Home Blog Page 187

वाहतूक शाखेची नवीन ‘इ -चलान’ दंड प्रणाली करता जनजागृती व्हावी म्हणून ‘नो चलान डे”.. 


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली, सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ पासून लेखी चलान बंद होऊन ई-चलान सुरु करण्यात आले आहे.

‘ई-चलान’ मशीन मध्ये नवीन दंड प्रणाली दिनांक १२/१२/२०२१ पासून सुरु करण्यात आली असून ठाणे आयुक्तालयातील कार्यान्वित असलेल्या सर्व ई-चलान मशिन्स वाढीव दंडप्रणाली प्रमाणे अद्ययावत करण्यात आली आहेत.

वाढीव दंडाचा फटका वाहन चालकांना बसण्यापूर्वी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, आपल्या वाहनांचे अपूर्ण कागदपत्र पूर्ण करण्यासाठी तसेच भविष्यात मोटार वाहन कायद्यान्वये कोणताही दंड वाहनचालकावर आकाराला जाऊ नये या उद्देशाने ३० डिसेंबर २०२१ हा एक दिवस “नो चलान डे” म्हणून आयोजित केला आहे. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना समुपदेशन करण्यासाठी व सुधारणा करण्याची एक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे. ३०/१२/२०२१ रोजी दिवसभर ठाणे आयुक्तालयातील कोणत्याही क्षेत्रामध्ये वाहतूक संदर्भातील चलान केले जाणार नाही तसेच प्रत्येक वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी नवीन वाहतूक नियमांसंदर्भातील वाढीव दंडाच्या तरतुदीबाबत व सुरक्षिततेच्या योजनेबाबत कसूरदार वाहनचालकांच्या समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नागरिकांनी वाहतूक चौकीच्या व महत्वाच्या ठिकाणी जाऊन नवीन दंड प्रणाली जाणून घेण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. श्री. बाळासाहेब पाटील यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, या दिवशी जे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करतील अशा १० ते १५ वाहन चालकांचे गट तयार करून त्यांना महत्वाच्या ठिकाणी नेऊन त्यांचे वाहतूक नियमांसंदर्भात १५ ते २० मिनिटे समुपदेशन करण्यात येईल, त्यांच्या वाहनांची कागदपत्रे तपासून अपूर्ण कागदपत्रांची  जाणीव करून देण्यात येईल तसेच प्रलंबित चलान असल्यास त्याची माहिती करून देण्यात येईल. “नो चलान डे” जरी असला तरी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवा प्रतिष्ठान बोईसर तर्फे घंटानाद आंदोलन

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांच्यावर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार! – राजेश करवीर

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

बोईसर, 26 डिसेंबर: बोईसर सह संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव व ओमीक्रोन व्हायरसचा प्रभाव देखील वाढत असताना बोईसर ग्रामपंचायत प्रशासनाकडून मात्र कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नाही.

कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चक्क आंदोलन करावे लागत आहे. बोईसर येथील गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांनी आपल्या इमारतीच्या आवारातील मोकळ्या जागेत बाजार विक्रेत्यांना खुलेआम बसवून कोरोना नियमांचे पायमल्ली करत समज देण्याकरिता गेलेल्या युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नावाने धमकवण्याचे प्रयत्न केला जात आहे असे माजी उपसरपंच व युवा प्रतिष्ठान बोईसरचे सरचिटणीस राजेश करवीर यांनी सांगितले.

सदस्य गण ग्रामपंचायत असताना औषध फवारणी, दूर फवारणी असो किंवा कचरा व्यवस्थापन समस्यचे निवारण तात्काळ होत होते मात्र प्रशासकाने ग्रामपंचायतीचे सुत्र हाती घेतल्यापासून ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्याकडून या सर्व बाबींचा विचार केला जात नाही असे देखील करवीर यांनी प्रशासक हेमंत भोईर यांना बोलताना सांगितले आहे.

दरम्यान प्रशासक भोईर यांनी गुड्डू पाठक व दिनेश पाठक यांना नोटीस देऊन पुढील योग्य ती कार्यवाही करणे बाबत वरिष्ठांकडे पत्र व्यवहार करण्यात येईल व बाजारात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांवर व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगत घंटानाद आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याचे सांगण्यात आले.

घंटानाद आंदोलनात युवा प्रतिष्ठान बोईसरचे अध्यक्ष विक्रम धोडी, सरचिटणीस राजेश करवीर सह अनेक महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास उत्तम प्रतिसाद !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी लि.’ आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या आठवडी बाजारास ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून या आठवडी बाजारासाठी मुंबई विद्यापीठाच्या मागे, उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर हा बाजार भरविण्यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली होती. शेतकऱ्यांचा ताजा भाजीपाला आणि फळे थेट ग्राहकांना मिळण्याच्या दृष्टिकोनातून या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.

 

सदर आठवडी बाजाराचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. आयुक्त डॉ-सूर्यवंशी यांनी स्वतः आठवडी बाजाराची पाहणी करून आयोजकांचे कौतुक केले, यावेळी उप अभियंता जगदीश कोरे, शमीम केदार, कनिष्ठ अभियंता दिलीप शिंदे आणि ‘ब’ प्रभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप व आयोजक नरेंद्र पवार उपस्थित होते. या आठवडी बाजाराला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता यापुढे दर रविवारी या आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

 

हिंदु मंदिरात हस्तपेक्ष करण्याचा अधिकार सरकार आणि न्यायालय यांना नाही ! – स्वामी परिपूर्णानंद महाराज, तेलंगणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

हिंदु मंदिरांच्या व्यवस्थापन समितीच्यांमध्येही अन्य धर्मीयांनी घुसखोरी केली आहे. हिंदु मंदिरांच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जे निधर्मी लोक हिंदु मंदिरांचा कारभार चालवू पाहत आहेत, तेच हिंदूंच्या देवी-देवतांना ‘सैतान’ मानतात. मंदिर परिसराजवळ अन्य धर्मीय आपली दुकाने थाटतात, मात्र मशिदी आणि चर्च यांच्या जवळून हिंदूंच्या उत्सवांची मिरवणूक निघाली, तर त्याला विरोध केला जातो. ‘हलाल’वर बंदी घाला, हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणूकांना स्वातंत्र्य द्या, यांवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले पाहिजेत, मात्र हिंदूंची मंदिरे अन्य धर्मीयांच्या ताब्यात देण्याचा निर्णय हिंदूंवर लादला जात आहे. हिंदूंच्या मंदिरांची संपत्ती, नियम यांमध्ये हस्तपेक्ष करण्याचा सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांना नाही, असे स्पष्ट प्रतिपादन तेलंगणा येथील स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हिंदु देवस्थानांना सेक्युलर करण्याचे षड्यंत्र !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्’ चे प्रवक्ता अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले की, सरकार कोणत्याही प्रकारे हिंदूंच्या मंदिरांना नियंत्रणात ठेऊ शकत नाही. भक्त आणि भाविक जो पैसा हिंदूंच्या मंदिरात अर्पण करतात, सरकार तो पैसा इतर धर्मीयांसाठी कसा काय वापरू शकते ? हा हिंदूंच्या बाबतीत केलेला विश्‍वासघात आणि घोटाळा आहे. मंदिरांत फक्त देवतांचे नियम चालणार. हिंदूंच्या मंदिर व्यवस्थापनात अन्य धर्मीय हस्तक्षेप करून हिंदूंची मंदिरे भ्रष्ट करत आहेत. संविधानातील अनुच्छेद २६ नुसार ‘हिंदूंना आपल्या मंदिरांची व्यवस्था पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे’, तसेच अनुच्छेद २५ नुसार ‘हिंदूंना आपली धार्मिक स्वतंत्रता अबाधित ठेऊन धर्म आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे.’ या विषयी हिंदूंचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात मांडणार असून, जर न्यायालयाने म्हणणे ऐकले नाही, तर जनतेमध्ये जागृती करून हिंदूंचा आवाज लोकप्रतिनिधींद्वारे संसदेत पोचवणार असल्याचेही अधिवक्ता जैन यांनी सांगितले.

कर्नाटक येथील अधिवक्ता श्रीहरी कुत्स म्हणाले की, अन्य धर्मीयांना मंदिर परिसरात दुकाने थाटायला दिली जात आहेत. मशिद परिसरात हिंदूंना दुकाने चालवू दिली जातील का ? मंदिरांना प्रेक्षणीय, पर्यटन स्थळाप्रमाणे सरकार पाहत आहे, हे थांबले पाहिजे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, मंदिरे ही धर्माची आधारशीला आहे. विविध सरकारांनी मंदिरे अधिग्रहीत करून मंदिरांना लुटण्याचा प्रारंभ केला. अनेक मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण करून ही भूमी हडप केली. मंदिरांच्या धनाचा गैरवापर हज यात्रांना अनुदान देणे यांसह अनेक गोष्टींसाठी केला गेला. आता त्यांनी धार्मिक परंपरामध्ये हस्तक्षेप करायला प्रारंभ केला आहे. हिंदूंच्या मंदिर संस्कृतीला नष्ट करण्यासाठी एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे प्रयत्न केले जात आहेत, हे वेदनादायी असून यामुळे हिंदूंच्या मनात असंतोष निर्माण होत आहे. हिंदू समाज हे अधिक काळ आता सहन करणार नाही.

 

व्यापाऱ्याच्या घरावर छापा; सापडली तब्बल १५० कोटींची रोकड..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कानपुर येथील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरासह इतर ३ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या छाप्यात सुमारे १५० कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे (CBIC) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिली. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली. जवळपास १६ तास रक्कम मोजण्याचे काम सुरु होते. १५० कोटींची ही रक्कम नेण्यासाठी ट्रक मागवावा लागला. सीबीआयसीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसुली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपुर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांचे कन्नौजमध्ये घर, परफ्यूम फॅक्टरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंपही आहे. पियुष जैन यांचे मुंबईत घर, मुख्य कार्यालय आणि शोरूम आहे. गुरुवारी सकाळी कानपूर, मुंबई आणि गुजरातमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरू झाली या कारवाईत जैन यांच्या घरातून सुमारे १५० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे बंडल मोजण्यासाठी १५ मशीन मागवाव्या लागल्या. छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची नोटा मोजणी करताना दमछाक झाली या प्रकरणी जीएसटी इंटेलिजन्सने एक प्रेस नोट जारी केली आहे.

२२ डिसेंबर रोजी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेस लिमिटेडवर छापे टाकण्यात आले असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरु असल्याचे सांगण्यात आले. शिखर ब्रँड अंतर्गत पान मसाला बनविणाऱ्या कंपनीच्या कार्यालय, गोदाम आणि ट्रान्सपोर्ट येथे छापे टाकण्यात आले. बनावट कंपन्यांच्या नावाने टॅक्स इनव्हॉइस जारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या बाहेर चार ट्रक जप्त केले आहेत आणि गणपती रोड कुरिअर्समधून २०० बनावट पावत्याही जप्त केल्या आहेत. कानपूरशिवाय कन्नौजमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. रोकड मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सीबीआयसीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वसुली आहे, एवढी मोठी वसुली झाल्यानंतर रक्कम नेण्यासाठी २५ पेट्या मागवाव्या लागल्या, त्या ट्रकमध्ये भरून घेऊन गेल्या आहेत.