Home Blog Page 174

मुंबई व दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने डब्ल्यूएचओ ने दिला सतर्कतेचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. व्हायरस अजूनही संपलेला नाही असं देखील डब्ल्यूएचओ (WHO) ने म्हटलं आहे. भारतात बुधवारी कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढवली आहे. मृत्यूदर जरी नियंत्रणात असले तरी देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डब्ल्यूएचओ ने म्हटलं की, कोरोना व्हायरसमुळे अजूनही जीविताचा धोका कायम आहे.

अमेरिकेत झपाट्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ

ओमायक्रॉन व्हायरसचा बीए.२ व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या न्यूझीलंडमध्ये बुधवारी कोरोनाचे ९,४९५ नवे रुग्ण वाढले. ज्यापैकी १,८२८ रुग्ण हे ऑकलँडमध्ये आढळले आहेत. चीनमध्ये २९,३१७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमध्ये २५,००० हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. या भागात लॉकडाऊन लागू आहे.

दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याने चिंता नसली तरी देखील सतर्क राहण्य़ाची गरज आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे ७३ नवीन रुग्ण वाढले आहेत. १७ मार्चनंतर ही सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामध्ये ६८ जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. राजधानी दिल्लीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ५० टक्के वाढ पाहायला मिळाली. पण मृतांमध्ये वाढ झालेली नाही. दिल्लीत मंगळवारी २०२ रुग्ण वाढले होते. तर बुधवारी २९९ रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत ५०४ रुग्ण होम क्वारंटाईन आहेत.

 

रोज होणार वीजपुरवठा खंडित; राज्यात भारनियमन अघोषित..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील नागपूर येथे अनेक भागांत दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू झाले आह़े. मागणीच्या तुलनेत तब्बल अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना वीज भारनियमनाच्या झळाही बसू लागल्या आहेत़.

मराठवाडा व प. महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत

मराठवाडय़ातील वीज मंडळाच्या औरंगाबाद, नांदेड व लातूर तीन परिक्षेत्रातील ५६६ फिडरवर सध्या सरासरी तीन तास भारनियमन होत आह़े नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक ३७१ फीडरवर सरासरी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होतो. औरंगाबाद शहरातील १६० फीडरवर सरासरी दोन तास वीजकपात केली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्यांत दोन-चार तासांपासून ते दहा-बारा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही गावात तर ७२ तासांत अवघा दीड तास वीज उपलब्ध होती.

वीजगळती अधिक असलेल्या भागांत भारनियमन

वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आह़े त्याचा उत्तर महाराष्ट्रात मालेगावातील तीन लाख यंत्रमागांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील २४ हजार २०० पैकी १३०० फीडरवर (संचयक) सध्या अडीच ते तीन तासांचे भारनियमन सुरू आह़े त्यात महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारितील नागपुरातील २२१, कोकण विभागातील ४९०, पुणे विभागातील २३५ फिडरचा समावेश आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े शिवाय, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़े तसेच पुढे रमजान ईदही आहे. या सर्वाना भारनियमनाचा फटका बसण्याचे संकेत आहेत़. वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी सुद्धा येत आहेत.

 

शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल; रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाकडून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत. शासकीय शिधावाटप दुकानातून रेशन घेणार्‍या पात्र लोकांसाठी निश्चित केलेल्या मानांकनांमध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन मानांकनाचा मसुदा आता जवळपास तयार झाला आहे.

आर्थिकदृष्ट्या समृद्ध लाभ घेत आहेत

वितरणात अनियमितता येऊ नये म्हणून नवीन मानांकन पूर्णपणे पारदर्शक केले जाणार आहेत. सध्या देशभरात ८० कोटी लोकं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा लाभ घेत आहेत. त्यांच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेले अनेक लोक आहेत. हे लक्षात घेऊन सार्वजनिक वितरण मंत्रालय मानांकनांमध्ये बदल करणार आहे.

वन नेशन, वन रेशन कार्ड योजना

आतापर्यंत ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजना लागू करण्यात आली आहे. एनएफएसए (NFSA) अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांपैकी ८६ टक्के लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्याला सुमारे १.५ कोटी लोकं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन लाभ घेत आहेत. नवीन मानांकने तयार केल्यानंतर वितरण व्यवस्था पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे.

केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल

गरजूंना डोळ्यासमोर ठेवून काही बदल करण्यात येत आहेत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मानांकनांमध्ये बदल करण्याबाबत राज्यांसोबत बैठक घेतली जात आहे. राज्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश करून पात्रांसाठी नवीन मानांकने तयार केली जात आहेत. ही मानांकने लवकरच निश्चित केली जातील. नवीन मानांकने लागू झाल्यानंतर केवळ पात्र व्यक्तींनाच लाभ मिळेल. अपात्र व्यक्तींना लाभ मिळू शकणार नाही असे प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले.

मनसे ने हनुमान जयंती निमित्त शिवसेना भवनात हनुमान चालीसा आणि आरती करण्याची परवानगी मागून शिवसेनेला टाकले कोंडीत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसेने पत्र लिहिलं आहे. मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेली हनुमान चालिसा रथ यात्रा रद्द करण्यात आली. या यात्रेवर कायदा आणि सुव्यवस्था यावरून कारवाईचा बडगा उचलल्याने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तसंच माहिम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी, या पत्रातून करण्यात आली आहे.

यशवंत किल्लेदार यांनी १६ एप्रिलला हनुमान जयंती निमित्त शिवसेना भवनात हनुमान चालिसा आणि आरती करण्यासाठी परवानगी द्या अशी पत्रातून मागणी केली आहे. सर्व ठिकाणी कारवाई करत आहात म्हणून शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे त्यामुळे परवानगी द्या, असं किल्लेदार यांनी पत्रात म्हटलं आहे.

शिवसेनेतील नेते मंडळी समाज माध्यमाच्या माध्यमातून सेना भवन मध्ये असलेल्या भवानी मातेच्या मंदिरासमोर आरती करण्याचा सल्ला देतात. केवळ म्हणूनच मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करतो की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांमुळे शिवसेना भवन हे तुमच्यासह सर्व हिंदूचे श्रद्धास्थान (मंदिर) आहे. त्यामुळे शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी हनुमान जयंती दिनी सेना भवन मधील भवानी मातेच्या मंदिरात आम्हा मनसैनिकांना हनुमान चालीसेसह आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्राद्वारे केली आहे.

 

रेकॉर्डवरील आरोपीला पकडुन बाजारपेठ पोलीस स्टेशन च्या पोलीसांनी केली उत्कृष्ट कामगिरी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सविस्तर वृत्त असे की कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा रेकॉर्डवरील गुंड आरोपी फारीस इस्तीयक खोत राहणार: बाबू शेठ चाळ, चौधरी मोहल्ला, दुधनाका (कल्याण) हा   कोणता तरी अपराध करण्याच्या उद्देशाने राम मारुती चौक ह्या ठिकाणी एक लोखंडी सुरा घेऊन फिरत आहे अशी पोलीस नाईक बागुल यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वपोनि.नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनखाली बाजारपेठ डिटेक्शन ब्रांच चे सपोनि.अरुण घोलप व त्यांच्या डिटेक्शन टीमने आरोपी फारीस इस्तीयक खोत याला धारदार लोखंडी सुऱ्यासह शिताफीने पकडुन त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)१३५ प्रमाणे कारवाई केलेली आहे.

सदरची कामगिरी वपोनि. नरेंद्र पाटील, पोनी राजेंद्र अहिरे/(गुन्हे), सपोनि अरुण घोलप, पोहवा. पावशे, पोहवा. जातक, पोना. सचिन साळवी, पोना. प्रेम बागुल, पोना. परमेश्वर बाविस्कर, पोना. राज सांगळे यांनी केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन साळवी हे करीत आहे.