Home Blog Page 150

नरेंद्र मेहताच्या उपस्थितीत काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा नगरसेवक अनिल विराणीचा दावा खरा की खोटा?

“त्यांचा” काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही” – प्रकाश नागणे (काँग्रेस प्रवक्ते, मिरा भाईंदर)

मिरा भाईंदर: जस जशी मिरा भाईंदर महानगर पालिकेची निवडणूक जवळ येत आहे तस तशी विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या राजकीय कोलांटउड्या मारणं सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारे आज रविवारी मिरारोड येथील प्रभाग 21 चे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या उपस्थितीत डॉ. स्वाती जगताप, दत्ता जगताप, भरतभाई शाह, संजय मोदी, राकेश गुप्ता, पिंकी मोदी, चंद्रकांत जगताप, मानव शाह, अनिता आंचन, भगवान मोरे या काही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून जाहीर केले आहे.

मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी भाजपचे नगरसेवक अनिल विराणी यांचा हा दावा खोडून काढला असून जे कार्यकर्ते भाजपमध्ये गेल्याचा दावा अनिल विराणी करीत आहेत त्यांचा काँग्रेस पक्षाशी काडीचाही संबंध नाही, आपल्याच कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भासवून वातावरण निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न अनिल विराणी करीत आहेत असा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केला आहे.

त्याच बरोबर काँग्रेसचे मिरा भाईंदरचे प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली असून “जे कधी काँग्रेसचे साधे कार्यकर्तेही नव्हते व ज्यांचा कॉंग्रेसच्या विचारधारेशी काडीचाही संबध नाही अश्या काही लोकांना काँग्रेसचे पदाधिकारी सांगत मेहतांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. गटबाजीने शहरात भाजपची वाताहात झाली आहे, त्यात काँग्रेसचा वाढता जनाधार पाहून भाजप वाल्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यानेच आपल्याच कार्यकर्त्यांना काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचे दाखवून नवीन नौटंकी चालू केल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा प्रवक्ता प्रकाश नागणे यांनी केला आहे.

या लोकांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतल्याची साधी पावती दाखवावी तसेच २०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचा प्रचार केला व कोणत्या प्रभागात व कोणत्या बुथवर काम केले ते जाहीर करावे असे थेट आव्हानच प्रकाश नागणे यांनी दिले आहे.

या घटनेमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा पुन्हा एकदा रंगू लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत असून त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांत ही रणधुमाळी आणखीनच वाढणार हे मात्र नक्की दिसत आहे.

मुळात आत्ताचे भाजपचे नगरसेवक अनिल विराणी हे एकेकाळी काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष होते व माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसेन यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. शिवाय त्यांच्या पत्नी रेखा विराणी ह्या 2012 च्या महापालिका निडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून नगरसेविका झाल्या होत्या. नंतर 2017 च्या महापालिका निवणुकीच्या आधीच दोन्ही विराणी दांपत्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता अनिल विराणी भाजपाच्या तिकिटावर नगरसेवक आहेत. त्यामुळे मूळचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण? आणि भाजपचे कार्यकर्ते कोण? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही.

येणाऱ्या काही महिन्यांत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आपल्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करीत असतात. तर काही कार्यकर्ते निवडणुकीच्या काळात आपल्या राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलत असतात. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारे राजकीय कार्यकर्ते कोलांट उड्या मारताना दिसणार हे मात्र नक्की!

एकनाथ शिंदेचा अजित पवारांना दणका; ९४१ कोटींच्या कामांना दिली स्थगिती..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाविकास आघाडीसोबत असताना त्यांच्याकडे नगरविकास मंत्रालयाचा कार्यभार होता, यावेळी त्यांनी नगरविकास विभागाच्या तब्बल ९४१ कोटींच्या कामांना मंजुरी देत निधीची व्यवस्था करून दिली होती. विशेष म्हणजे बारामती नगरपरिषदेला २४१ कोटींचा निधी विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला होता.

सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा असल्याने त्यांनी मार्च ते जून २०२२ या कालावधी दरम्यान मंजूर केलेल्या ९४१ कोटींच्या कामांना स्थगिती दिली आहे, यामध्ये सर्वाधिक निधी बारामती नगरपरिषदेला देण्यात आला होता. नुकतीच या सर्व विकासकामांवर स्थागिती आणल्याने हा अजित पवार यांच्याकरिता मोठा दणका मानण्यात येत आहे. इथे विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुचवलेल्या विकासकामांना शिंदे यांनी स्थगिती दिली आहे, परंतु शिवसेनेच्या आमदारांनी सुचवलेल्या कामावर स्थगिती न आणल्याने त्यांना एकप्रकारे अभयच मिळाले आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न झाल्याने तूर्तास शिंदे सर्व विभागांच्या कामावर जातीने लक्ष ठेवत आहे, त्याअंतर्गत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते. महविकास आघाडीच्या काळात शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार सातत्याने होत होती, त्यामुळे येत्या काळात या सर्व बाबी एकनाथ शिंदे कशा प्रकारे हाताळतात, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

 

केंद्र सरकारची देशात कोरोना लसीकरणाची विक्रमी भरारी ! २०० कोटी डोसचा टप्पा पार..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भारताच्या कोरोनाविरोधी लसयुद्धात महत्वाचा आणि मोठा विक्रम करत भरारी घेतली आहे. खरंतर हा महाविक्रम आहे. आज भारताने २०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा सर केला. आज सकाळच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.९८ कोटी (१,९९,९८,८९,०९७) मात्रांचा टप्पा पार केला. २,६३,२२,३४५ सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. याचा अर्थ आतापर्यंत देशात २०० कोटी डोसचा आकडा गाठला गेला आहे.

देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम १६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ३.७९ कोटीहून जास्त (३,७९,८२,२५१) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे १० एप्रिल २०२२ पासून १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,10,322
2nd Dose 1,00,79,660
Precaution Dose 60,21,211
FLWs 1st Dose 1,84,27,518
2nd Dose 1,76,52,093
Precaution Dose 1,14,59,871
Age Group 12-14 years
1st Dose 3,79,82,251
2nd Dose 2,62,02,322
Age Group 15-18 years
1st Dose 6,08,43,400
2nd Dose 5,01,13,916
Age Group 18-44 years
1st Dose 55,88,87,272
2nd Dose 50,58,64,044
Precaution Dose 62,19,363
Age Group 45-59 years
1st Dose 20,35,68,118
2nd Dose 19,45,59,339
Precaution Dose 45,13,607
Over 60 years
1st Dose 12,73,60,055
2nd Dose 12,15,70,899
Precaution Dose 2,81,53,836
Precaution Dose 5,63,67,888
Total 1,99,98,89,097

  • भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या १,४३,४४९ इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ०.३३% इतकी आहे
    .
  • परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४% झाला आहे. गेल्या २४ तासात १७,७९० कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून ४,३०,८१,४४१ झाली आहे.
  • गेल्या २४ तासात २०,५२८ नवे रुग्ण आढळले.
  • गेल्या २४ तासात एकूण ३.९२,५६९ चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ८६.९४ कोटींहून अधिक (८६,९४,२५,६३२) चाचण्या केल्या आहेत.
  • साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.५५% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ५.२३% आहे.

 

अनिश्चित काळासाठी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले..


सपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची, दरम्यान राज्य विधिमंडळाचे या अगोदर दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. यावेळी १८ जुलैपासून राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. परंतू आता १८ जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा विधिमंडळ प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक तसेच अद्यापही न झालेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार इत्यादी कारणांमुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे समजते, त्यामुळे सध्यातरी अधिवेशनाची पुढील नेमकी तारीख स्प्ष्ट नाही आहे. नव्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर लवकरच पावसाळी अधिवेशनाची तारीख घोषित होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलावले जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

४थी आशियाई व पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेसाठी निवड समिती जाहीर..


(चेअरमन ) डॉ.चंद्रजीत जाधव

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

 

भारतीय खो-खो महासंघाने आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. ४थ्या आशियायी खो-खो स्पर्धेला १२ ऑक्टोबर २०२२ पासून तर पहिल्या जागतिक खो-खो स्पर्धेला १६ ऑक्टोबर २०२२ पासून दिल्ली येथे सुरुवात होण्याचा अंदाज खो-खो महासंघाकडून व्यक्त केला जात आहे. या स्पर्धेसाठी जो भारतीय संघ निवडला जाणार आहे त्यासाठी निवडसमितीची घोषणा करण्यात आली असून भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव  यांची निवड समितीच्या चेअरमन पदि नियुक्ती झाली आहे.


(सचिव ) ऍड. गोविंद शर्मा                             (कार्याध्यक्ष ) सचिन गोडबोले

या आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाच्या निवड समितीवर महाराष्ट्रातून चेअरमनपदि डॉ.चंद्रजीत जाधव यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव ऍड.गोविंद शर्मा व कार्याध्यक्ष सचिन गोडबोले यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. या तिघांसह उपकार सिंग (पंजाब), एस. एस. मालिक (दिल्ली), डॉ. मुन्नी जून (दिल्ली), व सुषमा सारोलकर (मध्य भारत) यांचीसुध्दा सदस्य म्हणून निवड झाली आहे.

पुणे येथील ‘श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल’ बालेवाडी येथे ६ ते १९ जुलै या कलावधीत प्रक्षिक्षण प्रक्षिण शिबीर आयोजित केले आहे. त्यात सपूर्ण देशातून १२० मुले या प्रक्षिण शिबिरासाठी निवडण्यात आली असून त्यांना प्रक्षिक्षण देण्यासाठी देशभरातून १२ प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

याच १२० खेळाडूंमधून आशियायी व जागतिक खो-खो स्पर्धेसाठीचा भारतीय संघ टप्याटप्याने निवडला जाणार असल्याचे भारतीय खो-खो महासंघाचे सचिव महेंद्रसिंग त्यागी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. संजीवराजे नाईक–निंबाळकर, खजिनदार ऍड. अरुण देशमुख, याचबरोबर खो-खो तील तमाम कार्यकर्त्यांते यांनी निवड समिती वर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.