Home Blog Page 183

गल्लीत चोरी दिल्लीत बेडया! नवघर पोलिसांची दबंग स्टाईल कार्यवाही!

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: विष्णू गायकवाड

भाईंदर : मुंबईसाठी सोनसाखळी चोरी काही नवीन बाब नाही पण काही वर्षांपासून मुंबई पोलिसांनी या भुरट्या चोरांना चांगलाच आळा घातला आहे तरीही अधून-मधून हे चोर आपलं डोक वर काढतच असतात तर पोलीस सुद्धा ते ठेचण्यासाठी आपला दंडुका घेऊन सज्जच असतात.

भाईंदर पूर्व मधून चैनसाखळी चोरी करून दिल्ली गाठणाऱ्या चोरांना नवघर पोलिसांनी थेट दिल्लीत बेडया ठोकून हे पुन्हा सिद्ध केल आहे.

वारंवार पोलिसांकडून जनजागृती करूनही जनता आपल्या मैlल्यवान वस्तू सांभाळण्यास कधी -कधी असमर्थ्य ठरते, चोर जनतेच्या बेसावध पणाचा फायदा घेत संधी साधतात व जनतेची तारांबळ उडते.

असाच एक प्रकार भाईंदर( पूर्व ) येथे घडला, सौ. राजेश्वरी विनोद सिंग वय वर्ष 40 या 8 फेब्रुवारी रोजी रोजच्या प्रमाणे आपल्या मुलाला बसने शाळेत पाठवण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या एव्हढ्यात दोन अनोळखी दुचाकी स्वारानी त्यांच्या गळ्याला हिसका मारत त्यांची दिड तोळ्याची सुमारे 52000 रु किमतीची सोनसाखळी घेऊन पसार झाले होते.

प्रसंगी त्यांनी सतर्कता दाखवत नवघर पोलीस स्टेशन गाठलं, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई यांच्या आदेशानुसार ठाण्यात भा. द. वि. स. कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलिसांनी आपल्या तपास कार्याला गती दिली व दिवस रात्र एक करून शेवटी पोलिसांना यश मिळाल, गुन्हेगारांची तपासाजोगी माहिती तपासकर्त्यानां मिळाली मालवणी मुंबई येथे राहणारे ते गुन्हेगार तांत्रिक बाबींवरून तपासणी केली असता आरोपी थेट दिल्लीला दिसत होते.

नवघर पोलिसांनीही आपली स्वारी थेट दिल्लीकडे वळवली व आरोपीना ताब्यात घेतले आणि गल्लीत चोरी करणाऱ्या चोरांच्या थेट दिल्लीत मुसक्या आवळल्या.

आरोपी 1) रिजवान हैदर अली हुसेन हैदर वय वर्ष 25 रा मालवणी मुंबई, मूळ उत्तर प्रदेश, 2)शहजाद उर्फ विकी इमाम मोहम्मद आरिफ वय वर्ष 36 मूळ रा. अमरोहा उत्तर प्रदेश यांच्या कडून सुमारे 52000रू. किंमत असलेली सोनसाखळी व गुन्ह्यात वापरली गेलेली बजाज पल्सर ही दुचाकी असा अंदाजे 82000 किंमतीचा येवज जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अमित काळे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- 01, डॉ. शशिकांत भोसले, सह. पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, यांच्या मार्गदर्शना खाली मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पो नि- प्रकाश मसाळ (गुन्हे) स पो नि- योगेश काळे, पो उ नि- संतोष धाडवे, पो उ नि- प्रमोद पाटील, पो ना-भुषण पाटील, पो शि- गणेश जावळे, संदिप जाधव, सुरज घुनावत, विनोद जाधव यांनी ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेला मानपाडा रोडवरील ‘कस्तुरी प्लाझा’ शेजारील ‘रिलॅक्स बार’ व त्यांच्या आजूबाजूची दुकाने अनधिकृत असून ती जागा चेतन हौसिंग सोसायटीची असून काँग्रेसच्या माजी नगरसेवक यांनी अनधिकृत पणे ‘रिलॅक्स बार’ व परिसरातील दुकाने बांधली याविषयी चेतन हौसिंग सोसायटीने उच्चन्यायालयात दावा दाखल करुन न्यायालयाने चेतन हौसिंग सोसायटीचा दावा मान्य करून कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा व त्याची चित्रफित बनवून त्याचे तीन महिन्यांत न्यायालयात सादरीकरण करण्यात यावे असा आदेश देऊनही सदर गोष्टीला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असून अजूनपर्यंत कडोंमपाच्या ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी काही ही कारवाई केली नाही फक्त याविषयी फायली डोंबिवली-कल्याण महानगरपालिकेच्या कार्यालयात फिरत आहेत.

यावरून असे वाटते कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामे पाठीशी घालून उच्च न्यायालयाच्या आदेशला केराची टोपली दाखविली आहे. कोर्टाचा आदेश सप्टेंबर २०२१ चा होता व कारवाईची मुदत १७ जानेवारी २०२२ ला संपली असून अजून फक्त फाईलस् डोंबिवली-कल्याण-डोंबिवली कार्यालयात फिरत आहेत. वरील सर्व घटना पहाता कडोंमपाचे अधिकारी व ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. यामागे नक्की गौडबंगाल काय असू शकते याची उलटसुलट चर्चा सर्वत्र सुरू आहे.

 

आयकर विभागाची शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी धाड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नवाब मलिक यांच्या वर ईडी च्या अटकेनंतर नंतर दोनच दिवसात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाचे पथक दाखल झालं आहे. कारवाईचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्यामुळे राष्ट्रवादी नंतर आता शिवसेना केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवरआहेत का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

इनोव्हा गाड्यांमधून पथक यशवंत जाधव यांच्या घरी दाखल झाले. CISF टीम देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव हे शिवसेना उपनेते आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी यामिनी यशवंत जाधव या भायखळा मतदार संघाच्या आमदार आहेत. त्यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाने आज सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. त्यांच्या घरासमोर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची ‘मनी लॉन्ड्रिंग’ केल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले होते.

 

एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी – आमदार रविंद्र चव्हाण यांचा आरोप..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून डोंबिवलीतील काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा स्पष्ट आदेश देणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला. एकनाथ शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खबळजनक आरोप त्यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केला. याबाबत शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच माध्यम प्रतिनिधींसमोर पुरावे म्हणून आमदार यांनी सादर केल्या.

भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून एमएमआरडीएच्या माध्यमातून काम करावे अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर मी डोंबिवलीचा आमदार या नात्याने सर्वप्रथम मांडली. माझ्या मागणीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. केडीएमसी पेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्या प्रकारे रस्ते बांधणी करेल असेही ठरले. या कामासाठी ४७०.८२ कोटी रुपये मंजूर झाले त्यातून डोंबिवलीतील ३५ रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले.

रस्त्यांचा हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे ९ कोटी रुपये खर्च केला असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. पुढे ते म्हणाले की मी गेले दोन अडीच वर्षे याबाबत पाठपुरावा करत होतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची “सहन होत नाही व सांगताही येत नाही ” अशी देहबोली स्पष्ट दिसत होती. अधिकारी वर्ग याबाबत प्रचंड दबावाखाली होते. प्राधिकरणाच्या तर्फे ३० रस्ते कामे रद्द करण्यात आल्याचे खासगीत सांगत होते. जेव्हा कागदपत्रे प्राप्त झाली तेव्हा लक्षात आले की ही डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना गेली २५ वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत महापालिकेच्या ५ सार्वत्रिक निवडणूका झाल्या. या निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजपा एकत्र व विरोधात अशी राजकीय लढाई लढलो. पण भाजपाने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिकाच निभावली. उलट शिवसेनेनं स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला शिवसेनेने कायम खोडा घातला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्ष लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण डोंबिवलीत विकास कामामध्ये झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते असा आरोपही आमदार चव्हाण यांनी केला.

भाजप नगरसेवकांच्या फायली महापालिकेत दाबून ठेवणे, भाजपा आमदारांच्या फायली आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना महापालिकेत येऊच न देणे हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरु आहे. या विरोधात आम्ही आमच्या पातळीवर संघर्ष करतच असतो असेही चव्हाण यांनी
सांगितले. स्वार्थी हेतूने शहराच्या विकासात अडथळा टाकण्याचं काम गेल्या २० वर्षापासून शिवसेना करत आहे हे मुंबई, ठाणे व कल्याण डोंबिवलीकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच कामे रद्द केल्याने शासनाच्या पैशांचा चुराडा तर झालाच आहे पण डोंबिवलीकर चांगल्या रस्त्यांपासून वंचित ठेवल्याचे पाप एकनाथरावांनी केले आहे. डोंबिवलीकर जनता हे लक्षात ठेवेल असा इशारा आमदार चव्हाण यांनी दिला.

 

पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांची विश्व रजक महासंघच्या नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट पदावर झाली नियुक्ती

पुणे, प्रतिनिधी: विश्व रजक महासंघ भारतातील एकमात्र रजक संघटना असून संपूर्ण भारतातील धोबी/रजक समाजात एकता, सदभाव, समता, बंधुत्व वाढवून स्वाभिमानी नागरिक म्हणून सर्वांना संघटित करून राष्ट्रीय स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराजांच्या उपदेश व विचारधारे नुसार मार्गक्रमण करून हुंडा पद्धती बंद करणे, व्यसनमुक्त, नशामुक्त समाज निर्माण करणे, जाती प्रथा-भेदभाव दूर करून रजक समाजातील सर्व लोकांना पूर्ण भारतात एका छताखाली आणून भारतातील धोबी समाजाला मागासवर्ग (schedule cast चे आरक्षण ) या एकाच श्रेणीमध्ये आणण्यासाठी कार्यरत आहेत.

भारतातील धोबी/रजक समाजावर होणाऱ्या अन्याया बाबत आवाज उठवून संपूर्ण धोबी समजासाठी रजक/धोबी आयोग त्वरीत गठन होण्यासाठी संघर्ष करून पूर्ण समाजाला एकत्र आणण्याचे कार्य विश्व रजक महासंघ संपुर्ण भारतभर करीत आहे. या महासंघाच्या नेशनल लॉ कमिटी प्रेसिडेंट पदावर पुण्याचे ॲड. संतोष शिंदे यांची नुकतीच महासंघाचे संस्थापक रंजीत कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष चिंतामणी, राष्ट्रीय सेक्रेटरी मुन्नालाल कनोजिया,  वरिष्ठ जनरल सेक्रेटरी सी डी राम कनोजिया यांनी नियुक्ती करून तसे पत्र दिले.

संपुर्ण भारतातील सर्व धोबी समाजातील लोकांनी एकत्र येवून या कार्याला हातभार लावण्याचे आवाहन संतोष शिंदे यांनी केले असून त्यांचा संपर्क क्रमांक 7507004606 हा आहे.