवेक म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या.

या स्पर्धेत एकूण २० राज्यातील विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये सहभाग घेतला होता, यामध्ये महाराष्ट्राने पदक तालिकेत प्रथम क्रमांक मिळवला तर आसाम दुसऱ्या स्थानी आणि आंध्रप्रदेशने तिसरा क्रमांक मिळवला. गिरिमित्र प्रतिष्ठानचे श्री.मंगेश कोयंडे आणि पदाधिकारी यांनी या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कल्याण स्थानकावर उत्स्फूर्तपणे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच डोंबिवली स्थानकावर आगमन होताच ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता कि जय’, या जय घोषात आणि टाळ्यांचा कडकडाटात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्री.मितेश पेणकर, सौ.जयश्री पांजणकार, ग्रामीण महिला आघाडी तसेच विलास खंडीजोड भाजपा जिल्हा सचिव आणि युवा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून विजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे मुंबईबद्दलचे वक्तव्य संताप आणणारे, माफी मागावी! – सुरेशचंद्र राजहंस

महाराष्ट्रद्रोही राज्यपाल कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलवावे! – काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई बद्दल केलेले वक्तव्य महाराष्ट्र व मराठी माणसाचा अपमान करणारे आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने अशी विधाने करू नयेत असे संकेत व परंपरा आहे पण हे महाशय राज्यपाल नसून भाज्यपाल आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. कोश्यारी यांचे मुंबईबद्दलचे वक्तव्य चीड आणणारे आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व महामहिम राष्ट्रपती यांनी कोश्यारी यांना परत बोलवावे, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महाराष्ट्र विरोधी वक्तव्ये केली आहेत. महापुरुषांच्या बाबतीतही कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्ये केली आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही कोश्यारी यांनी बडबड करून महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. आज पुन्हा त्यांनी मुंबई बद्दल बोलून मर्यादांचे उल्लंघन केले आहे. मुंबईच्या जडणघडणीत मराठी माणसाचाच मोठा वाटा आहे पण मराठी माणसाचे योगदान नाकारून राज्यपाल कोश्यारी यांनी नाहक वाद निर्माण केला आहे.
कोश्यारी यांचे वक्तव्य मुंबई व मराठी माणसाबद्दलचा त्यांचा द्वेष व्यक्त करणारे आहे. या वक्तव्याबद्दल राज्यपाल यांनी मुंबई व मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे.

भारतीय जनता पक्ष नेहमीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची बाजू घेत असतो. मुंबई बद्दलचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे वक्तव्य भाजपाला मान्य आहे का? याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे असे वाटत असेल तर कोश्यारी यांचा भाजपाने निषेध करून त्यांना परत पाठवण्याची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करावी, असेही राजहंस म्हणाले.

शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या शिवसेनेच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून चोख प्रत्युत्तर..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेच्या खेळीला ‘जशास तसे’ असे चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीला सुरुंग लावत राज्यात भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं. या सर्व सत्तासंघर्षापासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. सेना आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र मागितलं. शिवसेनेच्या या खेळीला शिंदे गटाकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय.

ठाण्यात समर्थकांकडून शपथपत्र मोहिम

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात समर्थकांनी शपथपत्र मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पाठिंबा असलेले कार्यकर्ते आणि समर्थक हे शपथपत्र भरण्यासाठी गर्दी करतायेत. शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र भरून देत आहेत. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत.

ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे मानले जात आहे असे सर्वत्र बोलले जात आहे.