Home Blog Page 167

नांदीवली येथे शिवसेना उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज सायंकाळी नांदीवलीतील ०१, राजेश्वरी कृपा, डोंबिवली (पूर्व) ४२१२०१ येथे शिवसेना उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उदघाटन झाले. श्री.अमित बनसोडे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख श्री. सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख श्री.राजेश कदम, शहरप्रमुख श्री.राजेश मोरे, युवासेना-उपजिल्हाधिकारी श्री.दीपेश पुंडलिक म्हात्रे, डोंबिवली विधानसभा संघटक तात्यासाहेब माने, ग्रामीण विधानसभा संघटक श्री.एकनाथ पाटील, कल्याण ग्रामीण महिला शहर संघटक सौ.कविता गावंड, कल्याण तालुका संघटक श्री.अर्जुन पाटील, अध्यक्ष डोंबिवली शहर शिवसेना बंजारा समाज कु.ज्ञानेश्वर राठोड
“पोलीस वृत्तांत” मासिकाचे कार्यकारी संपादक श्री.विजय अंबावकर यांची उपस्थिती लाभली.

उपजिल्हाप्रमुख श्री. सदानंद थरवळ व जिल्हाप्रमुख श्री.गोपाळ लांडगे यांनी शिवसेना संघटना वाढवण्यासाठी व येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवक निवडून येण्यासाठी उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेवक रवी पाटील आणि माझी नगरसेवक नितीन पाटील यांनी उपशहर प्रमुख श्री.अमित बनसोडे यांनी यांच्या कार्यालयात येऊन श्री.अमित बनसोडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील यशस्वी कारकीर्दीकरिता शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अखेर जिल्हाध्यक्ष बदलला! अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती!

मिरा भाईंदर: मिरा भाईंदर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा संघटनात्मक फेरबदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांची तडकाफडकी हकालपट्टी करून अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अरुण कदम यांना आज जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देऊन पक्षाची जबाबदारी सोपवली.

चार वेळा नगरसेवक ते उप नगराध्यक्ष पदावर राहिलेले अरुण कदम यांच्याकडे प्रदीर्घ असा राजकीय अनुभव असून काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशा अनेक पक्षांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर राहून पक्ष संघटनेचे कार्य केले असून मिरा भाईंदर शहरामध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.

अरुण कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत शहराध्यक्ष असताना अत्यंत कमी कालावधीत महानगर पालिका निवडणुकीना सामोरे जाताना त्यांनी एक हाती लढाई लढून पहिल्याच निवडणुकीत पक्षाचे चार नगरसेवक निवडून आणले होते. त्यानंतर मीरा-भाईंदर वसई-विरार पालघर जिल्हा संघटक सारख्या महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असताना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. परंतु मनसेमध्ये पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे कंटाळून त्यांनी अखेर मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत विधानसभा प्रमुख पदावर असताना देखील 2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आणि एव्हढेच काय तर त्यांनी आपल्या पत्नी अर्चना कदम सोबतच चार नगरसेवकांचा संपूर्ण प्रभाग निवडून आणला होता. त्यांच्या पत्नी अर्चना कदम आजही शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

विधानसभा प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेत देखील पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली आणि काही काळ राजकारणा पासुन अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. परंतु काही काळानंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि आपल्या समर्थकांच्या आग्रहा खातर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला होता.

अरुण कदम यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असताना तेव्हाच त्यांच्यावर पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार अशी शक्यता वर्तविली जात होती परंतु त्याच वेळी भाजप सोडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील आणि काँग्रेस पक्ष सोडून आलेले अंकुश मालुसरे या तिघांत जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनपेक्षित निर्णय घेत अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती न करता अचानकपणे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पेंडुरकर यांना हटवून अंकुश मालुसरे यांची नियुक्ती करण्यात आली.

अंकुश मालुसरे यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेतल्या नंतर पक्ष संघटना तर वाढली नाहीच उलट त्यामुळे पक्षाच्या दोन वर्षाचा महत्त्वाचा काळ वाया गेला त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा आपला जिल्हाध्यक्ष बदलण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. अखेर मिरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची निराशाजनक कामगिरी पाहता मीरा भाईंदर शहर जिल्ह्याचे समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन अंकुश मालुसरे यांना पदावरून हटवून त्यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्त केली त्या ठिकाणी अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष पदावर अरुण कदम यांची नियुक्ती केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन बळकटी येईल त्याच बरोबर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करुन दाखवेल असा निर्धार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आता व्यक्त केला जात आहे.

अरुण कदम यांची समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन चालण्याची कार्यपद्धती, शहरातील त्यांचा चाहता वर्ग पाहता मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या काळात पक्ष संघटना बळकट करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान अरुण कदम यांच्यासमोर आहे. अरुण कदम या आव्हानाला कशा रीतीने जात सामोरे जातील हे पाहणे महत्त्वाचे महत्त्वाचे ठरणार आहे. तूर्तास अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केल्यामुळे मिरा भाईंदर शहरातील राजकारणामध्ये एक मोठा फेरबदल घडला असल्याची चर्चा केली जात असून शहरातील सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांत बदलले पाच जिल्हाध्यक्ष!

माजी नगरसेवक आणि तत्कालीन जिल्हाध्यक्ष मोहन पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्या नंतर मिरा भाईंदर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक दिवस नेतृत्वहीनच राहिला होता. त्यानंतर इच्छा नसताना काँग्रेसचे माजी नगरसेवक जयवंत पाटील यांना जिल्हाध्यक्ष नेमले गेले परंतु राजकारणात राहण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर गणेश नाईक, संजीव नाईक यांचे समर्थक मानले जाणारे प्रकाश दुबोले यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. काही काळानंतर प्रकाश दुबोले हे देखील राष्ट्रवादी सोडून आपले व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी भाजपमध्ये गेले. त्यांनी पक्ष सोडल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा काही काळासाठी नेतृत्वहीन झाला.

2017 च्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्यामुळे त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. अशा कठीण अवस्थेत पक्षाचे पद घ्यायला कुणीच पुढे येत नसताना संतोष पेंडुरकर यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. संतोष पेंडुरकर जिल्हाध्यक्ष पदावर असताना पक्षांतर्गत वाद विकोपाला गेला होता. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अरुण कदम यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली जाणार अशी जोरदार चर्चा केली जात असताना पक्षाने अनपेक्षितपणे अंकुश मालुसरे यांची जिल्हाध्यक्ष नियुक्ती केल्यामुळे पक्षात आणखीन एक नवीन वाद निर्माण झाला होता. आणि जेमतेम दोन वर्षे कार्य केल्यानंतर आता अंकुश मालुसरे यांची देखील नियुक्ती रद्द करून आता अरुण कदम यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.

अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेली पाच वर्षांत पाच जिल्हाध्यक्ष बदलण्याची करामत केली आहे. आता अरुण कदम यांच्या नेतृत्वखाली पक्षाला स्थैर्य मिळेल आणि येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली यांना मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्कार!

मुंबई: कोकण वृत्तसेवेचे पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना राज्याचे मंत्री व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जागृत महाराष्ट्र या मराठी वृत्तवहिनीच्या तिसऱ्या वर्धापन दिना निमित्त दिनांक 15 मे रोजी मालाड पश्चिमेतील ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट या ठिकाणी हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उत्कृष्ट शोध पत्रकारितासाठी ज्येष्ठ पत्रकार निसार अली सफदर अली सय्यद यांना मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. या प्रसंगी पालिका पी-उत्तर विभागाच्या माजी प्रभाग अध्यक्षा नगरसेविका संगीता सुतार यांच्या व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.

पत्रकार निसार अली सय्यद यांना यापूर्वी देखील पत्रकारितेसाठी अनेक संस्था संघटनांच्या वतीने सन्मानित करण्यात आलं आहे. सामाजिक क्षेत्रात ही राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना ही सन्मानित करण्यात आले. निसार अली यांनी जागृत महाराष्ट्र वृत्त वाहिनेचे संचालक अमोल भालेराव व त्यांच्या टीमचे आभार मानले आहे.

क्राईम ब्रँच युनिट-३ च्या पोलिसांनी ६ महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.२१.११.२०२१ रोजी तक्रारदार नामे सुरेंद्र देवेंद्र नायक (वय: ४२ वर्षे) हे त्याच्या ‘सुजाता पान शॉप’ मध्ये बसले असताना इनोवा गाडीमधून आलेल्या दोन इसमांनी पत्रकार असल्याचे सांगून “तू गुटखा विक्री करतोस म्हणून पोलीसांना सांगून तुझ्यावर कारवाई करतो” असा दमदाटी करून जबरीने दुकानाच्या गल्ल्यातील रूपये १५,०००/- रोख रक्कम घेत दरोडा टाकून जबरीने चोरून नेली. त्याबाबत टिळकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्र. १८५/२१ भादवि. कलम ३९२,५०६,४५२ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील पाहिजे असलेला फरार आरोपी सुधाकर पांडुरंग उत्तेकर (वय: ४२ वर्षे) हा मागील ६ महिन्यापासून फरार असून मिळुन येत नव्हता.

आज दिनांक १६.०५.२०२२ रोजी पोना १११८ सचिन वानखेडे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाल्यावरून क्राईम ब्रँच युनिट-३ घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी तोतया पत्रकार व गुन्हातील पाहिजे असलेला आरोपी सुधाकर पांडुरंग उत्तेकर (वय: ४२ वर्षे) रा. २०१, समर्थ कृपा, रवी पाटील मैदानाजवळ, डोंबिवली (पूर्व) यास ताब्यात घेतले. सदर आरोपी मिळून आल्याने त्याची वैदकीय तपासणी करून टिळकनगर पो. ठाणे येथे बंदिस्त केले आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.जयराम मोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. रावराणे, पीएसआय. मोहन कळमकर, पीएसआय. कवडे, पोना. सचिन वानखेडे, पोना. साबळे पोह. शिंदे, पोशि. शेकडे, पोना. कडु यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रसिद्धी माध्यमांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हे खरोखर पत्रकार आहेत का ? व त्याने तोतया पत्रकार बनून याआधी असे किती दरोडे टाकुन गुन्हे केले आहेत याची पुढील तपास व कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे सपोनि. रवींद्र कौराती करत आहेत.

 

डोंबिवली पश्चिमेतील शहर वाहतूक शाखेची बावन चाळ या ठिकाणी बंद असलेली चौकी पुनश्च सुरू करण्यासाठी माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्याकडून वरिष्ठांना निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पश्चिम येथील गणेश नगरातील बावन चाळ या ठिकाणी असलेली डोंबिवली शहर वाहतूक शाखेची चौकी बंद पडलेले असून माहिती अधिकार महासंघ (ठाणे) यांच्यातर्फे डोंबिवली शहर वाहतूक शाखा वरिष्ठांना चालू करण्याचे विनंतीपूर्वक निवेदन आदरणीय पोलीस विभागाचे वरिष्ठांना सादर संस्थेद्वारे देण्यात आले.

कल्याण डोंबिवली या ठिकाणी वाहनांची संख्या खूप वाढल्याने कोपर ब्रिज पूर्व-पश्चिम या ठिकाणी कधीकधी वाहतूक कोंडी होत राहते. त्यासाठी त्या वेळेला त्या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नसतात व बीट मार्शल त्या ठिकाणी वेळेवर पोहोचू शकत नाही. जर बावन चाळ या ठिकाणी असलेली डोंबिवली शहर वाहतूक शाखेची चौकी कर्मचारी देऊन चालू केल्यास वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होण्याची तसेच नागरिकांना आणि प्रवाशांना कमी प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे त्यासाठी वरिष्ठांना विनंती करत लवकरात लवकर सदर चौकी चालू करण्यात यावी याकरिता माहिती अधिकार महासंघ (ठाणे) डोंबिवली या संस्थेच्या वतीने डोंबिवली शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठांना विनंती करत निवेदन देण्यात आले.