Home Blog Page 186

घराच्या रिकाम्या गच्चीचा ‘असा’ करा वापर, महिन्याला कमवा लाखो रुपये..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना महामारीच्या काळात आपल्या सर्वांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. माणसापासून ते सरकार पर्यंत सर्वानाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. थोडक्यात काय तर, कोरोना नंतर नोकरीपासून खाण्यापर्यंत लोकांना लढावं लागलंय. आजदेखील तीच परिस्थिती कायम आहे.

एकीकडे, बऱ्याच लोकांना रोजगार गमवावा लागला तर दुसरीकडे अनेक लोकांना घरून काम करण्याची संधी देखील मिळाली. आता कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आलेली आहे. त्यामुळे बेरोजगारीची टांगती तलवार पुन्हा डोक्यावर लटकती आहेच. अशातच, एक नामी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. ज्यात तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकता.

काय आहे ही संधी..

याकरता तुम्हाला फक्त तुमच्या घराच्या रिकाम्या छताचा वापर करायचा आहे. रिकाम्या गच्चीवर सोलर पॅनल बसवून तुम्ही ही संधी साधू शकता. सोलर पॅनल कुठेही बसवता येतात. घराच्या छतावर सुद्धा सोलर पॅनल बसवून तुम्ही वीज निर्मिती करू शकता. या वीजनिर्मितीचा ग्रीडमध्ये सप्लाय करता येईल. सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र सरकार अनुदानही देतं. सरकारच्या ‘न्यू अँड रिन्युएबल एनर्जी’ मंत्रालयाकडून सौर पॅनेल बसवणाऱ्यांना रूफटॉप सोलर प्लांटवर ३० टक्के अनुदान देखील दिलं जातं. अनुदानाशिवाय रुफटॉप सोलर पॅनेल बसवण्यासाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो.

साधारणतः एका सोलर पॅनलची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. हा खर्च प्रत्येक राज्यानुसार वेगळा असतो. मात्र सरकारकडून अनुदान मिळाल्यानंतर अवघ्या ६० ते ७० हजार रुपयांमध्ये एक किलोवॅट क्षमतेचा सोलर प्लांट उभारता येईल. काही राज्ये यासाठी स्वतंत्रपणे अतिरिक्त अनुदानदेखील देतात. जर तुमच्याकडे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एकरकमी ६० हजार रुपये नसतील, तर तुम्ही कोणत्याही बँकेकडून त्यासाठी गृहकर्ज देखील घेऊ शकता. यासाठी अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना गृहकर्ज देण्यास सांगितले आहे.

सोलर प्लांटसाठी अनेक बँका कर्ज देतात. यासाठी तुम्ही बँकेकडून सौर अनुदान योजना, कुसुम योजना, राष्ट्रीय सौर ऊर्जा अभियानांतर्गत एसएमई (SME) कर्ज घेऊ शकता. या व्यवसायातून एका महिन्यात ३० हजार रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. यासोबतच सौर व्यवसायासाठी अनेक योजनांतर्गत भारत सरकार ३० टक्क्यांपर्यंत अनुदान देतं. तुमच्या जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा विभागाला भेट देऊन तुम्ही या योजनांची माहिती मिळवू शकता.

उत्पन्न कसे मिळवणार..

साधारणपणे, २५ वर्षांपर्यंत सोलर पॅनेलचं आयुष्य असतं. तुम्ही हे पॅनल तुमच्या घराच्या छतावर सहज बसवू शकता. या पॅनेलमधून तुम्हाला मोफत वीज मिळेलच, शिवाय तुम्ही उर्वरित वीज ग्रीडद्वारे सरकार किंवा वीज कंपनीला विकू शकता. जर तुम्ही तुमच्या घराच्या छतावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले, व दिवसातील १० तास सूर्यप्रकाश असेल, तर यामधून सुमारे १० युनिट वीज निर्माण होईल. महिन्याचा हिशेब केला तर दोन किलोवॅट सोलर पॅनल सुमारे ३०० युनिट वीज निर्माण करेल.

 

१५ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोना लसीकरण सुरु..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीव्दारे संचालित रुग्णालयाच्या वतीने शासनाच्या आदेशान्वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना साई धर्मशाळा येथे कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली.

श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साईधर्मशाळा भक्तनिवास येथील इमारतीतील तळ मजल्यावर ०८ हॉलमध्ये प्रत्येकी १० ते १२ खाटांचे असे एकुण १०० खाटांचे विलगीकरण केंद्र व कोव्हीड हॉस्पिटलची उभारण्यात आले होते. तसेच रुग्णालयाच्या अखत्यारीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्देशाप्रमाणे CCC, DCHC व DCH चालविण्यात आले. त्याव्दारे १८ मार्च २०२० पासून कोरोनाचे लक्षण असलेले रुग्ण व लक्षण रहित सुमारे १० हजार इतक्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या रुग्णांकरीता आक्सिजनची कमतरता लक्षात घेवुन देणगीदार साईभक्तांच्या ०२ कोटी ३३ लाख ७४ हजार रुपये देणगीतुन हवेतुन ऑक्सिजन निर्मिती करणारा १२०० (LPM Liter Per Minute) लिटर क्षमता असलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि संस्थानच्या वतीने दररोज ०३ शिफ्टमध्ये सुमारे १३०० चाचण्या घेण्याची क्षमता असलेली आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात आलेली असून याव्दारे सुमारे ८५ हजार इतक्या चाचण्या मोफत घेण्यात आलेल्या आहेत. तसेच रुणालयामार्फत शिर्डी व परिसरातील २३ हजार जणांना प्रथम आणि व्दितीय लसीकरण करण्याचे महत्वपुर्ण काम आले व ते आजतागायत सुरु आहे.

तसेच नव्याने प्रति दिवस ५ हजार व्यक्तींपर्यंत आरटी-पीसीआर तपासणी क्षमता वाढविणे, जीनोम सीक्वेनसिंग लॅब उभारणी करणे, दोन लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन प्लॅट भाडेतत्वावर घेणे, साईआश्रम फेज २ येथे कोव्हीड रूग्णांकरीता सुमारे ३०० खाटांचे ऑक्सीजन बेड वाढविणे, दोन लिक्वीड ऑक्सीजन प्लांट व व्हेंटीलेटर तसेच वैद्यकीय साहीत्य व आवश्यक पायाभूत सुविधा देणगी स्वरूपात उपलब्ध करणे, अशा विविध सुविधा संस्थानच्या वतीने उपलब्ध करण्याकरीता प्रयत्न करण्यात येत आहे.

याबरोबरच कोरोना व्हायरसच्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या आदेशान्वये १५ ते १८ या वयोगटातील मुलांना लसीकरण संस्थानाच्या रुग्णालयामार्फत मोफत करण्यात येत आहे. हे लस साईआश्रम फेज ०२ (साई धर्मशाळा) येथे सकाळी १०.०० ते सायं.०५.०० यावेळेत उपलब्ध असणार असल्याचे सांगुन जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यातील न्यू युनिक फाउंडेशनचा गौरव समारंभ संपन्न!

संपादक: मोईन सय्यद/पुणे प्रतिनिधी: मुझम्मील शेख

पुणे – न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून “गौरव समारंभ 2021” या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त धायगुडे साहेब,संचालक व सचिव रकीब पटेल, खजिनदार अ बासित पटेल, सभासद मुबशीर शेख आदी मान्यवर उपस्थितीत होते.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे खलील प्रकारे…

1 – प्रमोद यादव साहेब (भा प्र से)
व्यवस्थापकीय संचालक सैनिक कल्याण विभाग व मेस्को विभाग.
2 – माजी कर्नल प्रशांत वानखेडे,
महाव्यवस्थापक मेस्को विभाग,
3 – लेफ्टनंट कर्नल आर आर जाधव,
प्रशासन अधिकारी सैनिक कल्याण विभाग,
4 – किरण सरोदे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सेंट मेरी उपविभाग पुणे. म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
5 – विजयकुमार माने,
कनिष्ठ अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
6 – रोहित तेंडुलकर,
पश्चिम महाराष्ट्र क्लस्टर हेड HDFC बँक.
7 – राहुल म्हामाणे,
शाखा व्यवस्थापक HDFC बँक
कात्रज शाखा,
8 – तुषार कोठारी, (CA),
संस्थापक के जे एस अँड असोसिएट्स,
9 – स्टार्टअप कन्सल्टन्सी सर्व अधिकारी व कर्मचारी.
10 – डॉ सोहेल खान, (MBBS & MS),
व्यवस्थापकीय संचालक सना हॉस्पिटल,
11 – डॉ अतिक शेख,
डॉक्टर सना हॉस्पिटल,
12 – विजय कुमावत,
शाखा अभियंता पुणे मनपा,
13 – सुनील पाटील,
सहाय्यक अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,
14 – तमराज बडगे,
वरिष्ठ तंत्रज्ञान सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.

आज मध्यरात्रीपासून राज्यात नवीन नियमावलीसह कडक निर्बंध लागू; महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून ३१ डिसेंबरच्या म्हणजे आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लागू होणार आहे.

राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळ्यांना फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी दिली आहे. पर्यटनस्थळावर कलम १४४ लागू होणार आहे. तसेच परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

राज्यात गुरुवारी १९८ नव्या ऑमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे यातील १९० रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ४ रुग्ण हे ठाण्यातील आहे. राज्यात एकूण ऑमिक्रॉनबाधितांची संख्या ४५० वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२५ रुग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे. तसेच राज्यात गुरुवारी ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि २२ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे राज्यातील रुग्णसंख्येत वाढ होत गेली तर राज्यात आणखीन कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

राज्य सरकारची नवीन नियमावली
– लग्न सोहळा बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो फक्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम किंवा मेळाव्या देखील बंदिस्त जागेत असो किंवा खुल्या मैदानात असो जास्तीत जास्त ५० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची परवानगी
– राज्याच्या कोणत्याही भागात जे पर्यटन स्थळे किंवा समुद्रकिनारे, मोकळी मैदाने जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिथे स्थानिक प्रशासनाला १४४ लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
– आधीच अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचनाही लागू राहतील

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, वडेट्टीवारांचा इशारा..
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहोत असं मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तसेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचंदेखील ते म्हणाले आहेत.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात सध्या लॅाकडाऊनची स्थिती येत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग वाढलाय. तिसरी लाट आली आहे. राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत विस्फोटक परिस्थिती राहील. रुग्णवाढ पाहिली तर लॅाकडाऊन शिवाय पर्याय नाही.

राज्यात कोरोना तसेच कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे खबरदारी म्हणून सभा, समारंभ, तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नववर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत पार्टी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारादेखील राज्य सरकार तसेच प्रशासनाने दिलाय. असे असतानादेखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. याच कारणामुळे वडेट्टीवार यांनी कोरोनाची तिसरी लाट आल्याचे वक्तव्य केले. तसेच लॉकडाऊनची वेळ आलीच तर ट्रेन, लोकल आणि इतर सुविधांवर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारादेखील त्यांनी दिला.

 

नवीन वर्षानिमित्त मध्यरात्री बनावट विदेशी दारू विरुद्ध औरंगाबाद येथील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक यांची मोठी कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे आयुक्त सन्माननीय श्री. कांतीलाल उमाप तसेच संचालक सन्माननीय श्रीमती उषा वर्मा मॅडम राज्य उत्पादन शुल्क, औरंगाबाद या विभागाचे विभागीय उप-आयुक्त सन्माननीय श्री. प्रदीप पवार व अधीक्षक श्री. सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक, औरंगाबाद यांना मिळालेल्या खात्रीपूर्वक गुप्त बातमीनुसार पडेगाव ते मिटमीटा सरकारी रोडवरील शनिमंदिर समोर पडेगाव ता.जि.औरंगाबाद येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने छापा मारला असता सदर ठिकाणी एक मारुती सुझुकी कंपनीची इको चारचाकी वाहन क्रमांक एमएच २०, एएक्स-७२९५, व एक दुचाकी क्र. एमएच २०, एफएम-४१२९ मध्ये संपूर्ण प्रथमदर्शनी बनावट तयार केलेल्या विदेशी मध्य १८० मि.ली क्षमतेच्या एकूण १२०० सीलबंद बनावट बाटल्या (२५) बॉक्स चारचाकी व दुचाकी वाहनासह एकूण ८,६७,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

दोन आरोपी नामे १) वैभव परशुराम खरात (वय:३२) धंदा-दारूविक्री रा. एन-४२, सी.सी-२, ३१/०६, त्रिमूर्ती चौक, सिडको ता.जि. नाशिक २) राहुल पांडुरंग वालझडे (वय:३५) धंदा-दारूविक्री रा. एन-४२, सी.सी-२, २८/०३, त्रिमूर्ती चौक, सिडको, ता.जि. नाशिक यांना सदर ठिकाणावरून ताब्यात घेतले असून व इतर दोन आरोपी नामे १) फरार इसम नामे सागर संतोष जैस्वाल अंदाजे वय:२२ वर्ष, रा.औराळा ता. कन्नड जि. औरंगाबाद २) फरार इसम नामे दत्ता नानासाहेब वारे अंदाजे वय:२६ वर्ष, रा.औराळा ता.कन्नड जि.औरंगाबाद हे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवूण पसार झाले.

सदर कारवाई श्री.विजय रोकडे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, औरंगाबाद, श्री.डाहके निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ‘क’ विभाग सिल्लोड दुय्यम निरीक्षक, श्री.शरद रोटे, श्री.रमेश विठोरे सह-दुय्यम निरीक्षक, प्रवीण पुरी, जवान सर्वश्री श्री.युवराज गुंजाळ, श्री.रवींद्र मुरडकर, श्री.भास्कर काकड, श्री.सुभाष गुंजाळे, श्री.शारेक कादरी वाहन चालक श्री.संजय गायकवाड व श्री.अमोल अन्नदाते यांनी यशस्वीरित्या पार पाडली.