Home Blog Page 168

दोन वर्षापासून नार्कोटिक्सच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस हुडकून काढून बाजारपेठ पोलीसांनी केले गजाआड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की नार्कोटिक्स च्या गुन्ह्यात बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये दोन वर्षापासून गुन्हा रजिस्टर नंबर ३००/२०२० एनडीपीएस कायदा १९८५ कलम ८ (क) १७ व २९ (नार्कोटिक्स) या गुन्ह्यामध्ये मागील दोन वर्षांपासून फरार असलेला तसेच जन्मापासून एका डोळ्याने अधू असलेला आरोपी नामे जेठालाल हिमताराम चौधरी हा स्वतःस कुणी ओळखू नये म्हणून सतत डोळ्यावर काळा गॉगल लाऊन वावरायचा.

सदर आरोपी नामे जेठाराम हा कल्याण येथील एपीएमसी मार्केट येथे येणार असल्याची बातमी पोलीस नाईक सचिन साळवी यांना मिळताच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र पाटील यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचला व डिटेक्शन ब्रांच चे सपोनि घोलप, व डिटेक्शन टीमचे पोह पावशे, पोह जातक, पोना सचिन साळवी, पोना बाविस्कर, पोना सांगळे, यांनी फरार आरोपी जेठाराम हिमताराम चौधरी (वय: २७ वर्षे) राहणार गुरुदेव ट्रेडर्स, हीम गंगा अपार्टमेंट, नांदिवली कल्याण (पूर्व) याला शिताफीने ताब्यात घेतले व बेड्या ठोकून गजाआड केले. पुढील तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन चे सपोनि घोलप करीत आहेत.

सावंतभोसले कुळाच्या श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ सोहळा दिमाखात साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १०.०५.२०२२ रोजी सावंतवाडी येथील कुणकेरी गावात सावंतभोसले कुळाच्या श्री कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ सोहळा यंदा गेल्या दोन वर्षांनी कोविड परिस्थिती नंतर आटोक्यात आलेल्या प्रतिबंधात्मक निर्बंध शिथिल करण्यात आल्याने मोठ्या दिमाखात हा सोहळा भव्य दिव्य पणे साजरा करण्यात आला.

गेल्या अनेक दशकांपासून साजरा होणाऱ्या या कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातून सावंतभोसले कुळाच्या भाविकांनी सहकुटुंब सहपरिवरासह हजारोंच्या संख्येने उपस्थित होत हजेरी लावली.

सावंतभोसले श्री कुलस्वामिनी प्रतिष्ठन संस्थेचे अध्यक्ष श्री.विजय सावंतभोसले, सरचिटणीस श्री. कृष्णा सावंतभोसले व सल्लागार व कुलस्वामीनी देवघर प्रमुख श्री. शशिकांत सावंतभोसले या सावंतभोसले श्रीकुलस्वामीनी प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत व परिश्रम घेत हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडला.

त्रैवार्षिक भवानी व्यानमाता देवीच्या गोंधळानिमित्त येऊन रणरणत्या उन्हात ओटी भरण्यासाठी तासोनतास रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना संस्थेच्या वतीने थंडगार पाणी व सरबताची उत्तम सोय करण्यात आली होती. प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व स्वयंसेवक रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांना थंडगार पाणी व सारबताचे वाटप करत होते. त्याशिवाय दर्शनासाठी आलेल्या कुळातील समस्त भाविकांना प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ हजारोंच्या संख्येने आलेल्या समस्त भक्तांना लाभला. त्यात कुलस्वामीनी भवानी व्यानमाता ची ओटी भरून जमलेल्या साड्या किरकोळ किंमत आकारून देवीचा प्रसाद म्हणून भाविकांना वाटण्यात आल्या.

रात्रभर सुरू असलेला कुलस्वामिनी व्यानमाता भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सव कार्यक्रमाची सांगता पहाटे करण्यात आली.

 

परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांचा सोन्याची नाणी देऊन सत्कार!

मिरा भाईंदर: आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून मिरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालया तर्फे परिचारिकांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ३५ ते ४० परिचारिका सहभागी झाल्या होत्या.

रूग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिकांची भूमिका महत्त्वाची असते. त्या रूग्णाच्या गरजा ओळखून त्यांच्या आरोग्याची पुरेपुर काळजी घेतात. वेळप्रसंगी रूग्णांना मानसिक आधार देण्याचं काम देखील या परिचारिका करताना दिसतात.

अशा या परिचारिकांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वॉक्हार्ट रूग्णालयाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक वर्ष रूग्णालयात अविरतपणे काम करत आपले कर्तव्य बजावणाऱ्या परिचारिकांना सोन्याची नाणी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्यास विष्णुनगर पोलीसांनी केली अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नफा मिळवून देण्याचे बहाण्याने आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा आणि इंस्टाग्रामवर महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकणाऱ्या अनिल पेदुरी आणि कुंजन शहा यांना विष्णुनगर पोलीसांनी अटक केली आहे.

मोबाईल नंबर वरून दोन वेग-वेगळ्या फिर्यादी अभिषेक कामत यांच्याशी संपर्क साधून त्यांना पैशाची गुंतवणूक करण्यास सांगून नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून रोबो टेंडरला रक्कम जमा करा असे सांगून फिर्यादीची ४,५०,००० रुपये फसवणूक केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीसांनी तपास करून मिळवलेल्या माहितीच्या आधारे सुरत या ठिकाणाहून अनिल पेदूरी यास अटक केली गेली आहे.

तसेच कुंदन शहा याने फिर्यादी महिलेचे इंस्टाग्राम वर खोटे अकाऊंट तयार करून त्याद्वारे फिर्यादी महिलेच्या सासरच्या लोकांच्या मोबाईल नंबर वर आणि सदर इंस्टाग्राम वर फिर्यादी महिलेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून फिर्यादीची बदनामी केली असल्याबाबत विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीसांनी तपास करून वडोदरा गुजरात या ठिकाणी सापळा रचून कुंदन शहा यास अटक केली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ परिमंडळ-३ कल्याण, सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी मोरे डोंबिवली विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुलदिप मोरे, पोना पवार, पोशि के.ए.भामरे यांनी केली आहे.

समाजसेवक व धडाडीचे कार्यकर्ते अमित बनसोडे यांची डोंबिवली शिवसेनेच्या उपशहर प्रमुखपदी नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जवळच दृष्टीपथात येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्व पक्षांनी आपापल्या पक्षाची मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. त्यातच पक्षाच्या मोठ्या पदावर चांगल्या कार्यकर्त्यांची वर्णी लागत आहे. तसे असतानाच सामाजिक कार्यकर्ता व ‘पोलीस वृत्तांत’ मासिकाचे संपादक श्री. अमित बनसोडे यांची नियुक्ती डोंबिवलीतील शिवसेना उपशहर प्रमुख पदी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांनी डोंबिवली शहरप्रमुख श्री.राजेश मोरे, ‘पोलीस वृत्तांत’ मासिकाचे सल्लागार श्री. विजय अंबावकर यांच्या आणि श्री.अमित बनसोडे यांना त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले व त्यांच्या पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.